![]() |
![]() |
|||
| दिनांक: | ||||
![]() |
| मासिक राशीभविष्य | |
| नोव्हेंबर 2009 | |
| रमेश बा. मावळंकर रत्नागिरी मोबाईल-9860886993 |
![]() |
| ग्रहस्थिती | |
| 2 नोव्हेंबर -राहू धनुत व केतू मिथुन 3 नोव्हेंबर शुक्र-तुळेत, 12 नोव्हेंबर बुध वृश्चिकेत, 16 नोव्हेंबर रवि-वृश्चिकेत, मंगळ कर्केत, शनि कन्येत. यक्ष लाभेल | |
| मासिक राशीभविष्य |
| > ऑक्टोबर 2009 |
![]() |
![]() |
मेष : आर्थिक लाभ होईल | |
| या महिन्यात शनि, राहू व केतू यासारखे बलाढय ग्रह आपल्याला अवघड कार्यात यश संपादन करून देणारे असून आपल्या आर्थिक, सामाजिक उत्कर्षाचा रथ कुणीही थांबवू शकणार नाही. शनि महाराजांच्या कृपेने अचानक आर्थिक लाभ, पुत्र सौख्य, सर्वसुख व सौख्यवृध्दी होऊन आपले व्यक्तीमत्व उजळणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना हा महिना उत्कर्षाचा व भरभराटीचा जाईल. नवीन घर, वाहन सौख्य व मानमुराद तसेच चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने महिला खुष होतील. बुध महाराज कृपेने गर्भवतींना पुत्रयोग संभवतो. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना व कलाकारांना उत्तम योग येऊन प्रसिध्दी मिळेल. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवणेस गुरूमहाराज सांगत आहेत. लवकरच इच्छापूर्ती होण्याचा काळ जवळ येऊन ठेपला आहे. आर्थिक भरभराट होईल. मंगळ महाराज घरगुती वाद वाढवू नयेत व तब्येतीची काळजी घेणेस सांगत आहेत. गुरूकृपा होईल |
||
![]() |
वृषभ : गुरूकृपा होईल | |
| या महिन्यात गुरूकृपेमुळे आपणला अध्यात्मिक प्रगती होणार आहे. याशिवाय यश, किर्ती व मानमुराद मिळून आपले जीवन सफल होणार आहे. मंगळ महाराज धैर्य व अनेक अडचणींवर आपणाला मात करणेस प्रवृत्त करून आपणाला नवीन वास्तू खरेदी योग देणारे आहेत. आपण विजयश्री आपल्या बुध्दीचातुर्याने व कर्तृत्वाने खेचून आणणारे आहात. मानसन्मान, उच्चपद व कितीं यांच्या झोतात रहाल. यशाच्या प्रगतीपथावर आपण राहणार आहात. अखेर हिम्मत असेल त्यालाच किंमत मिळेल याची प्रचिती येईल. मात्र हे सर्व करताना अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. व्यापारी व नोकरवर्गाला अपेक्षित अर्थलाभ संभवतो. खेळाडूंची उत्तम प्रगती होईल. रविकृपेने जुने आजार नष्ट होऊन तब्येत उत्तम राहिल. काळ सुखात जाईल. राहू केतू अचानक खर्च उभा करणेची शक्यता आहे. तसेच शुक्र महाराज शत्रू निर्माण करणेची शक्यता नाकारता येत नाही. तरी सावधानता बाळगावी. शेतकरी, मेंढपाळ व गुरांचा व्यापार करणारे यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कवि, लेखक, कलाकारांना उत्तम संधी मिळून ते प्रकाशझोतात येतील. | ||
![]() |
मिथुन : उत्साह वाढेल | |
| या महिन्यात बहुतांशी बलाढय ग्रह आपल्या विरोधात उभे असले तरी बुध, शुक्र आपणाला उत्तम साथ देऊन आपला दर्जा उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. अचानक वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ दर्शवितो. व्यापारी व कारखानदार यांना गुंतवणुकीतून लाभ होईल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. लवकरच आपणावर गुरूकृपा होणार आहे. तेव्हा काळजीचे कारण नाही. त्यातच आपला खर्च कमी करणेसाठी राहू महाराज आपल्याला खर्चावर नियंत्रण ठेवणेस सांगत आहेत. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना बढती व धनलाभ संभवतो. कवि, लेखक व कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होवून प्रसिध्दी मिळेल. मनाची एकाग्रता हीच यशाची गुरूकिल्ली आहे. तेच करणे आवश्यक. केतू महाराज मनाची स्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतील. अध्यात्मिक उपासना वाढविणे आवश्यक. कलागुणांचा विकास होईल. शेतकरी, गुरांचे मालक व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. गुरू महाराज तब्येतीची काळजी घेणेची सूचना करत आहेत. एकंदरीत हा महिना दगदग व धावपळीचा तथापि अपेक्षित अर्थप्राप्ती व यशाचा आहे. | ||
