दिनांक:
 
 
मासिक राशीभविष्य
जून 2011
रमेश बा. मावळंकर
(ज्योतिषाचार्य)
रत्नागिरी
मोबाईल-9860886993
ग्रहस्थिती :  
ग्रहस्थिती : शुक्र-वृषभ, मंगळ-वृषभ, बुध-मिथुन, रवि-मिथुन, राहू केतू-वृश्चिक, वृषभेला अनुक्रमे- गुरू-मेषेला, शनि-कन्येला.  
  मेष : गुरूकृपा होईल
मेष: या महिन्यात गुरू व शनिसारखे बलाढय ग्रह आपणाला उत्तम साथ देणारे आहेत. तेव्हा काळजी करण्याचे कारण नाही. परदेशागमन योग आहे व आर्थिक आवक अपेक्षित राहणार असून अनेक समस्या मिटणार आहेत. मात्र राहू केतू आपल्या विरोधात उभे असल्याने अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे जरूरीचे आहे. मंगळ उष्णतेच्या विकारापासून सावध राहणेस सांगत आहे. कठोर वाणी नसावी नाहीतर शत्रू निर्माण होतील. शुक्र अचानक धनलाभ देवून समस्या दूर करेल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.
     
  वृषभ : सावधानता बाळगा
वृषभ : या महिन्यात बहुतांशी बलाढय ग्रह आपल्या विरोधात उभे आहेत. तेव्हा सावधगिरीने निर्णय घेणे उचित होईल. घरातील भांडणे विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. खर्चावर नियंत्रण ठेवणे जरूरीचे आहे. मंगळ उष्णतेचे विकार देण्याची शक्यता आहे. बुध आर्थिक बळ उत्तम देणारा आहे. शत्रू मित्र बनतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. अध्यात्मिक उपासनाच लाभदायक ठरेल. शब्द जपून वापरावेत. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी महत्वाच्या बाबी गुप्त ठेवाव्यात.
     
  मिथुन : यश लाभेल
मिथुन : गुरू महाराजांच्या कृपेने आपण प्रसिध्दी व किर्तीचे क्षेत्रात येणार आात. अचानक धनलाभ, मानमुराद, पुत्रलाभ इ. अनेक उत्तम घटना घडणार आहेत. मात्र वाहन, वीज, दूरचे प्रवास जरा जपून करणे आवश्यक आहे. मंगळ अनाठायी खर्च, उष्णतेचे विकार यापासून सावध रहावे अशी सूचना देतोय. राहुमुळे नवीन वास्तू खरेदी योग येईल. अनेक प्रकारची सुख व मानसिक समाधान लाभेल. सौंदर्य प्रसाधनाचे व्यवसायात भरघोस यश प्राप्त होईल. घरचे कलह वाढणेची शक्यता आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाने विचाराने आर्थिक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी विचारपूर्वक व सावधानतेने निर्णय घ्यावेत.
     
  कर्क : अपेक्षापूर्ती होईल.
कर्क : या महिन्यात बहुतांशी बलाढय ग्रह आपल्या पाठिशी उभे असून आपल्या अनेक समस्या दूर होतील. ग्रहराज रवि, धाडसी मंगळ, कलाकार शुक्र, शनि हे ग्रह आपल्याला मानमुराद, आर्थिक लाभ, धनलाभ, आरोग्यलाभ इ. गोष्टी देणारे आहेत. आपली अपेक्षापूर्ती होणार आहे. सौख्य व ऐश्वर्य केतू देणारा आहे. तेव्हा सुखाचा काळ आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद लाभेल. नवीन चैनीच्या वस्तू खरेदी होतील. पूर्ण आत्मविश्वासाने व कर्तृत्वाने यश पदरी पाडून घ्यावे. मुलाबाळांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
     
  सिंह : प्रगति होईल
सिंह : रात्र सरली की पहाट होतेच हा निसर्ग नियम आहे. लवकरच आपण शनि महाराजांच्या साडेसातीतून मुक्त होणार आहात व आपणावर गुरूकृपा होणार आहे. तरी साडेसातीतील सर्व त्रास दूर होवून अनेक नवीन क्षेत्रात आपण पदार्पण करणार आहात. आर्थिक समस्या सुटतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. मानसन्मानाचे योग प्रतिष्ठीत व्यक्तींकडून येतील. कष्टाचं व कर्तृत्वाचं चीज होवून आपण उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल करणार आहात. नवीन कार्य, नवीन दर्जा व संत्ती लाभ होणार आहे. व्यापारी, कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. अडलेली कामे चुटकीसरशी पार पडतील.
     
  कन्या : अपेक्षापूर्ती होईल
कन्या : आपण जरी शनीच्या साडेसातीला असलात तरी राहूसारखा बलाढय ग्रह सौख्य व अचानक धनलाभ करून दिल्याशिवाय राहणार नाही. आपली भरारी मोठी व रास्त असून आपणाला यश संपादन होईलच. बुध्दीकारक बुध अनेक प्रकारची सुख देणार असून प्रतिक्षा वाढवेल. गुरू महाराज तब्येतीची काळजी घेणेस सांगत आहेत. जुने आजार पुढे येणार नाहीत याची खबरदारी घेणे जरूरीचे आहे. सर्वांवर मात करणेस बुध्दीकारक बुध उत्तम साथ देणारा आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.
     
