ब्रेंकिग न्यूज
शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब
बहादुरशेख ते पाग नाक्यापर्यंत उड्डाण पूल होण्यासाठी न.प. करणार ठराव
डाटा ऑपरेटर्सचा जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेवर मोर्चा
बाहेरुन येणार्‍या नेत्यांनी भंडारी समाजाला शहाणपण शिकवू नये : गजानन पाटील
ए.बी. मौरी कंपनीवर कारवाई करण्याची शेकापची मागणी
 

कुणबी समाजाला चार टक्के आरक्षण मिळायलाच हवे : खा. अनंत गीते

E-mail Print PDF
anant-gite
माणगाव - राज्य शासनाने इतर मागासवर्गात कुणबी समाजाचा समावेश केला आहे.  तिलोरी कुणबी समाज हा फक्त कोकणात आहे. त्यामुळे या समाजाला ४ टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आमची मागणी आहे व त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन शिवसेना खासदार अनंत गीते यांनी माणगाव येथे झालेल्या कुणबी समाजोन्नती संघ व रायगड जिल्हा कुणबी समन्वय समिती आयोजित मेळाव्यात बोलताना केले. यावेळी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बावकर, कुणबी समन्वय समिती अध्यक्ष शंभरराव म्हसकर, आम. धैर्यशील पाटील, आम. सुरेश लाड आदी कुणबी समाजाचे नेते आणि समाजबांधव, मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होते.