![]() |
कर्क: धनलाभ होईल | |
| गेली अनेक वर्षे आपण शनी महाराजांच्या अवकृपेमुळे त्रासात व मानसिक ताणतणावात होतात. परंतु या महिन्यापासून आपणावर शनिकृपा होणार असून आपल्या अनेक समस्या दूर होवून आपणाला यश किर्ती व सन्मान मिळणार आहे. शासकीय नोकरीत असणाऱ्यांना आर्थिक लाभ, प्रमोशन व अपेक्षित ठिकाणी बदली संभवते. मंगल कार्यानिमित्त प्रवास होईल. आर्थिक समस्या चुटकीसरशा सुटतील व खरी मनःशांती मिळेल. राहू महाराज अचानक धनलाभ करून देतील. चैनीच्या वस्तू व कार्यासाठी मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल. वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ संभवतो. शत्रुवर मात करून आपणास योग्य न्याय मिळेल. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. कवि, लेखक व कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होवून प्रसिध्दी लाभेल. गृहराज सर्व सुखात अडथळे आणण्याची शक्यता आहे. शक्यतो वाद विकोपाला जाऊ न देणे योग्य ठरेल. विद्यार्थी, खेळाडू यांना यश मिळेल. नवीन वास्तू खरेदी योग आहे. त्यामुळे महिला वर्गात आनंद व सौख्य होईल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना चांगल्या स्वप्नांची प्रचिती व अध्यात्मिक उन्नती दर्शविते. एकंदरीत हा महिना आपली इच्छापूर्ती करणार आहे. | ||
![]() |
सिंह : कष्टाचं चीज होईल | |
| व्यवस्थानातील मंगळ जरी धननाश करणारा व उष्णतेचे विकार देणारा असला तरी ग्रहराज रवि व कलागुणांचा विकास करणारा शुक्र हे दोन ग्रह आपला सामाजिक, राजकीय दर्जा वाढविणारे असून अनेक अवघड कार्यात यश मिळवून देणारे आहेत. आपल्या कार्याचं, कष्टाचं व बुध्दीचातुर्याचं चीज होऊन आपले व्यक्तीमत्व उजळेल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित ठिकाणी बदली, बढती व अर्थप्राप्तीचे योग आहेत. अनेक प्रकारचे धनप्राप्ती योग आहेत. जमीन खरेदी योग, वाहन खरेदी होईल. परदेशागमन योग संभवतो. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. घरात मंगलकार्य होईल. शुक्र ऐश्वर्य देणारा आहे. उद्योजक, व्यापारी व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती व व्यवसायात वाढ होईल. मात्र घरातील वयोवृध्द व्यक्तींच्या तब्येतीकडे वेळीच लक्ष पुरविणे गरजेचे आहे. शेतकरी, दुग्धव्यावसायिक व लॉटरी व्यावसायिक यांना अचानक अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते. एकंदरीत आपणाला सुख व शांती मिळवून देणारे लाभदायक ग्रहमान आहे. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. | ||
![]() |
कन्या : संयम ठेवा | |
