ब्रेंकिग न्यूज
यावेळी प्रथमच ३२ संवेदनशील मतदान केंद्रांवर आयोगाचा वेबकास्टींगद्वारे वॉच
चिपळुणातील मनसेच्या ७ पदाधिकार्‍यांची झाली हकालपट्टी
जिल्ह्यातील १२ अनधिकृत शाळांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
मतदानयंत्र सील करण्याच्या कामासाठी तहसीलदार कार्यालयालाच कुलूप
प्रचार रॅलीतही महायुतीचाच वरचष्मा

पर्यटन

रत्नागिरी जिल्हा

E-mail Print PDF

रत्नागिरी जिल्हा
फलोत्पादन जिल्हा म्हणून नावारूपाला आलेला रत्नागिरी जिल्हा येत्या काही वर्षात पर्यटन जिल्हा म्हणून आपले वेगळे अस्तित्व निर्माण करत आहे. श्रीक्षेत्र गणपतीपुळे, श्री स्वामी स्वरूपानंद पावस या तिर्थक्षेत्रांमुळे रत्नागिरीचे नाव जागतिक नकाशावर गेले आहे. त्यात रत्नागिरीचा हापूस म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करून पर्यटकांना भूरळ घातली आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने जागतिक स्तरावरील पर्यटक रत्नागिरीतील पर्यटन स्थळांना भेट देत असतात. जिल्ह्याला विस्तीर्ण अशा समुद्र किनारपट्टी लाभली असून, जयगड, बाणकोट, रनपार आदी बंदरे उद्योगातून विकसीत होत आहेत. अनेक समुद्रकिनारे पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. नगररत्नांची खाण असलेला हा जिल्हा विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवून आहे.
बाणकोट - रत्नागिरीतील उत्तरेकडील शेवटचे टोक म्हणजे बाणकोट. खाडीकाठी वसलेले हे गाव. ब्रिटीश काळापासून या गावाला खूपच महत्व प्राप्त झाले आहे. प्रमुख खाड्यांपैकी बाणकोटची खाडी ही प्रमुख खाडी असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उत्खननाचा उद्योग चालतो.
वेळास - नाना  फडणिसांचे मूळ गाव म्हणून इतिहासात नोंदले गेलेले हे गाव म्हणजे वेळास. अत्यंत निसर्गरम्य असे हे गाव असून नारळ, सुपारी, हापूस आदी उत्पादने येथील प्रसिध्द आहेत. गावात दुर्गामातेचे मंदिर असून, याठिकाणी उत्तम शिल्पकला असलेली श्री कालभैरव, रामेश्‍वर, राम व वाघ्रेश्‍वर आदी देवळे आहेत.
केळशी - निसर्गसौंदर्याने नटलेले हे सुंदर गाव असून पर्यटकांना आकर्षित करणारा असा हा परिसर आहे. क्रांतिवीर वासूदेव फडके यांचे हे मूळ गाव. मराठेशाहीतील नामवंत सरदार फडके, केळकर, लागू हेदेखील याच गावचे. लोकमान्य टिळकांचे आजोळ देखील केळशीचे. याठिकाणी अनेक स्थळे प्रसिध्द आहेत. त्यामध्ये केळशीची महालक्ष्मी, याकूब बाबांचा दर्गा, पांढरा गणपती, श्री कालभैरव मंदिर, बेलेश्‍वर मंदिर, वाळूचा डोंगर, विश्‍वेश्‍वराचे देऊळ, दांडीचा वड, उटबरकरीण, आतगावचा टेप, खडप आदींचा समावेश आहे.
आंजर्ले - जिल्ह्यातील दापोली तालुक्यात समुद्रकिनारी वसलेले हे छोटे गाव. लांबच लांब व अतिशय स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा या ठिकाणी असून, नारळ, सुपारीच्या anjerliहिरव्यागार बागा येथे आहेत. पर्यटकांना भूरळ घालणारे असे हे गाव. आंजर्ल्याची खाडी, आंजर्ल्याचा समुद्रकिनारा, कड्यावरचा गणपती, मुर्डी, श्री दुर्गादेवीचे मंदिर आदी ठिकाणी अत्यंत नयनरम्य अशी आहेत.
