दिनांक:
 
 
मासिक राशीभविष्य
जुलै 2010
रमेश बा. मावळंकर
(ज्योतिषाचार्य)
रत्नागिरी
मोबाईल-9860886993
ग्रहस्थिती  
ग्रहस्थितह : - शुक्र - 5 जुलै सिंहेत, बुध- 6 जुलै कर्केत, रवि-16 जुलै कर्केत, मंगळ-20 जुलै कन्येत, बुध-23 जुलै सिंहेत, राहु, केतु, धनु, मिथुनेत,गुरु मीनेत.  
  मेष : उत्कर्ष होईल..
या महिन्यात आपल्या कर्तुत्वाला व बुध्दीमत्तेला योग्य न्याय मिळणार असून नविन वास्तूत प्रवेश करण्याचा योग संभवतो. वाहन सौख्य, अचानक धनलाभ व रोग,भय ,शत्रु नाश करणारे ग्रहमान आहे, तेव्हा आपली प्रगती व उत्कर्ष कु णीच थांबवू शकणार नाही. विवाह इच्छुचे विवाह जुळतील. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तिंना उच्चपद संभवते मात्र पदाचा व पैशाचा गैर उपयोग झाल्यास उत्तरार्धात त्रास होण्याची शक्यता आहे. कारखानदार,व्यापारी व उद्योगपति यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कवि व कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी मिळेल. महिलांना अपेक्षापूर्ती करणारा हा महिना जाईल.
     
  वृषभ: - गुरुकृपा होईल.
या महिन्यात राहू,केतु व शनि आपली बुध्दीमत्ता,कर्तृत्त्व पणाला लावणारे आहेत, तथापि ग्रहराज रवि या सर्वांवर मात करणेस आपल्या पाठीशी उभे असल्याने चिंता करणेचे कारण नाही. घरातील अर्थव्यवस्था,कलह व मुलाबाळांच्या तक्रारी याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. बुध्दीकारक बुध आपणाला अचानक धनलाभ करुन देणारा आहे. आर्थिक समस्या सुटतील कलागुणांचा विकास करणारा उत्साही शुक्र सुखात वाढ,धनलाभ व उत्तम मित्र मिळवून देणारा आहे. घरातील वाद मात्र वाढवू नयेत. गुरु महाराज आपणाला यश र्किती,मनमुराद देणारे आहेत. व्यापारी,कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. मनोकामना पूर्ण करणारा गुरु आहे. विवाह इच्छुचे विवाह जुळून येतील.
     
  मिथुन : प्रगती होईल.
या महिन्यात राहू,केतु व शनि आपला मानसिक ताण व घरगुती समस्या वाढविणारे असले, तरी धाडसी पराक्रमी मंगळ व कलागुणांचा विकास करणारा शुक्र आपणाला धाडस,अलंकार प्राप्ती व आपली अपेक्षापूर्ती करणारे असल्याने चिंतेचे कारण नाही. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. घरगुती इस्टेटीचे वाद उफाळून येतील तथापी धाडसी मंगलामुळे आपणाला यश मिळेल. बुध्दीकारक बुध आपल्यार् कत्तुत्त्वाला योग्य किंमत देणारा आहे. व्यापारी कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. शासकिय सेवेतील व्यक्तिंना अचानक धनलाभ व उच्चपद संभवते. गुरु महाराज अनाठायी खर्चावर व घरगुती वादविवादावर कटाक्षतेने नजर ठेवणेस सांगत आहेत. घरात शांतता प्रस्थापित होईल याकडे लक्ष पुरविणे योग्य होईल.
     
  कर्क : इच्छापूर्ति होईल.
या महिन्यात बहुतांशी बलाढय ग्रहांची कृ पादृष्टी आपणावर होणार आहे, तेव्हा आपणाला देव व दैव अनुकूल असणार आहे. शनिच्या साडेसातीतून खूप कष्ट व आर्थिक मानसिक हानि करून आता आपल्या बहुतांशी इच्छा शनि,राहू,गुरू व शुक्र पूर्ण करणार आहेत. मंगळ आपणाला धाडसाने पुढे आणेस सांगत आहात आपण प्रगतिच्या व उत्कर्षाच्या लाटेवर स्वार झाला आहात, तेव्हा पुढे जाणेच योग्य होईल. गुरूकृपा झाली व सर्व इच्छा पूर्ण होतातच. कलागुणांचा विकास करणारा शुक्र आपणाला सौख्य व ऐश्वर्य देणारा आहे, धनलाभ करून देईल. नोकरवर्गात स्थैर्यता व बढती बदलीचे योग आहेत. व्यापारी कारखानदार यांच्या उद्योगात वाढ होऊन अपेक्षित पैसा मिळेल. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. महिलांना हा महिना उत्कर्ष,आनंद व अपेक्षापूर्ति करणारा जाईल.
     
