Friday, Mar 27th

Headlines:

आरोग्य

डॉ. शिवाजी मानकर यांचा होमियोपॅथीतील संशोधन प्रबंध लंडन विद्यापिठाकडून मंजूर

E-mail Print PDF
mankar-doctorकोकणातील नामवंत होमियोपॅथी विशेषज्ञ डॉ. शिवाजीराव मानकर यांनी लंडन येथील हॅनेमन कॉलेज ऑफ होमिओपॅथी या विद्यापीठाला सादर केलेल्या संशोधन प्रबंधाला मान्यता मिळाली असून सदर विद्यापीठाने त्यांना पदव्युत्तर पदवी बहाल केली आहे. यावर्षीच्या संपूर्ण बॅचमध्ये प्रथम क्रमांक संपादन करण्याचा विक्रम डॉ. मानकर यांनी केला आहे.
मधुमेह झालेल्या रूग्णांना होणारा अल्सर आणि गँगरीन हे असाध्य विकार असतात. पण डॉ. मानकर यांनी त्यावर प्रभावी उपाय होमियोपॅथीद्वारा केले आहेत. त्यामुळे सदर रूग्णांचा पाय कापण्याचे आणि त्यांना अपंगत्व येण्याचे संकट टळले. गेल्या दोन अडीच वर्षात त्यांनी किमान ४५ रूग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांचा पाय कापण्याचे संकट रोखण्यात यश संपादन केले आहे. हे यशस्वी उपचार त्यांनी केवळ शुद्ध होमियोपॅथीच्या आधारे केले. याबाबत त्यांनी संशोधन प्रबंध तयार करून हॅनेमन कॉलेज ऑफ लंडनला सादर केला. सदर प्रबंधाला संपूर्ण हॅनेमन विद्यापीठात सर्वोत्कृष्ट प्रबंध म्हणून गौरविण्यात आले आहे.
तसेच या वर्षी भारतातून संशोधन प्रबंध सादर करणार्‍या सर्व संशोधकांमध्ये डॉ. मानकर यांना प्रथम क्रमांक लाभला आहे. सदर प्र्रबंध स्वीकारला जाण्यापूर्वी नामवंत तज्ञांनी त्यांच्याशी चर्चा करून डॉ. मानकर यांच्या संशोधनाची संपूर्ण सखोल माहिती घेतली आणि त्या संशोधनाचे चिकित्सक मूल्यमापन केले. त्यानंतरच त्यांच्या प्रबंधाला मान्यता देण्यात आली. या शोध प्रबंधासाठी डॉ. मानकर यांना सी.एम. पटेल होमियोपॅथिक मेडिकल कॉलेज मुंबई येथील प्रसिद्ध होमियोपॅथिक तत्वज्ञानाचे प्राध्यापक प्रा. प्रभाकर देवाडिगा यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. शिवाजी मानकर गेली सत्तावीस वर्षे चिपळण येथे शुद्ध होमियोपॅथी उपचार करीत आहेत. विशेषतः मधुमेह आणि त्यामुळे होणार्‍या गँगरीनवर त्यांनी अत्यंत प्रभावी उपचार पद्धतीचा यशस्वी वापर केला आहे. अनेक असाध्य शारिरीक आणि मानसिक आजारांवर त्यांनी यशस्वी होमियोपॅथी उपचार केले आहेत. आता विश्‍वविख्यात विद्यापीठाने त्यांच्या संशोधन प्रबंधाला मान्यता देऊन त्यांच्या ज्ञानाचा, अध्ययनाचा आणि अत्यंत अभ्यासपूर्ण रूग्णसेवेचा गौरव केला आहे. चिपळूण येथे बाजारपेठेत स्वामी कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे क्लिनिक आहे. मधुमेह आणि अनेक असाध्य विकारांनी ग्र्रासलेल्या रूग्णांना त्यांचा फार मोठा आधार आहे.
रत्नागिरी येथेही डॉ. मानकर यांची सेवा उपलब्ध असून दर शनिवार, रविवार व मुंबई येथे सोमवार व मंगळवार, हिंदू कॉलनी, पहिली गल्ली, दादर येथे रूग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध. संपर्क ः ९४२१९६०७८७, ९५५२२१११०४.

