![]() |
![]() |
|||
| दिनांक: | ||||
![]() |
| मासिक राशीभविष्य | |
| जून 2010 | |
![]() |
|
| रमेश बा. मावळंकर (ज्योतिषाचार्य) रत्नागिरी मोबाईल-9860886993 |
|
| ग्रहस्थिती | |
| ग्रहस्थिती :- मंगळ-6 जून वृषभ, शुक्र- 9 जून कर्क, रवि-16 जून मिथुनेत, बुध- 22 जून मिथुनेत. शनि - कन्येत, राहू-केतु -तुम्ही धनु व मिनेत, मंगळ सिहेत, गुरु-मीनेत. | |
![]() |
मेष : - प्रसिध्दी मिळेल. | |
| हा महिना आपणाला सुख, समृध्दी व आपल्या आर्थिक समस्या सोडविणारा आहे शनि, केतु सारखे बलाढय ग्रह आपल्या पाठीशी समर्थपणे यश देणेस उभे आहेत. तेव्हा काळजीचे कारण नाही. त्यात उत्साही शुक्र व बुध्दीकारक बुध यांची आर्थिक कोंडी फोडणेस उत्तम साथ लाभणार आहे. मंगळ महाराज पुत्र व पत्नीशी कलह वाढविणारा आहे, तेव्हा वेळीच दक्षता घ्यावी. आनंद संयमाने द्विगुणित करावा. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिंच्या अपेक्षा पूर्ण होतील, तथापि मोठे करार व योजना हाति घेणेपूर्वी तज्ञांची संमत्ती घेणे आवश्यक आहे. अनाठायी खर्चावर गुरु नियंत्रण ठेवणेस सांगत आहे. राहू विचारपूर्वक निर्णय घेणेस सूचित करत आहे. महिलांना हा महिना आनंद देणारा आहे. | ||
![]() |
वृषभ: - गुरुकृपा होईल. | |
| यश व कीर्तिदाता गुरु या महिन्यात आपणावर वरदहस्त ठेवून असल्याने आपणाला मान सन्मान, यश व मानसिक स्वास्थ मिळणार आहे. अपेक्षित धनप्राप्ती होईल. शुक्र महाराज आपली इच्छापूर्ति करणारे आहेत. राजकीय क्षेत्रातील व शासकीय क्षेत्रातील व्यक्तिंना उच्चपद संभवते. राहू व केतु आपणाला अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणेची सूचना देत आहेत, तसेच तब्बेतीची वेळीच काळजी घेणे जरुर आहे. शत्रुपक्षाशी मिळतेजुळते घेणे उचित होईल. व्यापारी व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुकांचे विवाह उत्तमरित्या जुळून येतील. घरात चैनिच्या वस्तू खरेदी केल्या जातील. शनि महाराज घरात कलह करणेची शक्यता आहे तरी वाद न वाढविणे इष्ट होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे योग्य होईल. या सर्वांवर गुरु महाराज मात करुन आपले व्यक्तीमत्व उजळवणार आहेत.े. | ||
![]() |
मिथुन : - धाडसी बना ! | |
| माणसावर संकट येतात ती अनुभव व धाडसासाठीच होय. या जगात जाला हिंम्मत आहे त्यालाच किंमत आहे. या महिन्यात धाडसी व पराक्रमी मंगळ आपणाला हेच सांगत आहे राहू-केतु शनि यासारखे बलाढय ग्रह आपली परिक्षा घेतील पण उत्साही शुक्र व धाडसी मंगळ आपले व्यक्तिमत्त्व उजळवल्याशिवाय रहाणार नाही. शनि महाराजांच्या घरगुती समस्यांना धाडसाने सामोरे जावे. अपेक्षित धनप्राप्ती होईल. तथापि अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. मनाने खंबीर व शरिराने बळकट रहाणेच उचित होईल. व्यापारी कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. शासकीय क्षेत्रातील व्यक्तिंनी वरिष्ठांची मर्जि संपादन करणे योग्य होईल अध्यात्मिक उपसनेवर भर देणेस गुरु महाराज सांगत आहेत. महिलांनी तब्बेतीची काळजी घ्यावी व खर्चावर नियंत्रण ठेवावे. | ||
![]() |
कर्क : -आर्थिक भरभराट होईल. | |
| हा महिना आपली अपेक्षापूर्ती करणारा आहे. या महिन्यात शनि, गुरु व राहू हे ग्रह आपले व्यक्तिमत्त्व उजळवून आपली आर्थिक भरभराट करणारे आहेत. जुनी येणी वसूल होतील. गुरु महाराज आपणाला यश कीर्ति व सुखप्राप्त करुन देणारे आहेत. ग्रहराज रवि व बुध्दीकारक बुध आपणाला उच्चपद व भरभराट करणारे आहेत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तिंना उच्चपद व मानसन्मान देणारे ग्रहमान आहे. तब्बेत उत्तम राहील, शत्रुमित्र बनतील. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. मात्र कठोर शब्द वापरुन घोटाळा व शत्रु निर्माण होणेची शक्यता आहे. तरी वेळीच दक्षता घेणे जरुरीचे. व्यापारी, उद्योगपती व कारखानदार यांच्या उद्योगात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणेस केतु सांगत आहे. महिला वर्गाची अपेक्षापूर्ति करणारा व आर्थिक भरभराट करणारा हा महिना आहे. | ||