| सध्या आपण शनीमहाराजांच्या साडेसातीच्या चक्रात अडकलेले आहात, तेव्हा मोठे निर्णय विचारपूर्वक व थोरामोठयांच्या सल्ल्याने घेणे उचित ठरेल. आपण धाडसी पराक्रमी व बुध्दीवादी आहात व लोकसेवा आपला गुणधर्म आहे. या महिन्यात बलाढय व कीर्तिदाता गुरू आणि कलागुणांचा विकास करणारा शुक्र हे दोन ग्रह आपणाला उत्तम सहकार्य करून आपला सामाजिक दर्जा उंचावणारे आहेत. अपेक्षित धनलाभ, यश, कीर्ति व मानसन्मान आपणाला मिळून आपले व्यक्तीमत्व उजळून निघेल. कवि, लेखक, कलाकार व खेळाडूंना उत्तम प्रसिध्दी लाभेल. विशेषतः सौंदर्यप्रसाधनाचा व्यवसाय करणाऱ्यांना अपेक्षित अर्थप्राप्ती मिळेल. विवाहितांचे विवाह अपेक्षेप्रमाणे जुळून येतील. तथापि शनीमहाराज जुने आजार पुढे येऊ देणार नाहीत याची काळजी घ्यावी. मंगळ आपल्या तब्येतीची काळजी घेणारा आहे. आरोग्य उत्तम लाभेल. नवीन वास्तू व चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने महिला वर्ग खुशीत राहिल. गर्भवतींना पुत्रयोग संभवतो. एकंदरीत हा महिना सुखसमृध्दीत जाणारा आहे. | ||
![]() |
तुळ : शनी उपासना करा | |
| आपला राशीस्वामी उत्साही शुक्र आपणाला अवघड कार्यात यश संपादन करणेसाठी उत्तम साथ देणारा आहे. या महिन्यात आपण शनीच्या साडेसातीच्या फेऱ्यातून जात आहात. पण काळजी करण्याचे कारण नाही. शनीचे कार्य म्हणजे कार्यात अडथळे निर्माण करणे. आपल्या बुध्दीचातुर्याचा, समयसुचकतेचा आणि अनुभवाचा पुरेपूर फायदा घेऊन शनीवर मात करणेस राहूसारखा बलाढय ग्रह आपल्या पाठिशी उभा आहे. मंगळ मात्र शारिरीक पीडा देणेची शक्यता आहे. तेव्हा आपणाबाबत गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घेणे उचित ठरेल. बुध्दीकारक बुध आपल्याला धनलाभ करून देईल. लेखक व कवि यांना प्रसिध्दी मिळेल. व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक मंडळींना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिध्दी व कीर्ति मिळेल. विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी एकाग्रता करणे आवश्यक आहे. गुरू महाराज घरगुती समस्या वाढविणेचा प्रयत्न करतील. तरी वादविवाद टाळावेत. या महिन्यात आपल्याला कर्र्तृत्वाचा व कार्याचा सुगंध सर्वत्र दरवळून आपण प्रसिध्दीच्या झोतात याल. | ||
![]() |
वृश्चिक : भरभराट होईल | |
| या महिन्यात राहू व केतू यासारखे बलाढय ग्रह आपणाला अनाठायी खर्च करणेस लावणारे असले तरी शनीसारखा अर्थदाता ग्रह आपल्या पाठिशी खंबीर उभा राहणार असून आपल्या आर्थिक समस्या सहजगत्या सोडविणार आहे. आपणाला यश, कीर्ति व वैभवप्राप्ती होणेचा योग आहे. मात्र खाण्यापिण्यावर बंधन ठेवणे आवश्यक आहे. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे उचित ठरेल. मंगळ महाराजांची आपणावर अवकृपा आहे तेव्हा अती धाडस न करणे हितावह होईल. परदेशागमन योग होईल. व्यावसायिक व्यक्तींना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. सौंदर्यप्रसाधनांचे व्यापाऱ्यांना विशेष लाभ होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाडूंना यश संपादन करता येईल. लेखक, कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी लाभेल. हा महिना आर्थिक समस्या सोडवून भाग्य उजळणारा जाईल. | ||
![]() |
धनु : सावधानता बाळगा | |
| आपल्या राशीला 2 नोव्हेंबर 2009 ला आलेले राहू व केतू मानसिक ताण व घरगुती समस्या निर्माण करणारे असले तरी या महिन्यात आपणावर गुरूकृपा झाली असल्याने घाबरण्याचे कारण नाही. मंगळ वाहन व उष्णतेचे विकारांपासून सावध राहणेची सूचना देत आहेत. शुक्रासारखा हौशी मौजी व कलागुणांचा विकास करणारा ग्रह आपणाला मानाचे स्थान देऊन कलागुणांचा विकास करणारा आहे. शनीमहाराज कुणालाही दुखवू नका अशी सूचना करतोय व अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणेची सूचना देतोय. या महिन्यात वस्त्र खरेदी होईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी व पैसा मिळेल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. व्यापाऱ्यांनी आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. कोर्टकचेरीचे निकाल आपल्या बाजूने लागतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे. या महिन्यात गुरूकृपेने अनेक कार्यात यश मिळून प्रसिध्दी व कीर्ति लाभेल. गर्भवतींना पुत्रयोग संभवतो. हा महिना मनोकामना पूर्ण करणारा आहे. | ||