औषधोपचार

E-mail Print PDF


स्वयंपाकघरातील सौंदर्यसाधने

 

चेहर्‍यावर काळे डाग :

ज्यांच्या चेहर्‍यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी एक चमचा दही, १ चमचा मसूरदाळ यांची पेस्ट करुन चेहर्‍यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे.

पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे :

पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे.

निस्तेज चेहरा :

चंदन पावडर, एक चमचा मांजिष्ठ पावडर, एक चमचा कापूर कचरी पावडर, आर्धा चमचा आंबे हळद हे सर्व दुधात मिक्स करुन चेहर्‍यावर लावणे व २० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुणे. यामुळे चेहर्‍यावर एक प्रकारची चमक येते.

पिंपल्स असेल तर कोरफडचा गर चेहर्‍यावर मसाज करणे, कोरफडने रंग गोरा होतो. व चेहर्‍याला चमक येते. ज्यांच्या चेहर्‍यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहर्‍यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. कोरफडचा गर केसांना लावल्यास केसातील कोंडा कमी होतो. व केसांना पण प्रकारची चमक येते.

गव्हाचा कोंडा :

गव्हाच्या कोंड्यात भरपूर प्रमाणात (इ) व्हिटॅमिन असते. तो साईसकट दुधात करुन जाडसर लेप चेहर्‍यावर लावावे. त्यामुळे रंग निखरतो.

तेलकट त्वचा असेल तर मलई ऐवजी दही व मध घेणे.

एक चमचा मध.

एक चमचा काकडीचा रस

एक चमचा संत्र्याचा रस.

 

हे सर्व मिक्स करुन चेहर्‍याला लावणे. १५-२० मिनिट लावणे. याचा क्रिम म्हणून उपयोग होतो.

जायफळ पाण्यत उगळून पिंपल्स व डोळ्याभोवती काळी वर्तुळ असेल तर लावावे. टोमॅटोचा रस १ चमचा, काकडीचा रस एक चमचा, कोबीचा रस एक चमचा हे सर्व मिक्स करून चेहर्‍यावर लावल्यास काळे डग व वर्तुळे कमी होतात.

पिंपल्स जास्त असेल तर कोबी किसुन त्यात जायफळ पेस्ट मिसळुन जाडसर भार चेहर्‍यावर देणे. टोमॅटोच्या आतील गर स्मॅश करुन चेहर्‍यावर लावणे. चेहर्‍यावर चमक येते व चेहरा निखरतो.

चेहर्‍यावर सुरकुत्या असेल तर सफरचंद किसून त्यात एक चमचा कच्चे दुध टाकुन व ही पेस्ट चेहर्‍यावर लावणे.  चेहर्‍यावर पिंपल्स व पिंपल्सचे डाग असेल तर तुळशीच्या पानाचा रस १ चमचा पुदीन्याचा रस व थोडे हळद पेस्ट करून हे मिश्रण पाण्यात करुन घेणे.

सर्दी खोकला असेल तर नेपाली अमृता काढा दिवसातून दोनदा, ३ दिवस घेणे.  उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून रक्षण करण्यासाठी काकडीचा रस चेहर्‍याला लावून बाहेर पडणे. केस गळत असेल तर जास्वंद जेलने केसांची मसाज करणे.

कोरफड जेलने केसांची मसाज केल्यास केसातील कोंडा कमी होतो व केसांना चमक येतो.

पापी तेल याने चेहर्‍याची मसाज केल्यास रोम छिद्र भरुन येतात व चेहर्‍यावरील लव कमी होते. रोज लावले तरी चालते.

चेहर्‍याव्रील व अंगावरील लव कमी होण्यासाठी पपिता पावडर, नीमा पावडर, मंजिष्ठा समप्रमाणात घेऊन त्यात पाव चमचा आंबेहळद टाकणे व त्याच्या चार पट मसूर डाळीचे पीठ टाकणे. कच्चा दुधात पेस्ट करून केसांच्या उलट्या दिशेने लावावे. पीठी ज्याप्रमाणे काढतो त्याप्रमाणे चोळावे नंतर साय / लोणी लावणे. कोल्ड क्रीम लावणे.

