दिनांक:
 
 
मासिक राशीभविष्य
सप्टेंबर-2010
रमेश बा. मावळंकर
(ज्योतिषाचार्य)
रत्नागिरी
मोबाईल-9860886993
   
   
  मेष :- व्यक्तिमत्व उजळेल.
या महिन्यात आपणावर बलाढय ग्रहांची कृ पा असून आपल्या आर्थिक समस्या सुटून आपले व्यक्तिमत्व उजळणार आहे. फक्त सौख्य उत्तम मिळेल. मात्र घरातील वादविवाद वाढवू नयेत. डोळे व पोट यांच्या विकारापासून वेळीच सावधानता बाळगावी. अध्यात्मिक उपासनेचे उत्तम फळ मिळेल. व्यापारी उद्योगपति व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ति होईल. राजकीय क्षेत्रांतील व सरकारी क्षेत्रातील व्यक्तिंना उच्चपद लाभेल विवाह इच्छुंचे विवाह जुळतील.
     
  वृषभ :-धनलाभ होईल.
या महिन्यात गुरु आपणाला यश कीर्ति मान सन्मान देणार असून अचानक धनलाभ होऊ न आर्थिक समस्या सुटतील. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग आहे. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विरोधकांपासून सावधानता बाळगावी. तसेच आर्थिक अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे. व्यापारी वर्गाला अर्थप्राप्ती अपेक्षित होईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. मंगळामुळे जमिन जुमल्याचे व्यवहार सुरळीत पार पडतील. तब्बेत चांगली राहील.
     
  मिथुन :- उच्चपद लाभेल
या महिन्यात आपणावर ग्रहराज रवि प्रसन्न असून आपला सामाजिक दर्जा उंचावणार आहे. अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. मुळाबाळंाच्या प्रकृ तिची काळजी घ्यावी. तब्बेतीची काळजी घेणे जरुर आहे. घरातील वाद वाढवू नयेत. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग आहे. सरकारी कर्मचारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तिचा उच्चपद संभवते. विवाह इच्छुंचे विवाह होतील. व्यावसायीकांना अपेक्षीत अर्थप्राप्ति होईल. हा महिना सुखात भर करणारा आहे.
     
  कर्क :- भाग्योदय होईल
शनि कृ पा म्हणजेच भाग्योदय. या महिन्यात गुरु व शनि हे भाग्योदय व भरभराट करणारे ग्रह आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत तेव्हा काळजीचे कारण नाही कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बढती व बदलीचे योग आहेत. राजकीय क्षेत्रांतील व्यक्तिंना उच्चपद व आर्थिक लाभ होतील. नविन मित्र व मैत्रिणींचा सहवास लाभेल. आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थांने भाग्योदय होणार आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. अचानक धनलाभ संभवतो.
     
  सिंह :- खर्च टाळा
या महात आपले ग्रह संमिश्र फळ देणारे आहेत. आपण शनिच्या साडेसातीच्या अंतीम टप्प्यात आहात, शनि खुप खर्च करवणारा व कर्जबाजारी करणारा आहे. तेव्हा अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे. केतु सारखा बलाढय ग्रह आपणाला मनोकामना पूर्ण करु देईल. नवीन घर खरेदी होईल नातेवाईक ांचे सहकार्य मिळेल. मात्र जुने आजार पुढे येण्याची शक्यता आहे तरी बंधनात रहाणे योग्य.धाडसी मंगळ अवघड कार्यात यश देईल व्यापारी वर्गाला अपेक्षीत अर्थप्राप्ति होईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील.
     
  कन्या : मर्जी सांभाळा
अंधारातून जाताना धावणे योग्य नव्हे हा काळ आपणाला प्रत्येक बाबतीत सावधानता बाळगणेस सांगत आहे. गुरू महाराज आपले रक्षण करणेस भक्कमपणे आपल्या पाठिशी उभे आहेत. कठोरता टाळावी. कारण शत्रू निर्माण होतील. गर्भवतींना पुत्रप्राप्तीचा योग संभवतो. घरगुती अडचणींना सामोरे जावे लागेल. धनलाभ होईल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. शासकीय सेवेतील व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी सांभाळणे योग्य होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते. तब्येतीची काळजी घेणे जरूरीचे आहे.
     
