![]() |
![]() |
|||
| दिनांक: | ||||
![]() |
| मासिक राशीभविष्य | |
| ऑक्टोबर 2009 | |
| रमेश बा. मावळंकर रत्नागिरी मोबाईल-9860886993 |
![]() |
![]() |
![]() |
मेष : आर्थिक लाभ होईल | |
| या महिन्यात अद्याप राशिला आलेला 6 वा शनी आपल्या अनेक आर्थिक समस्या मिटविणार आहे. पुत्र सुख, अपेक्षित आर्थिक सहाय्य देऊन बऱ्याच कालावधीतील कुटील समस्या सुटतील आपण उत्कर्षाच्या वाटेवर आहात हे नक्की. सध्या गुरू महाराजांमुळे खर्च खूप होत आहे व चतुर्थस्थानात मंगळ, केतू युती घरगुती व शारिरीक त्रास होणारी ठरेल तथापि रवि, चंद्र, शुक्र यातून उत्तम मार्ग काढून घेतीलच. तेव्हा घाबरण्याचे कारण नाही. नवीन जबाबदाऱ्या स्विकारू नयेत. राजकीय व सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्तींनी विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. महिला, विद्यार्थी व खेळाडूंना हा महिना चांगला जाईल. व्यापाऱ्यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. | ||
![]() |
वृषभ : प्रगती होईल | |
| आपला उत्कर्षाचा रथ आता प्रगतीपथावरून भरधाव चालला आहे. तो कुणीही रोखू शकणार नाही. यश, किर्ती व मानसन्मान देणारा आहे. मात्र पत्नी व मुलाबाळांच्यातील वाद वाढवू नयेत. आपणावर सध्या गुरूकृपा आहे तेव्हा यश, सुख व किर्ती मिळवून देणारे ग्रह आहेत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षापूर्ती करणारा हा महिना जाईल. विद्यार्थ्यांची व खेळाडूंची प्रगती समाधानकारक राहिल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. एकंदरीत हा महिना अपेक्षापूर्ती करणारा आहे. | ||
![]() |
मिथुन : यश मिळेल | |
| या महिन्यात ग्रहांची नाराजी आहे. नातेवाईकांतील वादविवाद न वाढविणे योग्य. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे उचित ठरेल. तथापि शुक्र महाराजांची कृपा होणार असून या सर्वातून आपणाला यश व मार्ग मिळून अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. धनप्राप्ती व मित्रांचे सहकार्य उत्तम लाभून आपल्या कलागुणांचा विकास होईल. इस्टेट लाभ होण्याचा योग आहे. कोर्टकचेरीची कामे लांबणीवर ढकलावीत. व्यापारी, उद्योगपती व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. महिलांसाठी चैनीच्या वस्तू खरेदी केल्या जातील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. मनोकामना पूर्ण होईल. विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी लक्ष केंद्रीत करणे जरूरीचे होईल. हा महिना इच्छापूर्ती करणारा आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी समयसूचकता ठेवणे गरजेचे आहे. | ||
![]() |
कर्क: धनलाभ होईल | |
| अनेक कटकटी व त्रास अर्थनाश, घरगुती समस्या या सर्व शनीच्या अवकृपेमुळे आपण सहन केल्यात तथापि या महिन्यात शनीचे कृपेमुळे आपणाला धनलाभ, नोकरीत बरकत व लाभदायक गोष्टी घडणार आहेत. अचानक धनलाभ, अनेक सुख, मानमुराद व घरात मंगल कार्याची धामधुम होईल. गुरूकृपेने याच महिन्यात परदेशागमन योग संभवतो. सर्व सुख प्राप्त होईल. खरं जीवन साफल्य होईल. व्यक्तीमत्व उजळून निघेल. व्यावसायिक व्यक्तींची भरभराट होईल. शत्रुवर मात कराल. मात्र हे सर्व होताना तब्येतीकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. या महिन्यात बलाढय ग्रहांचे कृपेमुळे आपल्या समस्या दूर होतील. स्ािंह : माघार घ्यावी आपल्यावर बलाढय ग्रह्यांची अवकृपा असल्याने शत्रू निर्माण होणार नाहीत व पैसा अनाठायी खर्च होणार नाही याची काळजी घेणे जरूरीचे आहे. जुने आजार पुढे येण्याची व वाहनापासून त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तर सावध रहावे. असे असले तरी रविसारखा बलाढय ग्रह आपल्या पाठिशी उभा आहे तो या सर्वांतून मार्ग काढेल. तो आपला दर्जा वाढवेल. धनयोग उत्तम प्रकारे आहेत. जीवन सुखमय करून आपले व्यक्तीमत्व उजळेल. तेव्हा च्ािंता करण्याचे कारण नाही. या महिन्यात थोडी गुरूची नाराजी आहे. तेव्हा व्यापार वृध्दी व नवीन जबाबदाऱ्या स्विकारणे हितावह होणार नाही. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी गुप्त शत्रुंच्या कारवायांपासून सावध रहावे. थोरामोठयांचा सल्ला उपयुक्त ठरेल. | ||