  सिंह : विचारपूर्वक निर्णय घेणे.
या महिन्यात आपली मानसिक आर्थिक व शारिरीक स्थिती बिघडवणारे ग्रहमान आहे, तेव्हा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये याची काळजी घ्यावी. आर्थिक व्यवहार जपून करावेत, तब्बेतीची काळजी उष्णविकारांपासून घेणे जरूर आहे. अनाठायी खर्चात वाढ होऊ देऊ नये. राहू घरचा ताणतणाव वाढविणारा आहे. प्रतिकूल दैव आहे, याची जाणीव ठेवा, कारण गुरूकृपा होणे कठीणच. फक्त या सर्वातून मार्ग काढणेस ग्रहराज रवि व केतु समर्थपणे आपल्या पाठीशी उभे आहेत. सामाजिक मानमुराद, कलागुणांचा विकास उत्साही शुक्र करणारा आहे. मात्र शब्द जपून वापरावेत हेच योग्य होईल. विवाहितांचे विवाह जुळून येतील. लेखक, कलाकारांना उत्तम संधी व प्रसिध्दी मिळेल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थलाभ होईल. घरातील कलह वाढणार नाहीत याची काळजी महिलांनी घ्यावी.
     
  कन्या : समस्या दूर होतील.
या महिन्यात ग्रहराज रवि व कीर्तिदाता गुरू यांची आपणावर कृपा असल्याने आपण अवघड कार्यात यश मिळवून आपला सामाजिक दर्जा उंचावणार आहे. आर्थिक समस्या दूर होतील. शुभकार्यासाठी प्रवास घडेल. परदेशागमन योग आहे. शुक्र अचानक धनलाभ देऊन विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी, कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तिंना उच्चपद व अपेक्षित जागी बदली संभवते कलागुणांचे
कौतुक होऊन व्यक्तिंमत्त्व उजळेल. मात्र पैसा व सत्ता हातात आला तरी गर्व करू नये संय्यम राखावा. शनि महाराज कठोर शिक्षक आहेत, ते मानसिक स्थिती व उष्णतेचे विकार होणार नाहीत याची काळजी घेणेस सांगत आहेत. आपल्या मनोकामना पूर्ण करणारा व मन:शांति देणारा हा महिना जाईल.
     
  तूळ : खबरदारी घ्यावी.
सध्या आपण शनिमहाराजांच्या अवकृपेच्या छायेत वावरत आहात, तेव्हा नविन जबाबदा-या व आर्थिक व्यवहार आणि शत्रुंपासून सावध रहाणे योग्य होईल. गुरू नातेवाईकांच संबंधात बाधा आणणारा आहे. शक्यतो कुणालाही शाब्दिक व आर्थिक बाबतीत दुखवू नये. धाडसी व पराक्रमी मंगळ या सर्वातून मार्ग काढून आपले सामाजिक व्यक्तिमत्त्व उजळवणारा आहे. कलागुणांचा विकार करणारा उत्साही शुक्र सिने व नाटयसृष्टीतील व्यक्तिंना उत्तम संधी व प्रसिध्दी प्राप्तकरून देणारा आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. व्यापारी उद्योगपति यांनी व्यापारात काळजीपूर्वक आर्थिक गुंतवणूक करावी. शासकीय सेवेतील व्यक्तिंना वरिष्ठांची मर्जिसांभाळणे व महत्त्वाचे कामात गुप्तता पाळणे हिताचे होईल. जुने आजार पुढे येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
     
  वृश्चिक : प्रगति होईल.
या महिन्यात राहू,केतू व मंगळ आपणाला बेजार करणारे असले तरी गुरू महाराज आपणाला उच्चपद,सुख व आपली आर्थिक समस्या दूर करणारे आहेत, तेव्हा काळजीचे कारण नाही. गुरूकृपा होणे म्हणजे भाग्योदय होणे व पूर्वपुणयाई फळाला येणे होय. शनि महाराज आपणावर वरहस्त ठेवून आहेत, तेव्हा अपेक्षित अर्थप्राप्ती लाभ,यश सहज प्राप्त होईल. शब्द जपून वापरा असा सल्ला बुध देतोय. केतु महाराज शारिरीक पीडा देणेची शक्यता आहे, तरी वेळीच सावध रहावे. व्यापारी उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होऊन उद्योगात वाढ होईल. विद्यार्थ्याची अभ्यासात प्रगती होईल. विवाह इच्छुंचे विवाह जिद्दीने जुळतील. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो.
     
