दिनांक:
 
 
मासिक राशीभविष्य
ऑगस्ट 2010
रमेश बा. मावळंकर
(ज्योतिषाचार्य)
रत्नागिरी
मोबाईल-9860886993
   
   
  मेष : उत्कर्ष होईल..
या महिन्यात शनि, मंगळ, केतु या सारखे बलाढय ग्रह आपल्याला यश किर्ती व धनलाभ देणारे आहेत. शासकीय व राजकीय क्षेत्रातील व्यक्तिंना उत्तम काळ. मंगळ आपली तब्बेत ठीक करणारा आहे शत्रु मित्र बनतील. अचानक धनलाभ संभवतो. मात्र बुध कामात व्यत्यय आणणारा आहे, तरी सावधानता बाळगावी. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंना गुरूकृपा होणार आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ति होईल.ईल.
     
  वृषभ : खर्चावर नियंत्रण ठेवा.
या महिन्यात राहू, केतु हे ग्रह अनाठायी खर्च करणेस लावणारे आहेत. तसेच शनि, मंगळ हे ग्रह घरातील कलह वाढवून मानसिक त्रास देणारे आहेत तरी वेळीच या सर्वांवर नियंत्रण ठेवणे उचित होईल, तथापी या सर्वांवर मात करून आपले व्यक्तिमत्त्व रवि महाराज उजळविणारे आहेत तेव्हा चिंता करण्याचे कारण नाही. पैसा विचारपूर्वक गुंतवावा. गर्भवतींना पुत्रप्राप्ति योग संभवतो. राजकीय, सामाजिक व सरकारी क्षेत्रातील व्यक्तिंना उच्च दर्जा, उत्तम धनयोग संभवतो. गुरू कीर्ति व मानसन्मान वाढवेल.
     
  मिथुन : समस्या दूर होतील.
या महिन्यातील ग्रहमान मिश्र स्वरूपाचे आहे. राहू, केतु आपणाला मानसिक ताण व गृहकलह करणारे आहेत, शुक्र महाराज आपणाला सुखाचे मार्ग खुले करून देईल. मित्रांचे सहकार्य उत्तम लाभेल. अचानक धनलाभ संभवतो इस्टेटीचे व्यवहारात यश लाभेल. गुरू किर्ति व यश देणारा आहे तो मनोकामना पूर्ण करणेस मदत करेल. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. व्यापारी, कारखानदार व उद्योगपति यांना अपेक्षित अर्थप्राप्ति होईल. वरिष्ठांची मर्जि संपादन करणे हे शासकीय कर्मचा-यांना योग्य होईल.
     
  कर्क : भाग्य उजळेल..
या महिन्यात बहुतांशी बलाढय ग्रह आपणावर खुष असून आपले भाग्य उजळण्याचा काळ जवळ आला आहे. शनिची धास्ती आता घेऊ नका. तोच शनि आपणाला अनेक प्रकारचे लाभ, नोकरीत बढती बदली. इ. देणार आहे . शत्रु मित्र बनतील. मित्र व नातेवाइकांचे सहकार्य उत्तम लाभेल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ति होईल. आता धाडसी मंगळ आपणाला उत्तम साथ देणारा आहे, गुरू सौभाग्य, सिध्दी देणारा आहे. इस्टेट लाभ होण्याची शक्यता आहे.
     
  सिंह : श्रध्दा स्थान वाढवा.
मोह होण्यासाठी श्रम, उच्च विचार, सद्सदत् विवेक बुध्दी सबूरी व मोठयांचे आशिर्वाद हे असण मोलाचे आहे. देव व दैव बलवत्तर असावे लागते. शनि व मंगळ हे दोन बलाढय ग्रह आपणाला खर्चावर नियंत्रण
ठेवणेस सांगत आहेत, शनिच्या साडेसातीचा ससेमिरा आहेच, तेव्हा विचारपूर्वक निर्णय घेणे उचित ठरेल. जुने आजार पुढे येणार नाहीत याची काळजी घ्यावी. इस्टेट नविन घेण्याचा योग मात्र अवाक्याचा आहे खर्चाची शक्यता. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला उत्तम लाभ होतील.
     
  कन्या : व्यक्तिमत्त्व उजळेल.
या महिन्यात आपणावर गुरूकृपा होणार आहे. प्रतिष्ठीत व्यक्तिंकडून कार्याच, बुध्दीमत्तेच चीज होऊन सन्मान होईल. राजकीय, शासकीय व सामाजिक कार्य करणा-यांना उच्चपद व दूरचा प्रवास संभवतो. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. प्रियजनांच्या गाठीभेटी होऊन इच्छापूर्ति होईल. हे सर्व मिळाल्यावर संय्यम, माघार व श्रध्दा ठेवूनच विचाराने वागावे अन्यत: शत्रु निर्माण होण्याची शक्यता आहे. शनि जुने आजार पुढे आणण्याची शक्यता आहे. ग्रहराज रवि आपणाला मान्यता प्राप्त करून देईल.
     
