दिनांक:
 
 
मासिक राशीभविष्य
डिसेंबर 2011
रमेश बा. मावळंकर
(ज्योतिषाचार्य)
रत्नागिरी
मोबाईल-9860886993
ग्रहस्थिती :  


 
  मेषः नियंत्रण ठेवावे
या महिन्यात राहू, केतू व शनि यासारखे बलाढय ग्रह आपल्या बुध्दीत्तेला व कर्तृत्वाला आव्हान देणारे आहेत. प्रत्येक बाबीवर नियंत्रण ठेवणे उचित होईल. मंगळ धाडसाने पुढे जाणेस सांगतोय. सुशिक्षित बेकारांना नोकरी मिळेल व परदेशागमन योग आहे. घरात चैनीच्या वस्तू खरेदी केल्या जातील. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कलाकारांना उत्तम संधी व प्रसिध्दी मिळेल.
     
  वृषभ: आर्थिक समस्या सुटतील
या महिन्यात ग्र्रहमान मध्यम स्वरूपाचे असून सावधानता बाळगणे जरूर आहे. जुने आजार पुढे येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. मानसिक संतुलन बिघडू देवू नये. तथापि शनिमहाराज आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवून अपेक्षित अर्थप्राप्ती देणारे आहेत. आपल्या आर्थिक समस्या सुटतील. धाडस, कर्तृत्व व बुध्दीमत्ता पणाला लावावी. शुक्र धनलाभ व वस्त्रलाभ करून देणारा आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. नवीन योजना फलद्रुप होतील. अध्यात्मिक उपासना फळाला येईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल.
     
  मिथुन : गुरूकृपा होईल
हा महिना आपल्या बहुतांशी मनोकामना पूर्ण करणारा आहे. अनुकूल ग्रह प्रतिकुल परिस्थितीवर मात करू शकतात याची आपणाला प्रचिती येईल. गुरूकृपा होणे म्हणजेच भाग्य उजळणे होय. अचानक इस्टेट लाभ संभवतो. एखादे लॉटरी तिकिट घेऊन नशिब अजमावणेस हरकत नाही. प्रतिष्ठीत व बुध्दीवंतांकडून आपल्या कलेचे, कर्तृत्वाचे व बुध्दीमत्तेचे चीज होईल. घरगुती समस्या वेळीच थांबवणे गरजेचे आहे. व्यापारी वर्गाला उत्तम अर्थलाभ होईल. धाडसाने पुढे जात रहाल.
     
  कर्क :अचानक धनलाभ होईल
पैसा मिळवणे सोपे पण तो टिकवणे कठीण याची प्रचिती आपणास या महिन्यात येईल. अचानक नवीन खर्च उभे राहतील. मानसिक स्वास्थ्य नीट ठेवणे जरूर आहे. शत्रू डोकं वर काढतील तेव्हा सावधानता बाळगावी. शब्द जपून वापरा नाहीतर शत्रू निर्माण होतील. आनंद संयमाने द्विगुणित करावा. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे. तूर्तास विवाह इच्छूंनी विवाह जुळविण्याचे काम लांबणीवर टाकावे. व्यापारी वर्गाला उत्तम फायदा होईल. अचानक धनलाभ संभवतो. आर्थिक समस्या दूर होऊन समाधान मिळेल.
     
  सिंह : प्रगतीची दारं उघडतील
रात्र संपली की दिवस उजाडतोच. हा निसर्ग नियम आहे. तसेच कष्ट, लोकसेवा सच्चाई व सबुरी आणि श्रध्दा यांचे फळ मिळणारच. आपली शनिची साडेसाती संपली आहे. आपणावर शनिकृपा होवून सामाजिक प्रतिष्ठा, अपेक्षित पैसा व मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. नवीन व्यवसायात पदार्पण होणेचा संभव आहे. घरगुती समस्या वेळीच आटोक्यात आणाव्यात. मंगळ उष्णतेचे विकार होणार आहे. वेळीच काळजी घ्यावी. विवाह इच्छूंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाचे नवीन व्यवसायात पदार्पण होवून अर्थप्राप्ती होईल.
     