  धनु : संय्यम राखा.
या महिन्यात आपणाला आपल्या बुध्दीचातुर्यांची व संय्यमाची कसरत करावी लागणार आहे. माघार घेऊन व समंजसपणाने प्रगतिपथावर जाणे हेच योग्य होईल बलाढय ग्रहांची अनुकूलता व मानसिक ताण यांचा विचार करून जास्त ताणून कोणतीही गोष्ट न ठेवणे उचित होईल. एकटा बुध्दीकारक बुध आपणाला या सर्वांतून मार्ग काढणेस आपल्या पाठीशी उभा आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. शुक्र अचानक धनलाभ करून देणारा आहे. लेखक व कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होईल. व्यापारी कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. घरातील वाद विकोपाला जाणार नाहीत याची काळजी वेळीच घेणे जरूर आहे व तब्बेतीची काळजी घ्यावी हे योग्य. शत्रुंचा जोर वाढणेची शक्यता आहे तरी सावधानता बाळगावी.
     
  मकर : प्रसिध्दी मिळेल.
ग्रहराज रवि या महिन्यात आपणावर वरदहस्त ठेऊन आहेत, तेव्हा शत्रु मित्र बनतील, तब्बेत उत्तम राहील व दु:ख नाश होऊन आपणाला उत्तम सामाजिक दर्जा प्राप्त होणार आहे. उत्साही शुक्र आपल्या कलागुणांचा विकास करेल व प्रसिध्दीच्या झोतात याल. जुनी येणी वसूल होतील. सुख प्राप्त होऊन मानसिक स्वास्थ्य मिळेल. केतुमुळे वडिलोपार्जित इस्टेट लाभ संभवतो. राहू व मंगळ ग्रह आर्थिक व्यवहार जपून करणेस सांगत आहेत, शिवाय वाहन जपून चालवावे शनि महाराज अचानक अनाठायी खर्च उभा करणारे आहेत, तेव्हा वेळीच दक्षता घेणे जरूरीचे आहे. विवाह इच्छुंचे विवाह अपेक्षित जुळतील. व्यापारी उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. महिलांनी मुलाबाळांकडे जास्त लक्ष देणे व तब्बेत संभाळणे उचित होईल.
     
  कुंभ : प्रसिध्दी मिळेल.
आपल्या प्रगतिचा,उत्कर्षाचा व आर्थिक भरभराटीचा रथ आता चौफेर उधळत योग्य दिशेने चालला आहे. तो कुणीही अडवू शकणार नाही समाजातील थोर व अनुभवी व्यक्तिंकडून आपल्या बुध्दीमत्तेची वर् कत्तुत्त्वाची चीज होऊन व्यक्तिमत्त्व उजळेल. घरगुती स्वास्थ्य मिळून अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होईल. यश,किर्ती प्रसिध्दीच्या झोतात याल. आर्थिक समस्या सुटतील. गुरू,बुध,राहू यांची कृपादृष्टी होणार आहे. आता मागे वळून बधूच नका. खात्री पटल्या शिवाय विवाह इच्छुंनी विवाह जुळवू नयेत. शनि महाराज तब्बेतिची काळजी घेणेस सांगत आहेत. इस्टेट खरेदी योग आहे. केतु महाराज खर्चावर नियंत्रण ठेवणेची सूचना देत आहेत. व्यापारी,कारखानदार यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती व प्रसिध्दी लाभेल. गृहिणींना हा महिना समाधान करून देणारा जाईल.
     
  मीन : दूरचे प्रवास होतील.
या महिन्यात आपला दूरचा प्रवास संभवतो. ग्रहमान रवि आपल्या आर्थिक समस्या सोडवणार आहे. केतु महाराज अचानक धनलाभ करून देणारे आहेत. राहू मात्र वैरी निर्माण होणार नाहीत याची काळजी घेणेस सांगतोय. रोगमुक्त रहाल तब्बेत उत्तम राहील. शत्रु मित्र बनतील. शनि महाराज घरगुती कलह वाढवू नका असे सूचवित आहे. राजकीय व सरकारी क्षेत्रातील व्यक्तिंना उच्चपद संभवते. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंना गुरूमंत्र मिळणेचा योग आहे. व्यापारी कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. घर खरेदी योग आहे. महिलांना हा महिना आनंद व सुख देणारा आहे.