हर्णे-  जिल्ह्यातील प्रमुख बंदर म्हणून नावारूपाला आलेला हा परिसर. पुरातन काळापासून हे गाव वाहतुकीसाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मत्स्यव्यवसाय चालतो. हर्णे गावाचे महत्व ओळखून या ठिकाणी जलदुर्गाची निर्मिती करण्यात आली. सुवर्णदुर्ग असे या किल्ल्याचे नाव असून, शिवाजी महाराजांच्या आरमाराचे हे प्रमुख स्थान होते. या जलदुर्गाच्या बाजूला असलेला भुईकोट किल्लाही पर्यटनासाठी चांगला आहे.
मुरूड - महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे मूळ गाव. आज हेच गाव पर्यटनाच्या नकाशावर आले आहे. पर्यटनाच्यादृष्टीने हे गाव अत्यंत सुंदर असून, या ठिकाणी पर्यटन महामंडळाच्यावतीने व्यवस्थाही करण्यात आली आहे.
आसूद - दरी डोंगरांमध्ये वसलेले हे छोटे गाव असून, या ठिकाणी निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. आसूदचा लाकडी पूल ‘गारंबीचा बापू’ ने अजरामर केले. याशिवाय केशवराज मंदिर हेही पाहण्यासारखे आहे. पर्यटनासाठी हा गाव खूपच सुंदर आहे.
दाभोळ - दापोली तालुक्यातील आणखी एक महत्वाचे बंदर. एन्रॉनमुळे हे गाव जागतिक नकाशावर आहे. दाभोळला ऐतिहासिक महत्व असून, पूर्वापार व्यापार उदिमासाठी ते प्रसिध्द आहे. या ठिकाणी दिपगृह, दाभोळचा धक्का, दाभोळची चणकाई आदी ठिकाणी पाहण्यासारखी आहेत.
दापोली - मिनी महाबळेश्‍वर म्हणून नावारूपाला आलेले हे शहर म्हणजे दापोली. अत्यंत नयनरम्य असा हा परिसर असून, या ठिकाणी अनेक स्थळे पर्यटकांना नेहमीच भूरळ घालतात. दापोली कृषि विद्यापीठामुळे या शहराला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील अनेक मंडळी ओळख त्यानिमित्ताने होते. दापोलीत अनेक स्थळे पर्यटनासाठी प्रसिध्द आहेत. त्यामध्ये एक म्हणजे चिखलगाव. लोकमान्य टिळकांचे हे मूळ गाव. चिखलगावप्रमाणे ऐतिहासिक महत्व असलेले दुसरे गाव म्हणजे पालगड. परमपुज्य साने गुरूजींे हे मूळ गाव. याशिवाय लाडघर, करसगाव आदी ठिकाणेही नयनरम्य व सुंदर आहेत. त्यामध्ये शहरातील तलाव, लक्ष्मीकेशव मंदिर, लेणी, आयनी, मेट, भोस्ते घाटी, महितपगड, सुमारगड, रसाळगड अशी अनेक ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.
चिपळूण - जिल्ह्यातील प्रमुख शहर. लोटेतील औद्योगिकीकरणामुळे हा परिसर नावारूपाला आला आहे. वाशिष्ठी नदीच्या काठावर वसलेले गाव असून, या ठिकाणी अनेक स्थळे parshuramपाहण्यासारखी आहेत. त्यातील प्रामुख्याने प्रसिध्द असे ठिकाण म्हणजे परशुराम. भगवान परशुरामाचे कोकणातील सर्वात प्रसिध्द देऊळ या गावामध्ये आहे. हजारो भाविक या ठिकाणी येत असतात. याशिवाय सवतसडा, गोवळकोट किल्ला, विंध्यवासिनीचे मंदिर, गांधारेश्‍वर, डेरवण, दोणवली, करंजेश्‍वरी, रामतीर्थ आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहे. डेरवण येथील शिवसृष्टीचा देखावा पर्यटकांना भूरळ घालतो. कोयनानगर - जलविद्युत प्रकल्पामुळे नावारूपाला आलेले हा परिसर. महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्याचे काम या प्रकल्पातून होते. त्यामुळे हा प्रकल्प पाहण्यासाठी असंख्य पर्यटक दरवर्षी येत असतात. हापरिसर अत्यंत सुंदर असा आहे. सह्याद्रीच्या खोर्‍यात हे ठिकाण असल्याने गर्द झाडीने हा भाग वेढलेला आहे. या ठिकाणी कोयना धरण, कोयना अभयारण्य आदी ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.
गुहागर - अत्यंत नयनरम्य  असा समुद्रकिनारी वसलेले हे छोटेसे गाव. नारळी-पोफळीच्या बागांनी सजलेले हे गाव पर्यटकांना पाहण्यासारखे आहे. शांत, सुंदर असा हा परिसर असून, याठिकाणी अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. तालुक्यातील हेदवी येथील दशभुजा गणपतीचे मंदिर अत्यंत सुंदर असे आहे. लक्ष्मीगणेशाचे हे देवस्थान प्राचीन असून, अत्यंत दुर्मिळ देवतांपैकी एक आहे. गुहागरचा समुद्रकिनारा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो. सायंकाळी या ठिकाणी सुर्यास्त पाहणे हेहीएक आकर्षण असते. याशिवाय दुर्गामातेचे मंदिर, उरफाटा गणपती, व्याडेश्‍वर, वेळणेश्‍वर आदी ठिकाणी सुंदर आहेत. वेळणेश्‍वर येथील प्राचीन शिवमंदिर सुंदर असे आहे. याशिवाय रानवी, विजयगड आदी ठिकाणे पर्यटनासाठी चांगली आहेत.
संगमेश्‍वर - मुंबई-गोवा महामार्गावरील मुख्य ठिकाण. या तालुक्याला ऐतिहासिक महत्व आहे. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांना संगमेश्‍वर  येथील कसबा याठिकाणी अटक झाली. याठिकाणी असलेला प्रचितगड पर्यटकांना भूरळ घालतो. ट्रेकिंगसाठी हा गड अत्यंत चांगला आहे. याशिवाय या ठिकाणी अत्यंत प्राचीन अशी मंदिरे आहेत. त्यामध्ये कर्णेश्‍वर मंदिर, सूर्यनारायण मंदिर, आमनायेश्‍वर मंदिर, जाकमाता मंदिर, विष्णूमंदिर आदींचा समावेश आहे. धोदवणे तिवरे धबधबादेखील पर्यटकांना भूरळ घालणारा आहे.
मार्लेश्‍वर - संगमेश्‍वर तालुक्यातील महत्वाचे देवालय, सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले असून, निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी हे ठिकाण अत्यंत चांगले आहे. तेथील मार्लेश्‍वरचे मंदिर तर प्रसिध्द आहे. या मंदिरात आपल्याला नागांचे दर्शन घडते. मंदिराजवळ असलेला धारेश्‍वर हा धबधबा पर्यटकांना भूरळ घालणारा आहे. अत्यंत नयनरम्य असा हा परिसर असून, दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. याशिवाय महितपगड, विशाळगड आदी ठिकाणे पर्यटनासाठी चांगली आहेत.
रत्नागिरी - जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण, पर्यटनाच्यादृष्टीने रत्नागिरी शहर विकसीत होऊ लागले आहे. रत्नागिरीत अनेक स्थळे पर्यटनाच्यादृष्टीने विकसीत होत आहे. ऐतिहासिक वारसा असलेले हे शहर. या ठिकाणी अनेक स्थळे पर्यटकांना भूरळ घालणारे आहेत. त्यामध्ये अठरा हाताचा गणपती, पतितपावन मंदिर, पांढरा समुद्र, काळा समुद्र मिरकरवाडा बंदर, भगवती किल्ला, श्रीदेव भैरी विठ्ठल रखुमाई मंदिर, मत्स्यालय, लाल गणपती, थिबा पॅलेस, थिबा पॉईंट, लोकमान्य टिळक जन्मस्थान आदींचा समावेश आहे. श्रीक्षेत्र गणपतीपुळे ganpatipuleजगप्रसिध्द