१) म्हसूर डाळ आर्धा किलो

२) आंबे हळद तोळा

३) गुलाब पावडर ५० ग्रॅम

४) संत्र्याची साल ५० ग्रॅम

५) चंदन पावडर ५० ग्रॅम

६) कडूलिंबाच्या पानाची पावडर

७) वाळा ५० ग्रॅम

८) मुलतानी माती ५० ग्रॅम

९) पपई पावडर ५० ग्रॅम

हे सर्व मिक्स करुन बरणीत भरुन ठेवावे. पाहिजे तेवढे उटणे घेऊन कच्चा दुधात पेस्ट करणे व ती सर्व अंगास लवुन आंघोळ करणे. ज्यांची कोरडी त्वचा असेल, हिवाळ्यात अंगाची फार खाज सुटत असेल तर त्यांनी हे मिश्रण लावुन आंघोळ करावी. फार चांगले असते.

चेहरा स्वच्छ व चमकदार होण्यासाठी एक चमचा त्रिफळा चूर्ण, १० मिनिट पाण्यात भिजवून चेहर्‍यावर लेप देणे.

चेहर्‍यावर सुरुकुत्या असेल तर त्यावर केशर व बदामची कच्च्या दुधात पेस्ट करुन लावणे.

 

मेरी गोल्ड जेल :

चेहर्‍यावर पिंपल्स असेल तर याने मसाज करावा.

केस गळत असेल तर एक मध्यम आकाराचे डाळींब सालीसकट मिक्सरमध्ये बारीक करणे. जास्वंद फुल, १०-२० ब्राम्हीपाने, १ चमचा आवळा पावडर, मेहंदी पाने अंदाजे हे सर्व बारीक करून २०० ग्रॅम तिळाच्या तेलात लोखंडीच्या कढईत मंद गॅसवर तडतड येईपर्यंत गरम करून कोमट असतानांच एका बाटलीत भरुन ठेवावे व ते केसांना लावावे.

जांभळीची बी पिंपल्सवर लावणे.

डोक्यात उवा झाल्यास सीताफळ बीची पावडर तेलात मिक्स करुन केसांच्या मुळांन लावणे. तेल लावतांना डोळ्यात जाणार नाही याची काळजी घेणे. आवळा, हिरडा, बेरडा समप्रमाणात घेऊन याची पावडर करणे, यालाच ‘त्रिफळा चूर्ण’ म्हणतात.

केस गळत असेल तर :

त्रिफळा चूर्ण (दर महिन्यात २ चमचे वाढवत जाणे) रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्यावे. जंत कृमी असेल तर ३ चमचे त्रिफळा चूर्ण, एक चमचा वावडींग पावडर मिक्स करुन ३ दिवस रात्री झोपतांना कोमट पाण्याबरोबर घेणे. रोज मुठ मुठ फुटाणे खाण्याने हार्ट ऍटकचा त्रास होत नाही.

रोजच्या आहारामध्ये पुदिन्याचा वापर करावा म्हणजे पोटाचे कोणतेही विकार होत नाहीत. सीतोपलादी चूर्ण व मध याची पेस्ट करुन चाटण घ्यावे व कोबींच्या पाण्याची वाफ घ्यावी.  चेहर्‍यावर पिंपल्स असेल तर चेहर्‍यावर बाजरीच्या पिठाचा लेप देणे. चेहरा निखरतो.

 

औषधोपचार

E-mail Print PDF

केसांची निगा

hair 

केस हे शरीरिक सौंदर्याचे एक मुख्य आकर्षण आहे. लांबसडक घनदाट केशसंभार स्त्रीचे सौंदर्य पटींनी वाढवतो. मात्र सुंदर राखण्यासाठी त्यांची देखभाल करणेही तितकेच आवश्यक असते. अन्यथा केसांचे काही विकार उत्पन्न होऊन घटण्यास सुरुवात होते.

अकाली केस पांढरे होणे :

वाढत्या वयानुसार केस पांढरे होणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. परंतु कमी वयात केस पांढरे होऊ लागणे हा निश्चितच चिंतेचा विषय होतो. अकाली केस पांढरे होण्याची अनेक करणे असतात. केसांना तेल न लावणे हलक्या किंमतीच्या साबण व शाम्पूचा अधिक वापर करणे, सतत औषधे घेणे, डोकेदुखी, सर्दी-पडसे, बद्धकोष्ठता, मानसिक तणाव, अशक्तपणा, केसांत कोंडा होणे, निद्रानाश, आनुवंशिकता इ.कारणांमुळे केस अकाली पांढरे होतात.

शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता असल्यानेही केस अकाली पांढरे होतात. अकस्मात दुर्घटना किंवा शोक संदेश मिळाल्यासही लोकांचे केस पांढरे झाल्याचे आढळले आहेत.

एकाच वेळी सगळे केस पांढरे होणे असे प्रकार विचित्र या सदरातच मोडतात. सर थॉमस मूर तसेच मेरी ऍन्टोनेट अशा प्रसिद्ध व्यक्तींचे सर्व केस काही क्षणातच पांढरे झाले होते. असेही काही लोक आढळले आहे की ज्यांचे केस हिवाळ्यामध्ये पांढरे होतात व उन्हाळ्यामध्ये पुन्हा काळे होतात. वैद्यकीय तज्ज्ञांना अद्यापही या गोष्टीचे खरे कारण समजू शकलेले नाही.

केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येपासून वाचवण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. त्याकरीता नियमित दिनचर्या, केसांची उचित सफाई, संतुलित आहार, व्यायाम उत्तम झोप यांची आवश्यकता असते. केस काळे राखण्यासाटःई शरीराला प्रोटिन व्हिटॅमिन ए. बी. सी. डी. ई. कॅलशीअम आयोडीन, फॉस्फोरस, खनिज क्षार, कार्बोहायड्रेट, आयर्न, कॉपर इ. पदार्थ पर्याप्त प्रमाणात मिळाले पाहिजेत. व्हिटॅमिन व कॉम्लेक्स मध्ये आढळणारे पॅन्टोर्थेनिक ऍसिड फॉलिक ऍसिड इ. पदार्थ केस काळे राखण्यात महत्वाची भुमिका बजावतात.

शरीराला सर्व द्रव्य योग्य प्रमाणात मिळवीत या करिता आपल्या आहारात दूध, दही, लोणी, पनीर, अंडे, गाजर, मुळा, टोमॅटो, मटार, पालक, लिंबू, आवळा, खजूर, द्राक्षे, सफरचंद, मोसंबी, पालेभाज्या, ताजी फळे, अंकुरीत धान्ये आदिंचा समावेश असावा.

अकाली केस पांढरे होण्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या गोष्टी :

एक-दोन केस पांढरे झाले असल्यास ते केस तोडू नका. असे केल्याने केस पांढरे होऊ लागता. थोडे केस पांढरे झाले असल्यास डाय करू नका. त्यामुळे काळ्या केसावरही प्रभाव पडतो. केस आणखी वेगाने पांढरे होऊ लागतात. केस धुण्यासाठी साबण व शाम्पू ऐवजी आवळा, रिठे, शिकेकाई, बेसन, दही इ. चा वापर करा. खुप गोड पदार्थ, तेलकट, मसालेदार भोजन, दारु, अमली पदार्थ यांचे सेवन करु नका.

केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा.

केसांमध्ये हेयर स्प्रे व केस वालविण्यासाठी हेयर ड्रायरचा वापर कमीत कमी वापर करावा.

मेंदी

पांढर्‍या केसांसाठी वनौषधी संच -

(मेंदी, आवळा, मंडूर, जास्वंद, माका, मुलतानी माती, मोतिया, रोशा तेल)

मेंदी स्थाननि गुणाने ‘केश्य’ म्हणजे केशवर्धक व केशरंजक आहे,तसेच शोथहार दाहप्रशसन व वेदना स्थापनही करते. म्हणूनच एक थंडावा देणारी वनौषधी म्हणून उष्ण कटिबंधात हिचा सर्रास वापर होत होता. हळूहळू ही मेंदी सौंदर्य प्रांतात शिरकाव करती झाली आणि आता तर एखाद्या राणीच्या थाटशत पूर्ण जगभर प्रस्थापित झाली आहे. परदेशातून तर हेना हेअर कंडिशनर व हेना शांपू चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. दरवर्षी भारतातून निर्यात होणार्‍या मेंदीची टनावारी वाढतच आहे.