![]() |
सिंह : माघार घ्यावी | |
| माघार घ्यावी आपल्यावर बलाढय ग्रह्यांची अवकृपा असल्याने शत्रू निर्माण होणार नाहीत व पैसा अनाठायी खर्च होणार नाही याची काळजी घेणे जरूरीचे आहे. जुने आजार पुढे येण्याची व वाहनापासून त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तर सावध रहावे. असे असले तरी रविसारखा बलाढय ग्रह आपल्या पाठिशी उभा आहे तो या सर्वांतून मार्ग काढेल. तो आपला दर्जा वाढवेल. धनयोग उत्तम प्रकारे आहेत. जीवन सुखमय करून आपले व्यक्तीमत्व उजळेल. तेव्हा च्ािंता करण्याचे कारण नाही. या महिन्यात थोडी गुरूची नाराजी आहे. तेव्हा व्यापार वृध्दी व नवीन जबाबदाऱ्या स्विकारणे हितावह होणार नाही. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी गुप्त शत्रुंच्या कारवायांपासून सावध रहावे. थोरामोठयांचा सल्ला उपयुक्त ठरेल. | ||
![]() |
कन्या : गुरूकृपा होईल | |
| या महिन्यात आपणावर गुरूकृपा होणार आहे. गुरू अनेक तऱ्हेची सुख प्राप्ती, राजमान्यता, किर्ती, यश मिळवून देईल. मंगळ, केतू आपणाला अचानक धनलाभ व किर्ती मिळवून देईल. आपले व्यक्तीमत्व उजळवेल. मात्र लग्नी आलेला शनी तब्येतीची काळजी घेण्यास सांगत आहे. व्यावसायिक, नोकरवर्ग यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. महिला वर्गात नवीन चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने आनंद पसरेल. नवीन घर व गाडी खरेदी योग आहे. इच्छुकांचे विवाह अचानक जुळून येतील. या महिन्यात अनेक इच्छा पूर्ण होणार असून समाधान मिळेल. | ||
![]() |
तुळ : खर्चावर नियंत्रण ठेवा | |
| आपण नुकतेच शनी महाराजांच्या अवकृपेच्या छत्राखाली वावरत आहात तेव्हा शनी हा कठोर शिक्षक आहे. तो माणसाला पापकर्म करू देत नाही याची जाणीव ठेवून माघार घेऊनच पुढे जाणे योग्य ठरेल. या महिन्यात बहुतांशी बलाढय ग्रह आपल्या विरोधात उभे आहेत. तथापि शुक्र आपणाला उत्तम साथ देऊन यावर मात करणेस खंबीरपणे आपल्या पाठिशी उभा राहणार आहे. अचानक धनलाभ संभवतो. गैरसमजातून वैरी निर्माण न करणे उचित ठरेल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवावे. लक्ष्मी चंचल आहे हे विसरू नये. श्वापद व जनावरांपासून सावध रहावे. घरगुती वाद व समस्या वेळीच दूर करणे योग्य ठरेल. व्यापारी व नोकरदार वर्गाला धनलाभ संभवतो. या काळात शनीची उपासना लाभदायक होईल. तुळ राशीत शनी उचिचा असल्याने तो तूळ राशीवर कृपा करेल. विवाहतांचे विवाह जुळून येतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे. सरळमार्गी माणसाला शनी त्रास देत नाही तेव्हा काळजी करण्याचे कारण नाही. | ||
![]() |
वृश्चिक : कीर्ति लाभेल | |
| अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने अशी उत्तम स्थिती आपली या महिन्यापासून होणार आहे. आपणावर बलाढय ग्रहांची कृपा असून त्यामुळे यश, कीर्ति, प्रसिध्दी मानमुराद या गोष्टींकडे आपला प्रगतीचा रथ गतीने घोडेदौड करणार आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हमखास यश प्राप्त होऊन त्यांना उच्चपद मिळेल. अचानक धनलाभ संभवतो. आपणावर शनी महाराजांची कृपा होणार असून अनेक प्रकारचे लाभ व वैभव प्राप्त करून देणारा आहे. नवीन वास्तू व जमीन खरेदी योग. कोर्टाचे निकाल आपल्या बाजूने लागतील. गैरसमज दूर होतील. व्यापारी व उद्योगपतींना व्यवसायात वाढ होईल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. विद्यार्थी व खेळाडूंना यश मिळेल. नवीन चैनीच्या वस्तू खरेदी होऊन महिला आनंदी होतील. एकंदरीत हा महिना आपल्याला सुखकारक व इच्छापूर्ती करणारा आहे. नोकरवर्गाला बढती योग आहेत. | ||
![]() |
धनु : यश मिळेल | |