  कन्या :इच्छापूर्ती होईल
शनिच्या साडेसातील दुसऱ्या पर्वातून आपण पार पडला आहात. आता शनि, तुळेत व उच्चीचा असल्याने घाबरण्यासारखे कारण नाही. राहू आपणाला अचानक धनलाभ करून देणारा आहे. मात्र मंगळ वाहनापासून सावध राहणेस सांगत आहे. पैसा अपेक्षित आला तरी आनंद संय्यमाने द्विगुणित करणे योग्य होईल. मानसिक दडपणे दूर करावीत. गर्भवतींना पुत्रप्राप्तीसाठी योग संभवतो. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. वस्त्रलाभ व चैनीच्या वस्तू खरेदी केल्या जातील. गुप्त शत्रू स्पष्टवक्तेपणाने निर्माण करू नयेत. व्यापारी वर्गाला अपेक्षित फायदा होईल. मनोकामना पूर्ण करणारे ग्रह आहेत.
     
  तुळ : आनंद लाभेल
तुळ राशीत शनी उच्चीचा मानला जातो. तेव्हा तुळ राशीच्या व्यक्तींवर शनिची कृपादृष्टी असते. मात्र आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. तब्येतीची वेळीच काळजी घ्यावी. आर्थिक आवक अपेक्षित होईल. ग्रहराज रवि आपणाला उच्चपद व प्रतिष्ठा बहाल करणारा आहे. धनलाभ व वस्त्रलाभ शुक्र करून देणारा आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. घरात आनंददायक घटना घडतील. चैनीच्या वस्तू खरेदी होतील. काळ सुखात जाईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.
     
  वृश्चिक :परदेशगमन होईल
शनि महाराजांची साडेसाती नुकतीच सुरू झाली आहे. शनि हा कठोर शिक्षक आहे. हातून चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी. शनि अर्थदाता आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. घरात आनंदाचा काळ येईल. सुशिक्षित बेकारांचा परदेशागमन योग येईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना महत्वाचे कामात गुप्तता राखणे जरूर आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांची मर्जी संपादन करणे जरूर आहे. तब्येतीची काळजी घ्यावी. जुने आजार पुढे येणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.
     
  धनु : सुख मिळेल
धनु राशीच्या व्यक्ती प्रगती व उत्कर्षाच्या वाटेवर उभ्या आहेत. अशक्य ते शक्य व चिरकाल टिकणारे सौख्य आपणाला लाभणार आहे. आपली स्थिती आपणाला लाभणार आह. आपली स्थिती घेता किती दो कराने अशी होणार आहे. शत्रू मित्र बनतील. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. व्यापारी वर्गाच्या व्यवसायात वृध्दी होवून अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. यश, किर्ती प्रसिध्दीचे झोतात कलाकार येतील. काळ सुखात जाईल.
     
 

मकर : मात कराल

या महिन्यात गुप्त शत्रू व गृहस्थिती यावर आपण मात करणार आहात. आर्थिक आवक अपेक्षित राहिल. राहू, केतू आपणाला सुख शांती मिळवून देणारे आहेत. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विवाह इच्छूंचे विवाह जुळतील. वस्त्रलाभ होईल. वाहनापासून सावधानता बाळगावी. नवीन वास्तू खरेदी योग आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. अचानक धनलाभ संभवतो. मानसिक स्वास्थ्य लाभेल.
     
  कुंभ : स्वास्थ्य लाभेल
पदरमोड करून दुसऱ्याचं हीत यशस्वी करून देणारी आपली रास आहे. निरपेक्ष बुध्दी, त्याग व अध्यात्मिक उपासना या साऱ्यांचा या महिन्यात उपयोग होणार आहे. अपेक्षित अर्थप्राप्ती, प्रसिध्दीचे झोतात याल. वस्त्रलाभ होवून मानमुराद मिळेल. अध्यात्मिक उपासना फळाला येईल. मात्र अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. स्वप्नदृष्टांत खरे होतील. तीर्थक्षेत्र पहाणेचा योग येवून संतांचा सहवास लाभेल. वैरी निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. वारसा इस्टेटीचा लाभ संभवतो. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल व विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. स्वास्थ व आनंद देणारा हा महिना आहे.
     
  मीन : प्रगती होईल
उत्कर्षाच्या लाटेबरोबर माणसाने पुढे जाणेच योग्य होईल. अनुकूल ग्रहमान यश व किर्ती देईलच. शिवाय इच्छापूर्ती करणारे आहे. गुरूकृपा होवून अनेक समस्या दूर होतील. शत्रूंवर मात कराल. राजकीय व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद व कीर्ती लाभेल. आर्थिक अडचणी दूर होतील. स्वास्थ्य लाभेल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. अपेक्षापूर्ती होवून मन आनंदी राहिल. सुशिक्षित बेकारांना नोकरी लागून परदेशागमन योग येईल. अनेक योजना फलद्रुप होतील. दूरचा प्रवास होईल. व्यापारी, कलाकार व खेळाडू यांना आर्थिक लाभ व यश मिळेल.