![]() |
![]() |
|||
| दिनांक: | ||||
| शिष्यवृत्ती परीक्षांची 'रॅट रेस' | |||||||
|
|||||||
| > मुख्यपान | |||||||
|
|||||||
| दिनांक: 15-11-2009 | |||||||
| 'मुंबईमधील नववी आणि दहावीच्या तीन विद्यार्थ्यांनी घरच्यांसाठी, आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी ठेवून घर सोडले.' 'दहावीतील मार्कांची भिती वाटून विद्यार्थीनीची आत्महत्या', 'परीक्षेत मिळणाऱ्या गुणांची भिती वाटून आठवीतील विद्यार्थी परागंदा'... या आणि अशाच अर्थाच्या बातम्या आपल्याला नवीन राहिल्या नाहीत. परिक्षा ही विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेल्या ज्ञानाची पारख करणारी, त्यांचे मुल्यमापन करणारी एक फुटपट्टी आहे हे आता आपण विसरून गेलो आहोत. आता विद्यार्थी हे विद्या घेणारे राहिले नसून केवळ परिक्षार्थी झाले आहेत आणि याला जबाबदार, या सिस्टीमबरोबर आपण पालक आहोत हे मला प्रकर्षाने जाणवलं. परवा झालेल्या स्कॉलरशिपच्या परिक्षेच्या दिवशी चौथी! आणि सातवीच्या स्कॉलरशिप परिक्षेला सामोरी जाणारी मुलं आणि त्यांचे पालक यांचा, मार्क मिळवण्यासाठी, एका एका मार्कासाठी आणि गुणवत्ता यादीत आपलं मुल येईल की नाही यासाठी चाललेला अट्टाहास पाहिला आणि या सगळया सिस्टीमचाच खूप राग आला. काय करतोय आपण? इकडे तर दहावी बोर्डाची गुणवत्ता यादी काढून टाकण्याच्या गोष्टी करतो आणि ज्या वयात गुणवत्ता म्हणजे काय याचा गंध ही नसणाऱ्या कोवळया, अपरिपक्व मुलांच्या डोक्यावर या गुणवत्ता यादीचं ओझं का देतोय आपण? ही गुणवत्ता यादी नक्की काय सिध्द करणार आहे? वर्षभर मुलांच्या मागे लागून, त्यांना दम देवून करून घेतलेला अभ्यास? शाळेमधून जास्तीत जास्त मुलं गुणवत्ता यादीत आली म्हणून मिळणारा मान? एखाद्या शिक्षकानं मुलांच्या प्रत्येक मिनिटाला अभ्यास करून घेतल्याचा पुरावा? की ताण तणावाला समोर जाण्याची पालकांनी मुलांची करून घेतलेली तयारी? | |||||||
| या वर्षभराच्या कालावधीत स्कॉलरशीपसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं मी निरीक्षण करत होते. अभ्यास एके अभ्यास हा ध्यास या मुलांनी घेतलेला दिसला खरा. पण यातला किती टक्के ध्यास त्या मुलांच्या मनातून आला होता? ''आई म्हणते स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे' एकीच उत्तर! ''बाबांनी तंबी दिलीय खेळासाठी. यावेळी वेळ फुकट घालवायचा नाही'' हे आणखी एक उत्तर! ''बाईनी शंभर गणित आजच्या आज सोडवायला सांगितलीत''. ''सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत बसायचं अभ्यासाला. |
|
||||||
| उठलास तर बघ!'' असे डायलॉग ऐकल्यासारखे वाटतात नं? की आपणच बोललो होतो हे? परिक्षेला एक महिना राहिला... पंधरा दिवस राहिलेत... काऊंटडाऊन सुरू होताच हे सगळयांचच झपाटलेपण पार सीेमेला पोहोचल होतं. दिवसाला 10-12 प्रश्नपत्रिका सोडवून घेणारे पालक मी बघितलेत ते याच काळात. सकाळपासू संध्याकाळपर्यंत दामटून अभ्यासाला बसवणारे शिक्षकही मी पाहिलेत ते याच कालावधीत. मुलांची बौध्दीक़ वाढ झाली पाहिजे म्हणून त्यांना ब्रेन टॉनिक आणि बदाम-खारकेचा खुराक देणारे पालकही मी बघितलेत आणि 'मावशी, मी थोडावेळ तुझ्याकडे कार्टुन नेटवर्क बघू? घरी आईनं टि. व्ही. बंद करून ठेवलाय. अभ्यासानं डोकं दुखायला लागलंय असं केविलवाण्या स्वरात विचारणारे विद्यार्थीही मी बघितलेत. खरंच इतका अभ्यास करायला लागतो? आय.आय.टी. साठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परिक्षेसाठी 'कोटा' येथे चालणाऱ्या क्लासेससंबंधी वाचलं होत. मी पण कोटयातले सगळे क्लासेस महाराष्ट्रातल्या घराघरात केवळ चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिपसाठी आपण पालक किती नेटाने चालवतो, नाही? | |||||||
|
|||||||
| Go To Top Of Page | |||||||