  तुळ : सावधानता बाळगा
तुळ : बहुतांशी बलाढय ग्रह आपल्या विरोधात उभे आहेत. तेव्हा सावधानतेने महत्वाचे निर्णय घेणे योग्य होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तथापि या खर्चावर मात करणेसाठी किर्तीदाता गुरू आपणाला उत्तम साथ देवून आपले व्यक्तीमत्व उजळवल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा चिंता नको. वाहनापासून या महिन्यात सावध रहा. विवाह इच्छूंचे विवाह जुळतील. मंगल कार्यासाठी प्रवासयोग आहे. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग आहे. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी माघार घेवून पुढे जाणेच योग्य होईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल.
     
  वृश्चिक : आर्थिक लाभ होईल
वृश्चिक : शनि महाराजांची कृपा झाली की सर्व आर्थिक समस्या सुटतातच. त्यात बुध्दीकारक बुधाची कृपा असल्याने धनलाभ होईल. जुनी येणी वसुल होतील. मात्र मानसिक ताणतणाव वाढवू देवू नये. घरात कलह होण्याची शक्यता आहे. वेळीच काळजी घ्यावी. विवाह इच्छुंनी सावधानता बाळगून फसगत होणार नाही याची खात्री करावी. व्यापारी, कारखानदार व उद्योगपतींना अपेक्षित अर्थप्राप्ती होवून व्यवसायात वाढ होईल. गुरू महाराज जुने आजार पुढे आणणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे.
     
  धनु : उत्कर्ष होईल
धनु : देव आणि दैव अनुकूल असले म्हणजे उत्कर्ष होतोच याची प्रचिती आपणाला या महिन्यात येईल. रखडलेली कामे हातावेगळी होतील. आर्थिक समस्या दूर होतील. नवीन वास्तू खरेदी योग आहे. शत्रू मित्र बनून गैरसमज हे गैर असतात याची खात्री होईल. साक्षात गुरूकृपा आपणावर होणार असल्याने अशक्य ते शक्य होईल. मनोकामना पूर्ण होतील. वडिलोपार्जित इस्टेट लाभ संभवतो. मात्र सर्व ठीक झाले तरी विरोधक निर्माण होणार नाहीत याची दक्षता घेणे उचित होईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. राजकीय व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते.
     
 

मकर : विजय प्राप्त होईल

मकर : या महिन्यात ग्रहमान मिश्र स्वरूपाचे असले तरी बुध्दीकारक बुध आपणावर विजय प्राप्त करून देणारा आहे. रवि, मंगळ व केतू मानसिक ताण वाढविणारे आहेत. तेव्हा शांत राहणेच उचित ठरेल. शेतकरी वर्गाने जनावरांपासून सावध रहावे. घरातील मुलाबाळांचे वाद वाढवू नयेत. राहू महाराज ऐश्वर्य व सुख देणारे आहेत. तेव्हा चिंता करणेचे कारण नाही. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे जरूरीचे आहे. आवक-जावक समान राहिल. परदेशागमन योग येईल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी सावधानता बाळगावी.
     
  कुंभ : सावधानता बाळगावी
कुंभ : आपली गुरूभक्ती आणि अध्यात्मिक शक्ती आपले वर्चस्व कायम ठेवणारे आहे. गोरगरीबांवर केलेले उपकार, वृध्दांचे आशिर्वाद हे आपणाला या महिन्यात उपयुक्त ठरणार आहे. बलाढय ग्रह आपली परिक्षाच पाहणारे आहेत. कार्यात विघ्न स्थावर हानी, वैरी इ. पासून सावधानता बाळगावी. मंगळ धाडसी व पराक्रमी बनवणार आहे. उत्तरार्धात शुक्र ऐश्वर्य व सौख्य देणार आहे. शनिमहाराज पुत्र कलह व मित्र कलह करू नये असा सल्ला देत आहेत. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. घरगुती समस्या राहू, केतू वाढवतील. तरी वेळीच सावधानता बाळगावी, व्यापारी वर्गाला अपेक्षक्षित अर्थप्राप्ती होईल.
     
  मीन : सुख लाभेल
मीन : नशिबात असल्याशिवाय व वेळ आल्याशिवाय काहीही प्राप्त होत नाही. तथापि आपली वेळ आली असून देव व दैव आपल्यावर खूष आहे. अनेक मनोकामना पूर्ण होतील. किर्ती प्रसिध्दीचे झोतात याल. कष्ट, कर्तृत्व व बुध्दीमत्ता यांचे चीज होईल. मानसन्मान यश लाभून खरं सुख मिळेल. मात्र वाचेवर ताबा ठेवणे गरजेचे आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. घरात मंगलकार्य होईल. नवीन वास्तू खरेदी योग आहे. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. काळ सुखात जाईल.