केसांकरिता मेंदीच्या वापरावे अनेक फायदे आहेत. मुख्यत्वेकरून मेंदी जरी केस रंगवण्यासाठी वापरली जात असली तरी अशीच नियमित लावण्याने केसांचे आरोग्य सुधारते. केसांवर एक छान तकाकी येऊन केस सुटे सुटे होऊन खुलतात. ज्याला कंडिशन असे म्हणले जाते. केस अकाली पांढरे होत नाहीत. डोक्याला कोंडा होण्याचा थांबतो व केसांची वाढ होते. तुरळक पांढरे झालेल्या केसांन मेंदी लावून झाकता येते. मात्र पूर्ण किंवा जास्त पांढरे केस असणारे बहुधा रासयनिक डायच लावतात. परंतु त्यांनीही या द्रव्यांचे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून १५ दिवसांतून एकदा मेंदी लावावी.

मेंदी फक्त पांढर्‍या केसांनाच रंगवते (काळे केस तसेच राहतात.) बर्‍याचजणांना नुसत्या मेंदीने केसांना येणारा रंग आवडत नाही. म्हणून या संचात मंडूर (लोह) व आवळा यांचे मिश्रण सोबत वापरले जाते. मंडूर व आवळ्याच्या रासायनिक संयोगाने काळा रंग तयार होतो. माका व जास्वंद या दोन्ही वनौषधी केशरंजक मान्यता पावल्या आहेत.अ मुलतानी मातीने मिश्रणाला चिवटपणा येऊन केसांवर पसरता येते. हा अनुभव अल्हाददायी व्हावा. म्हणून केशवर्धक मोतियारोशा तेलही संचातच दिले जाते.

आजकाल तरुण मुलां-मुलीतच पांढरे केस दिसू लागले आहेत. आहारातल्या चुका, मानसिक ताण व रासायनिक प्रसाधनांचा जबरदस्त प्रचार याला बळी पडलेल्या आमच्या नव्या पिढीला या वनौषधी हे एक वरदान आहे.

***

औषधोपचार

E-mail Print PDF

फलाहार व निर्विषीकरण

खाण्या-पिण्यच्या चुकीच्या सवयी वेळ-अवेळ तळलेले मसालेदार पदार्थ, अतिगोड खाणे यामुळे शरीरात अनेक प्रकारचे विषारी पदार्थ तयार होतात. वैद्यकीय परिभाषेत टॉक्सिन म्हणून ओळखले जाणारे हे पदार्थ वर्षानुवर्ष शरीरात साठून राहतात. ते शरीरातून वेळीच बाहेर काढले नाहीतर अनेक रोगांना निमंत्रण मिळते. अशी विषारी द्रव्ये शरीरातून बाहेर काढण्याच्या प्रक्रियेला निर्विषीकरण असे म्हटले जाते. यामुळे शरीरातिल अप्चनसंस्था स्वच्छ शुद्ध होत असते.

fruitपचन संस्था शुद्ध करण्याचा सर्वात चांगला मार्ग ‘फलाहार’ आहे म्हणजेच संपूर्ण दिवस फळांचे सेवन करणे. कोणतेही दोन दिवस सातत्याने हा उपचार करावा लागतो. या दोन दिवसात आवडीचे कोणतेही एक फळ ठरवा. केळी, सफरचंद, द्राक्ष, अननस, कलिंगड असे कोणतेही फळ ऋतुमानानुसार ठरवा. दोन दिवस हेच फळ व पाणी असा आहार ठेवा. दोन्ही दिवस एकच फळ खा. चहा-कॉफी यांचेही सेवन करू नक. चहाची अगदीच तल्लफ आली तर गवती चहात मध टाकून घ्या.  या दोन दिवसात खूप भुक लागली असे वाटेल. पण त्यावर नियंत्रण ठेवा. फळे लवकर पचतात, त्यामुळे असे होते.

या काळात हलका फुलका व्यायाम करा. अधिक परिश्रमाचे काम करु नका. भरपूर आराम करा. या प्रक्रियेनंतर खूप हलके वाटेल. वजनही कमी होईल. पण यासाठी दोन दिवस आराम करण्यासारखा वेळ हाताशी पाहिजे. तसेच प्रकृतीची कोणतीही तक्रार असणार्‍यांनी हे करण्यापूर्वी वैद्यकीय सल्लाही घेतला पाहिजे.

 

***

Page 1 of 3

  • «
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  Next 
  •  End 
  • »