![]() |
![]() |
|||
| दिनांक: | ||||
![]() |
| टाकाऊ प्लास्टीकमधून फुलला शोभिवंत फुलांचा मळा! | |
| सौ. सुजाता श्याम म्हापूसकर | ![]() |
![]() |
| निसर्गाचा समतोल ढासळतोय, अवेळी पडणारा पाऊस, वातावरणात सातत्याने होत जाणारे बदल यावरून निसर्गाचे चक्र बदलतंय हे जाणवतंय. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी प्रदूषण टाळणाऱ्या वस्तूंचा वापर अधिकाधिक होणे गरजेचे आहे. सरकारी स्तरावरही प्लास्टीक किंवा प्रदूषण टाळणाऱ्या वस्तूंच्या वापरावर भर दिला जात आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी चिपळूणच्या माहेरवाशीण सौ. सुजाता श्याम म्हापूसकर यांनी 'सॉफ्ट ड्रिंक्सच्या' प्लॅस्टीक बॉटलपासून शोभिवंत फुलांची झाडे, छोटी छोटी फुले, शो-पीस आदी वस्तू तयार करण्यास सुरूवात केली आहे. अत्यंत आकर्षक, सुंदर रंगसंगतीची फुलांची झाडे अनेकांना भुरळ घालत आहेत. 'सॉफ्ट ड्रिंक्सच्या' बाटल्या आपण इतरत्र फेकून देतो. या प्लास्टीक बाटल्या नष्ट करणे शक्य होत नाही. पर्यायाने प्लास्टीकपासून होणाऱ्या प्रदूषणाने पर्यावरणाचा समतोल ढासळत असल्याचे चित्र आहे. या बाटल्यांची विल्हेवाट कशी लावावी, असा प्रश्न असतानाच सौ. म्हापूसकर यांनी 'टाकाऊमधून टिकाऊ' वस्तू तयार करण्यावर भर दिलाय. पर्यायाने प्रदूषण ढासळण्याचा प्रयत्न अशा वस्तूंतून होत आहे. चिपळूणच्या माहेरवाशिणी असणाऱ्या सौ. सुजाता म्हापूसकर या चिपळूणमधील प्रसिध्द चित्रकार श्रीकृष्ण तुकाराम तथा भाऊ शेटये यांच्या कन्या. लग्नानंतर मुंबईत वास्तव्याला असणाऱ्या सौ. म्हापूसकर यांचा 'फाईन आर्ट' चा वारसा वडिलांकडून मिळाला. त्यांचे पुढील शिक्षण त्यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मधून घेतले. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ग्लास पेटींग, थर्माकोल आर्ट, ब्रेड क्राफ्ट आदी कलाकृती तयार करण्यास सुरूवात केली. त्यांच्यातील या उपजत कलेला पती शाम यांची मोलाची साथ मिळाली. त्यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेरणेने त्यांनी या क्षेत्रात कार्यरत राहण्याचे ठरवले. गेल्या 25 वर्षाच्या या प्रवासात वेगवेगळया कलाकृतींची निर्मिती होत गेली. यातूनच 'सॉफ्टड्रिंक्स'च्या बाटल्यांपासून शोभिवंत फुलांची झाडे तयार करण्याची संकल्पना पुढे आली. अत्यंत आकर्षक पध्दतीने सुरेख रंगसंगतीच्या माध्यमातून त्यांनी अनेक फुलांच्या रचना साकारल्या. मात्र ही फुले तयार करताना जवळजवळ एक ते दोन दिवस जातात. प्लास्टीक कापताना खूप मेहनत घ्यावी लागत असल्याचे त्या सांगतात. मात्र एखादं मनासारखं काम झालं की या मेहनतीचे काही वाटतनाही. आतापर्यंत असंख्य फुले, झाडे शो-पीस तयार केली आहेत. |
| ब्रेडपासून शो-पीसची रचना |
| नेहमीच्या खाण्यातील ब्रेडच्या लगद्यापासून विविध पक्षी, फळे तयार करण्याची कलाही सौ. म्हापूसकर यांनी आत्मसात केली आहे. ब्रेडस्मध्ये विशिष्ट केमिकल्सचा वापर करून त्यात टिकाऊपणा आणला जातो. त्यानंतर विविध शो-पीसना आकार दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. |
| रत्नागिरीत प्रदर्शनाचे आयोजन |
| येत्या दिवाळीत शोभिवंत फुलांचे, विविध शो-पीसचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रत्नागिरीतील मुलींसाठी मार्गदर्शन वर्गही घेण्याची त्यांची तयारी आहे. मेमध्ये असे वर्गही आयोजित करण्यात आले. या वर्गाला चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 15 मुलींनी या कलेबाबत मार्गदर्शन घेतले. आपल्या या वाटचालीतील आपली बहिण सौ. माधवी आणि त्यांचे पती सुदेश यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळाल्याचे त्या आवर्जुन सांगतात. |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |