![]() |
![]() |
|||
| दिनांक: | ||||
| योगासनांनी पळवा सर्दी | |||||
|
|||||
| > मुख्यपान | |||||
|
|||||
| दिनांक: 15-11-2009 | |||||
कोणत्याही रोगावर 3 प्रकारे उपचार करता येतो, एक आहे मानवी उपचार, दुसरा आहे शल्य उपचार आणि तिसरा आहे दैवी उपचार. औषधे, गोळया इत्यादींनी केलेल्या उपचाराला मानवी उपचार असे म्हणतात. सर्जरी व तत्सम उपचारांना शल्य उपचार तर गुरूकृपा, मंत्र आणि योगासनांनी केलेल्या उपचाराला दैवी उपचार म्हणतात. दैवी उपचाराला आजकाल आंतरराष्ट्रीय स्तरावर 'होलिस्टीक हिलींग' (Holistic Healing) म्हटले जाते. सर्दीवर आजतागायत औषध मिळाले नाही. योगासनांनी माझी सर्दी कशी पळाली हा अनुभव मी आपल्या सर्वांबरोबर शेयर करू इच्छितो. |
![]() |
||||
| माझा प्रयोग | ![]() |
||||
कोणतेही आसन 3 तास केले की ते सिध्द होते असे म्हणतात. पण ही खूपच कठीण गोष्ट आहे आणि असे करताना योगासने सिध्द केलेला गुरू असणे आवश्यक आहे. त्यामुळे मी पद्मासन आणि वज्रासनाचा एक तासापर्यंत वाढविण्याचा अभ्यास सुरू केला. पहिल्या दिवशी मी साधारणपणे 5 मिनिटे पद्मासन घातले आणि दुसऱ्या दिवशी 15 मिनिटे. दरम्यान मला सर्दी झाली. सर्दी झाल्यापासून ती जाईपर्यंत मी रोज तीन वेळा 15-15-15 मिनिटे दिवसातून तीन वेळा पद्मासन व वज्रासन करत होतो. मला सर्दी झाली की ती फारच वाईट आणि वाईटाचा घन म्हणावा इतकी होते. पण यावेळेस तसे झाले नाही. |
|||||
पहिल्या दिवशीची सर्दी दुसऱ्या दिवशी वाढते आणि ताप डोकेदुखी इ. दुखणी होतात. पण आश्चर्य म्हणजे माझी सर्दी अजिबात वाढली नाही, पण कमी देखील झाली नाही. दरम्यान मी योगासनांचा अभ्यास करतच होतो. तीन दिवसात मला जराही त्रास न होता माझी सर्दी कोणत्याही औषधाशिवाय कमी झाली आणि पुढच्या दोन दिवसात पूर्णपणे गेली. यापूर्वी मला सर्दी जाण्यासाठी नेहमी हायर ऍंटीबायोटीकची गरज पडत असे. यावेळी कोणतेही ऍंटीबायोटीक शिवाय माझी सर्दी पळाली. माझे असे अनुमान आहे की दिवसातून 3 वेळा पद्मासन अथवा वज्रासन 15-15-15 मिनिटे असे केले तर सर्दी औषधाशिवाय घालवता येऊ शकते. |
|||||
| व्यावहारिक दृष्टीकोन | |||||
ज्यांना आरथ्राईटीस आहे त्यांनी पद्मासन अथवा वज्रासन करू नये, त्यांनी पश्चिमोतासन करावे यामुळे देखील सर्दीत फायदा होऊ शकतो. पद्मासन अथवा वज्रासनाचा कालावधी जमेल तसा आणि सावधपणे वाढवावा. शरीरावर बळजबरी करू नये. खूप ताप आला तर आसने सुरूच ठेवावीत आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत. पद्मासन अथवा वज्रासन किंवा दोन्हीही रोज 15 मिनिटे करण्याचा सराव करावा आणि सर्दी झाली की लेखात आधी सांगितल्याप्रमाणे आपले शस्त्र उपसावे आणि दिवसातून 3 वेळा 15-15-15 मि. किंवा 5 वेळा 5-5-5-5-5 मि. असे पद्मासन वज्रासन किंवा दोन्हीही घालावीत. आता बरेच जण म्हणतील रोज हे सर्व करण्यापेक्षा गोळी घेणे सोपे आहे. पण खरे तर ऍंटीबायोटीकचा कधी अनावश्यकपणे आपण आपल्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीचा ऱ्हास करत असतो. त्यामुळे मग 250 मि. ग्रॅम ला पळणारा रोग 500 मि. ग्रॅ. शिवायही जात नाही. विषाणूंची औषधाला न जुमानण्याची शक्ती वाढत आहे. मग अधिक परिणामकारक ऍंटीबायोटीक शोधावी लागत आहे. त्यात अधिक श्रम, पैसा आणि वेळ खर्च होत आहे. हाच श्रम, पैसा आणि वेळ स्वाईन फ्लू, एडस् आणि कॅन्सर सारख्या रोगांवर उपचार शोधण्यास सत्कारणी लागू शकतो. |
|||||
| वैज्ञानिक तथ्य | |||||
क्रिया योगानुसार शरीरात गुदद्वाराच्या वर एक शक्ती केंद्र आहे, जिथे स्पायनल कॉर्ड किंवा मरूदंड संपतो. योगासनांमुळे तेथील रक्तप्रवाह वाढतो. तेथील रक्तप्रवाह वाढून शरीर व मनाला नव संजीवनी देणारी व्हायब्रेशन्स शरीरात पसरतात. ह्या व्हायब्रेशन्समुळे शरीराची नैसर्गिकपणे स्वतःला रोगमुक्त करण्याची क्षमता वाढते. परिणामी रोगमुक्ती होते. यात कोणताही चमत्कार वा गुढ आणि अगम्य काहीच नाही. पद्मासन आणि वज्रासनात बसण्याचा कंटाळा येत असल्यास एखादे पुस्तक किंवा पेपर आसनात बसून वाचावा किंवा आसनात बसून टि. व्ही. बघण्यासही हरकत नाही. माझ्या प्रयोगाबद्दल आपल्याला काय वाटते. आपले या बाबतीतले अनुभव आपण मला सांगू शकता. माझा E-mail देत आहे. dipeshpakhare@rediff.com. |
|||||
|
|||||
| Go To Top Of Page | |||||