  तूळ : विचाराने वागा.
शनिसारखा बलाढय ग्रह व मंगळासारखा दुष्ट ग्रह आपल्या विरोधात उभे असल्याने प्रत्येक व्यवहारात विचारानेच पाऊल टाकणे योग्य होईल. या सर्वांवर मात करून आपले व्यक्तिमत्त्व उजळण्यास ग्रहराज रवि समर्थ आहेच, तेव्हा चिंता करण्याचे कारण नाही. अचानक धनलाभ होण्याचा संभव आहे. सरकारी क्षेत्रातील व्यक्तिंनी वरिष्ठांची मर्जि संपादन करणे आवश्यक. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. शत्रु निर्माण होणार नाहीत याची काळजी घेणे जरूरीचे आहे. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करणे योग्य. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल.
     
  वृश्चिक : भाग्य उजळेल.
या महिन्यात आपणावर शनिमहाराज खुष असून आपल्या आर्थिक समस्या सुटणार आहेत. गुरू आपणाला यश किर्ति व मानसन्मान देणारा असून गर्भवतींना पुत्रप्राप्ति योग आहे. मात्र आर्थिक अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे जरुरीचे आहे. तब्बेतीची काळजी घेणेस केतु सांगत आहे. सरकारी नोकरवर्ग व्यापारी, उद्योगपति यांना अपेक्षित अर्थप्राप्ति होईल. एखादे लॉटरी तिकीट घेऊन नशिब आजमावण्यास हरकत नाही. अचानक धनलाभ होईल.
     
  धनु : संय्यम बाळगा.
या महिन्यात बहुतांशी बलाढय ग्रह आपल्या विरोधात उभे आहेत तेव्हा विचापूर्वक वागणे जरूर आहे. घरातील व्यक्तित वैर निर्माण होणार नाही व घरात कलह होणार नाही याची काळजी घ्यावी. उष्णतेचे विकार, जुने आजार या पासून सावध रहावे शेतकरी वर्गाने जनावरांपासून सावध रहावे. शासकीय कर्मचा-यांनी वरिष्ठांची मर्जि संभाळणे योग्य होईल. हा महिना संय्यम बाळगण्याचा आहे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ति होईल. इस्टेटीचे प्रश्न व कोर्टकचेरी यापासून दूर रहाणे योग्य होईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील.
     
  मकर : यशस्वी व्हाल.
या महिन्यात केतुसारखा बलाढय ग्रह व बुध आणि शुक्र आपणाला अचानक धनलाभ व इस्टेट लाभ करून देणारे आहेत. आर्थिक समस्या सुटून आपले व्यक्तिमत्त्व उजळणार आहे. परदेशागमन योग आहे. राहू अनाठायी खर्च करणेस लावेल तरी वेळीच सावधानता बाळगावी. सरकारी कर्मचारी, व्यापारी व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ति व उच्चपद लाभेल. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. गर्भवतींना पुत्रप्राप्ति योग संभवतो. शनि व मंगळ कार्यात अडथळे आणून मानसिक दौर्बल्य येण्याची शक्यता आहे तरी काळजी घ्यावी.
     
  कुंभ : इच्छापूर्ति होईल.
आपली बरेच वर्षाची इच्छा पूर्ण होण्याचा काळ आहे. यश किर्ति व मानमुराद मिळून आपणाला सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आपल्यार् कत्तुत्त्वाच, बुध्दीमत्तेच व दातृत्त्वाच चीज होईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे जरूरीचे शासकीय सेवेतील वर्गाला बढती व बदली योग संभवतो. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. राहू महाराज आपणाला सौख्य व ऐश्वर्य प्राप्त करून देणारे आहेत. व्यापारी कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ति होईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. काळ सुखात जाईल. शनि महाराज तब्बेतीची काळजी घेणेस सुचवत आहेत.
     
  मीन : संयम ठेवा.
या महिन्यात मंगळ व शनि हे जरी कार्यात अडथळे आणणारे असले तरी केतु, गुरू, बुध हे कार्यात यश देणारे आहेत. दुरचा प्रवास संभवतो. घरगुती अडचणींवर मात कराल. शनि महाराज अकारण दौर्बल्य आणण्याचा प्रयत्न करेल तरी मन खंबीर व योग्य कृति ठेवणे आवश्यक आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. बुध्दीकारक बुध विजय प्राप्त करून देईल व कारखानदार उद्योगपति यांना अपेक्षित धन मिळेल. हा महिना दगदगीचा संभवतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासात मेहनत करावी उत्तम प्रतिसाद लाभेल.