| गुरूकृपा झाली तर अशक्य कामेही शक्य होतात व त्यातून धनप्राप्ती व यश मिळते अशी काहीशी स्थिती आपली होणार आहे. तथापि मंगळ व केतू आपणाला वाहनांपासून व भागिदारांपासून धोका मिळण्याची शक्यता आहे अशी सूचना देत आहे. तरी सावधानता बाळगणे उचित ठरेल. आपल्या बुध्दीचातुर्याची व कर्तृत्वाची कसोटी आहे. तथापि यश आपणालाच प्राप्त होईल. व्यापारी व नोकरवर्गाला अपेक्षित लाभ संभवतात. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. घरातील वडिलधाऱ्या माणसांच्या तब्येतीकडे शनी लक्ष देणेची सूचना करतोय. या महिन्यात आपणावर गुरूकृपा असल्याने अनेक समसया दूर होऊन स्वास्थ्य लाभू देणारा महिना आहे. | ||
![]() |
मकर : यश लाभेल | |
| या महिन्यात लग्नी असलेला गुरू व मंगळ केतू आपला ताण तणाव वाढविणारे असले तरी ग्रहराज रवि व कलागुणांचा विकास करणारा शुक्र आपल्याला घर, जमीन जुमला, कोर्ट कचेरी इ. कामात यश लाभून देणारे आहेत. तथापि आपल्या सल्ल्याने कुणाचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेणे योग्य ठरेल. मंगळ, केतू या महिन्यात पोटाचे विकार व पत्नीशी भांडण करणेस भाग पाडतील. तरी वेळीच सावध रहावे. घरगुती वाद वाढवू नयेत. व्यापारी उद्योगपती व नोकरवर्ग यांना अपेक्षित लाभ मिळेल. खेळाडूंना खेळात यश मिळेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी सावधानता बाळगावी, विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. एकंदरीत हा महिना काळजीपूर्वक निर्णय घेतल्यास सुखाचा व लाभाचा जाईल. ह्लाुंँभ : लाभ होतील नुकताच आपल्या राशिला शनी 8 वा आला असला तरी घाबरण्याचे मुळीच कारण नाही. मकर व ह्लाुंँभ राशीचा शनी स्वगृहीचा असतो तो मुळीच त्रास देत नाही. संकटाची चाहूल देतो. तेव्हा वेळीच सावधानता बाळगता येते. तथापि कलागुणांचा विकास करणारा शुक्र आपणला संपत्ती, लाभ, कीर्ति व सामाजिक दर्जा वाढविणारा आहे. बुध्दीकारक बुध आपल्या बुध्दीची चुणूक जनमानसात दाखविल व प्रसिध्दी मिळेल. मंगळ, केतू मात्र घरगुती मतभेद नष्ट करणारे आहेत तरी घरचे वाद मिटतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. सरकारी क्षेत्रातील व व्यवसायातील व्यक्तींना अचानक धनलाभ संभवतो. शत्रू मित्र बनतील. जमीन खरेदीचे योग येतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईरू. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळून कीर्ति व प्रसिध्दी लाभेल. महिलांना हा महिना लाभदायक जाईल. | ||
![]() |
कुंभ : लाभ होतील | |
| नुकताच आपल्या राशिला शनी 8 वा आला असला तरी घाबरण्याचे मुळीच कारण नाही. मकर व कुंभ राशीचा शनी स्वगृहीचा असतो तो मुळीच त्रास देत नाही. संकटाची चाहूल देतो. तेव्हा वेळीच सावधानता बाळगता येते. तथापि कलागुणांचा विकास करणारा शुक्र आपणला संपत्ती, लाभ, कीर्ति व सामाजिक दर्जा वाढविणारा आहे. बुध्दीकारक बुध आपल्या बुध्दीची चुणूक जनमानसात दाखविल व प्रसिध्दी मिळेल. मंगळ, केतू मात्र घरगुती मतभेद नष्ट करणारे आहेत तरी घरचे वाद मिटतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. सरकारी क्षेत्रातील व व्यवसायातील व्यक्तींना अचानक धनलाभ संभवतो. शत्रू मित्र बनतील. जमीन खरेदीचे योग येतील. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईरू. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळून कीर्ति व प्रसिध्दी लाभेल. महिलांना हा महिना लाभदायक जाईल. | ||
![]() |
मीन : व्यक्तीमत्व उजळेल | |
| या महिन्यात मंगळ व केतू आपणाला घरगुती बाबतीत बेजार करणारे असले व शनी मानसिक त्रास देणारा असला तरी गुरू व राहू आपले व्यक्तीमत्व उजळून आपणाला ऐश्वर्य प्राप्त करून देणारे आहेत. गर्भवतींना तर पुत्रयोग संभवतो. अचानक इस्टेट लाभ संभवतो. या महिन्यात आपणावर गुरूकृपा झाल्याने आपण अवघड कामात यश प्राप्त करणार आहात. आपल्या प्रगतीचा रथ कुणीही अडवू शकणार नाही. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. विद्यार्थी व खेळाडूंनी लक्ष केंद्रीत करणे जरूरीचे आहे. व्यापारी वर्गात अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते. महिलांना अनेक कार्यात यश लाभून काळ सुखाचा जाईल. | ||