  तुळ : सौख्य लाभेल
आपला राशीस्वामी शुक्र आपणावर खूष असल्याने हौशी मौजीला पोषक आहे. आपले वैरी दूर जातील. राहुसारखा बलाढय ग्रह सौख्य व धनलाभ देऊन मनोकामना पूर्ण करणारा आहे. ग्रहराज रवि आपले व्यक्तीमत्व उजळवेल. मात्र अधिकाराचा दुरूपयोग करू नये. प्रकृती उत्तम राहिल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. उत्कर्ष होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित धनलाभ होईल. मन शांत ठेवून विचारपूर्वक निर्णय घेणे जरूरीचे आहे.
     
  वृश्चिक : गुरूकृपा होईल
गुरूकृपा होणे ही पुण्याईची बाब आहे. या महात आपणावर गुरूकृपा झाल्याने अनेक प्रकारची सुख, मित्र सहकार्य उत्तम लाभेल. शासकीय व राजकीय या क्षेत्रातील व्यक्तींना उच्च दर्जाची प्राप्ती होऊन मनमुराद व प्रतिष्ठा मिळेल. विवाह इच्छुकांचे अपेक्षित विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला उत्तम धनलाभ होईल. तब्येत सांभाळणे योग्य होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य. शनि महाराज वैभवप्राप्त करून देणारे आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी लागेल. काळ सुखात जाईल.
     
  धनू : यश लाभेल
या महिन्यात आपणावर धाडसी व पराक्रमी मंगळ तसेच कलागुणांचा विकास करणारा शुक्र आपणाला अपेक्षित अर्थलाभ, उत्तम आरोग्य देणारा असून आपली प्रतिमा जनमानसात उजळून निघणार आहे. मानसिक संतुलन बिघडू न देता विचारपूर्वक अवघड कामात यश पदरी पडणार आहे. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे उचित होईल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. धाडसाने पुढे यावे. यश आपणालाच आहे. व्यापारी क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होवून प्रसिध्दी लाभेल.
     
  मकर : नियंत्रण ठेवणे
या महिन्यात आपणावर केतूकृपा होणार असून आपण अवघड कार्यात भरघोस यश प्राप्त करून घेणार आहात. नवीन घर खरेदी योग आहे. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. तसेच अपेक्षित धनप्राप्ती संभवते. मंगळमहाराज कार्यात विघ्न आणण्याची शक्यता आहे. तरी योग्य ती दक्षता घ्यावी. व्यापारी वर्गाने दक्षतापूर्वक व्यवहार करावेत. उष्णतेच्या विकारांपासून सावध रहा. आवकपेक्षा जावक जास्त करू नका. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींनी उपासनेत खंड पडू दे नये. पैसा योग्य ठिकाणी गुंतवून ठेवणे हितावह होईल.
     
  कुंभ : स्वास्थ्य लाभेल
आपण अत्यंत दयाळू व परोपकारी वृत्तीचे आहात. आपल्या कष्टाचे, कर्तृत्वाचे व मेहनतीचे फळ आपणाला लवकरच गुरूकृपेने होणार आहे. राहुमहाराज आपल्याला सर्व प्रकारची सुखे व ऐश्वर्य देण्यास आपल्या पाठिशी उभे आहेत. ज्यांच्यात हिंमत आहे, त्यालाच किंमत आहे. तरी अत्यंत धाडसाने, पूर्ण विश्वासाने अनेक वर्षे अडलेल्या कामात यश संपादन करून घ्यावे. स्वतंत्र व्यवसायात अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. घरातील कलह व विवाह विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्या. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. एकंदरीत हा काळ सुखशांती देणारा ठरेल.
     
  मीन : भाग्य उजळेल
या महिन्यात आपला परदेशागमनाचा योग संभवतो. आपणावर गुरूकृपा होणार असून आपणाला मानसिक स्वास्थ्य व विजय प्राप्त होणार आहे. मंगळ महाराजांमुळे आपणाला शारिरीक इजा होण्याची शक्यता असल्याने वाहने जपून चालवा. कवि, लेखक, सिने क्षेत्रातील कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होवून प्रसिध्दी मिळेल. वारसाहक्काने इस्टेटीचा लाभ होण्याची शक्यता आहे. ग्रहराज रवि आपल्या शत्रूंना मित्र बनवेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित धनप्राप्ती संभवते. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. शक्यतो प्रवास टाळावा. आपल्या कर्तृत्वाने व वक्तृत्वाने समाजात मान व प्रतिष्ठा मिळवाल. हा महिना आपणाला यश किर्ती व लाभ देणारा आहे.