असे हे ठिकाण असून, पर्यटन स्थळ म्हणून ते आता नावारूपाला आले आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून या क्षेत्राची ओळख असून, दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी येत असतात. समुद्रकिनारी हे मंदिर वसलेले असून, पर्यटकांना भूरळ घालणारे असे हे पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने हा परिसर विकसित केला जात असून, शासनाकडूनही या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्यात आले आहे.
मालगुंड -कवी केशवसुतांचे हे गाव. कवी केशवसुतांचे स्मारक या ठिकाणी उभारण्यात आले असू, श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी येणारे पर्यटक, भाविक मालगुंड येथील कवी केशवसूत स्मारकालाही भेट देत असतात. पर्यटकांना आकर्षित करणारे असे हे ठिकाण आहे. प्राचिन कोकणची ओळख पर्यटकांना करून देणारा प्रकल्प पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असते. गणपतीपुळेजवळच हा प्राचिन कोकणचा प्रकल्प उभा राहिला असून, डोळ्यांचे पारणे फेडणारा असा हे प्राचिन कोकण वसविण्यात आले आहे.
जयगड बंदर व किल्ला - रत्नागिरीतील महत्वाचे ठिकाण. वाहतुकीसाठी सुरक्षित असे हे बंदर असून, या ठिकाणी जिंदाल वीज प्रकल्पामुळे हा भाग नावारूपाला आला आहे. येथील कर्‍हाटेश्‍वर मंदिर भाविकांचे श्रध्देचे ठिकाण आहे. जयगड किल्ला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात. ऐतिहासिक महत्व प्राप्त असलेला हा भाग पर्यटकांना भूरळ घालणार असा आहे.
पावस- श्री स्वामी स्वरूपानंद मंदिरामुळे जागतिक नकाशावर आलेले हे ठिकाण. या मंदिराला भेट देण्यासाठी तसेच स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक येत असतात. श्री क्षेत्र गणपतीपुळे बरोबरच पावस येथील श्री स्वामी स्वरूपानंद मंदिर तिर्थक्षेत्र म्हणून विकसीत केले जात आहे.pawas 
गणेशगुळे - हे देवस्थान महागणपतीचे असून, ते गणेशगुळे गावात अत्यंत नयनरम्य असा हा परिसर असून, या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात.
कोळीसरे येथील श्री भगवान महाविष्णूंचे देवस्थान पाहण्यासारखे आहे. निवळीचा धबधबा तर पर्यटकांना आकर्षित करणारा आहे. करबुड्याचा रेल्वे बोगदा हा आशियातील सर्वात मोठा बोगदा म्हणून ओळखला जातो. याशिवाय पूर्णगड किल्ला, नाणिज, पानवालचा रेल्वे पूल आदी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
लांजा - लांजातील श्रीकालभैरव योगेश्‍वरी मंदिर, कोटचा सिध्दीविनायक, वनसुळे, एकखांबी गणपती मंदिर, लक्ष्मीकेशव देवस्थान, मल्लिकार्जुन आदी ठिकाणे सुंदर आहेत.
राजापूर - ऐतिहासिक महत्व असलेले हे गाव. राजापूरच्या गंगेमुळे धार्मिकदृष्ट्या नावारूपाला आलेले हे गाव. दर तीन वर्षांनी येणार्‍या गंगेसाठी राजापूर प्रसिध्द आहे. याशिवाय आडिवर्‍याची महाकाली, धूतपापोश्‍वर मंदिर, यशवंतगड, कनकादित्य, आर्यादुर्गा देवस्थान, अंजनेश्‍वराचे देऊळ आदी ठिकाणे सुंदर अशी आहेत. त्यामुळे पर्यटकांबरोबरच भाविकांची या ठिकाणी गर्दी होते.