![]() |
मकर : परदेशागमन होईल | |
| गुरूकृपा झाली की काय, अशक्य आहे? गुरू म्हणजे परब्रह्म, गुरू म्हणजे साक्षात ईश्वरच, या महिन्यात आपला परदेशागमन योग आहे. कीर्ति, प्रसिध्दी व कार्यसिध्दी होणार आहे. राजकीय, सामाजिक व सरकारी नोकरीत असणाऱ्यांचा दर्जा वाढविणारा ग्रहराज रवि आपल्या पाठिशी आहे. कार्याचं व कर्तृत्वाचं खऱ्या अर्थाने चीज होऊन स्वास्थ्य लाभेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींची उपासना वाढेल व स्वप्नदृष्टांताने अवघड गोष्टीचा उलगडा होऊन कार्यसिध्दी होईल. शनीमहाराज वेळीच घरातील मोठया व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घेणेस सांगत आहेत. मंगळ घरात कलह करणेची शक्यता नाकारता येणार नाही तरी वादविवाद विकोपाला जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. नवीन योजना कार्यान्वित होतील. भागिदारीत व्यवसाय न करणे योग्य होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे उचित होईल. बुध महाराज आपल्याला आर्थिक मदत करणेस समर्थ आहे. एकंदरीत हा महिना योग्य ती काळजी घेतल्यास सुख, शांती व समाधानाचा जाईल. | ||
![]() |
कुंभ : मनोकामना पूर्ण होईल | |
| या महिन्यात आपणाला राहूसारखा बलाढय ग्रह आपणाला सौख्य व ऐश्वर्य प्राप्त करून देणारा आहे. आपणाला अनेक अवघड कार्यात यश देणारा आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. वारसा हक्काने इस्टेटीचा लाभ दर्शवितो. धाडसी, पराक्रमी मंगळ शत्रुंवर विजय मिळवून देणारा आहे. कलह समाप्त होतील. शत्रू मित्र बनतील. आजार दूर पळतील. कलागुणांचा विकास करणारा शुक्र आपणाला सर्व सुख मिळवून देणारा आहे. मात्र शनीमहाराजांची आपणावर तेवढी कृपा नसल्याने मुलाबाळांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. ग्रहराज रवि फार मोठी जबाबदारी स्विकारू नये. अन्यतः मानभंग होणेची शक्यता आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीनी उपासना वाढवावी. शनी कार्यात अडथळे निर्माण करणेची शक्यता करणेची शक्यता आहे. लेखक, कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी लाभेल. एकंदरीत हा महिना मनोकमना पूर्ण करणारा आहे. | ||
![]() |
मीन : भाग्य उजळेल | |
| गुरूकृपा झाली तर पंगू मनुष्य देखील पर्वत चढू शकतो व मुका माणूस देखील उत्तम भाषण करू शकतो. तेव्हा आपणावर या महिन्यात गुरूकृपा झाली असून आपण यश, किर्ती, प्रसिध्दी व आर्थिक लाभ मिळवणार आहात. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभून मानसन्मान मिळेल. आनंद नेहमी संयमाने द्विगुणित करायचा असतो. कारण राहू, केतू व मंगळ हे ग्रह आपल्या आनंदावर विरजण घालणेची शक्यता नाकारता येत नाही. वैर निर्माण होणार नाही याची काळजी घेणे योग्य होईल. ग्रहराज रवि या सर्वातून मार्ग काढून आपले व्यक्तीमत्व उजळविणारे आहेत. उत्साही शुक्र अचानक धनलाभ करून देईल व आर्थिक समस्या सोडविणारा आहे. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. व्यापारी, उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. एकंदरीत हा महिना सुखसमृध्दी व आनंद देणारा आहे. | ||