पर्यटनाची सूज

E-mail Print PDF
पावसाळा संपला की दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्या येतात. दाट धुक्याचा हंगाम सुरू झाला आहे. सुंदर हवा, हिरवीगार झाडी, घट्ट धुके, दिवाळी-नाताळ यासारख्या सुट्ट्या आणि आता अनेक ठिकाणी सुरू झालेली हॉटेल्स, रिसॉर्टस्, टपर्‍या यांची रेलचेल यामुळे कोकणातील पर्यटनाला बहर आला आहे. मुंबई-गोवा रस्त्यावर काही वर्षेरेल्वेमुळे वाहतूक खूप कमी झाली होती. परंतु आता पर्यटनामुळे अलिबागपासून सावंतवाडीपर्यंत कोठेही जा मोटारींची खचाखच गर्दी दिसते. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या आरटीओ कार्यालयात नोंद झालेली वाहने एकत्र पाह्यची असतील तर कोकणात यावे अशा पद्धतीने सारा महाराष्ट्र पर्यटनासाठी कोकणात एकत्र येतो. या पर्यटकांची वर्गवारी करणेही अवघड असते. 
Read more...

पांथस्थ

E-mail Print PDF

swapnaja2
पांथस्थ... तुम्ही... आम्ही... आपण सारे पांथस्थच !
काळानं आखलेल्या न संपणार्‍या रस्त्यावरले. आपापली मंझिल कधी ठरलेली... कधी न दिसणारी. प्रकाशाचे यात्री आपण सारे! अंधारातला एक प्रकाशबिंदू होऊन आपण आपला प्रवास सुरु करतो... आपली पायवाट निवडतो. या पायवाटेला मग इतर असंख्य पायवाटा येऊन भेटतात... अनेक प्रकाशबिंदू आपल्या सोबत येतात. काळाचा रस्ता वाहतच असतो अखंडपणे. या रस्त्याला आपण आपसूकच लागतो... पायवाट या रस्त्यात हरवून जाते!   पण पायवाटेवर असताना कसं छान असतं सगळं काही! पायवाटेला सोबत करणारी भिजरी, दाट हिरवाई असते. या हिरवाईच्या गालिच्यावर खेळणारी फुलराणी असते. इवल्या इवल्या डोळ्यांची फुलपाखरं रंगांची नक्षी काढत इथंच भेटतात. रानफुलांच्या सोबतीनं चांदण्या माळलेल्या पर्‍याही इथेच भेटतात. जादूच्या छडीनं क्षणात आनंदाचे खळाळते निर्झर निसर्गाच्या कॅनव्हासवर उमटवणारी परीराणी आणि आभाळाला भिडणार्‍या झाडांवरले त्यांचे इंद्रधनूच्या कमानींचे राजवाडे इथेच तर असतात.

Read more...

रायगड जिल्हा

E-mail Print PDF
घारापुरी लेणी 
सुमारे १४०० वर्षांपूर्वीची डोंगरात कोरलेली आठ लेणी हे घारापुरीचे वैशिष्ट्ये आहेत. शिवपार्वती यांच्यातील सारीपाटाचा खेळ, कैलासोद्धारण, योगीधर शंकर, गंगावतरण, शंकर पार्वती विवाह, नटराज, अंधकारसुर वध अशी पौराणिक दृश्ये येथील शिल्पावर कोरली आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने येथे सोई केल्या आहेत. शनिवार, रविवार किंवा इतर सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची तेथे विशेष गर्दी असते. १७ फुट उंचीचे त्रिमुर्ती लेणेही याच ठिकाणी आहे.
जायचे कसे? - मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून तेथे बोटीने जाता येते किंवा उरणजवळील मोरा बंदरातूनही याठिकाणी जाता येते. 
Read more...