![]() |
सिंह : - उत्कर्ष होईल. | |
| देव आणि दैव यांची कृपा झाली की, उत्कर्षाचा काळ व प्रगती होणारच. आपण जरी शनिच्या साडेसातीच्या अंतिम टप्प्यात आहात पण ग्रहराज रवि व बुध्दीकारक बुध आपणाला अवघड कार्यात यश देऊन अपेक्षित अर्थप्राप्ती करुन देणारा आहे. शुक्र महाराज उद्योगव्यवसायात भरभराट करतील. केतु महाराज नवीन इस्टेट खरेदीचा योग आणतील. ऐश्वर्य प्राप्त करुन देतील. मंगळ मात्र मानसिक खिन्नता, घरचांशी विरोध, रक्तदोष व पित्तरोग निर्माण करणारा आहे, तेव्हा वेळीच सावधानता बाळगणे उचित होईल. गुरु महाराज मानसिक ताणा वाढवतील तरी अध्यात्मिक उपासना करणे योग्य. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. राहू घरगुती कलह करणेची शक्यता आहे तरी वाद वाढवू नये हेच योग्य. महिलांना हा महिना सुखावह जाईल. | ||
![]() |
कन्या : -सावधानता बाळगावी. | |
| पैसा कर्तृत्व आणि अधिकार पद असले तरी विनय असणे अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर सामाजिक व मानसिक हानीला सामोरे जावे लागते, अशी आपली या महिन्यातील ग्रहस्थिती सांगते. बलाढय ग्रह आपल्या विरोधात विरोधक निर्माण करणेसाठी तत्पर आहेत. शारिरीक व मानसिक त्रास होणार नाही याकडे मौन पाळून व माघार घेऊन रहाणे उचित ठरेल. अन्यत: जुने आजार पुढे येण्याची शक्यता आहे. यावर मात करणेसाठी गुरु महाराज समर्थपणे आपल्या पाठीशी उभे आहेत, तेव्हा काळजीचे कारण नाही. शुभ कार्यासाठी प्रवास होईल. धनलाभ, वस्त्रलाभ होणार आहे. वाहन जपून चालवावे. शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा असा सल्ला बुध महाराज देत आहेत. व्यापारी, कारखानदार यांनी गुंतवणूक विचारपूर्वक करावी. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. शासकीय क्षेत्रातील व्यक्तिंनी महत्वाचे कामात गुप्तता पाळावी व वरीष्ठांची मर्जि सांभाळणे उचित होईल. | ||
![]() |
तुळ : - घाई नको. | |
| दिवसानंतर रात्र व रात्री नंतर दिवस येतच असतात, तसेच सुखदु:खाचा खेळ आयुष्यभर चालतच असतो. आपण शनिच्या साडेसातीचा पहिल्या पर्वात आहात तेव्हा शनि हा कठोर शिक्षक आहे तो पापापासून प्रवृत्त करणेसाठी वेळीच शासन करतो. सावधतेने महत्त्वाचे निर्णय घेणे उचित ठरेल. गुरु शनिची अवकृपा असली तरी धाडसी पराक्रमी मंगळ आपणाला अपेक्षित अर्थप्राप्ती, उत्तम आरोग्य व जमीनजुमला खरेदी करुन देणारा आहे. बुध्दीकारक बुध धनलाभ व घरात उत्तम घटना घडविणारा आहे. वडिलधाऱ्या व्यक्तिंच्या तब्बेतीची काळजी घ्यावी. घरगुती वाद वेळीच संपवावेत. व्यापारी, उद्योगपती यांनी विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करणे योग्य होईल. विवाह इच्छूंचे विवाह जुळून येतील. महिला वर्गाने माघारीनेच यश संपादन करुन घ्यावे. | ||
![]() |
वृश्चिक : - व्यक्तिंमत्व उजळेल. | |
| शनि हा अर्थदाता, यशदाता व कीर्तिदाता आहे. शनि महाराज आपणावर प्रसन्न व कृपादृष्टिनेपहात आहेत. तेव्हा आपल्या आर्थिक समस्या सूटणार असून आपली जनमानसात प्रतिष्ठा वाढणार आहे. अडकलेला पैसा वसूल होईल मात्र पैसा कितीही आला तरी आनंद संयमाने द्विगुणित करणे इष्ट होईल.गुरु महाराज ऐश्वर्य व सत्ता देणारे आहेत. उच्च शिक्षण विभूतीत असणाऱ्यांना योग्य जागी निवड होऊन हातात सत्ता व पैसा येईल. परदेशागमन योग आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होऊन उद्योगात वाढ होईल. कवी व कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी, पैसा लाभेल. मात्र तब्बेतीची काळजी घ्यावी व विरोधकांना संधी देऊ नये. मंगळ महाराज कार्यात अडथळे आणणारे असले तरी शनि, गुरु आपले व्यक्तिमत्व उजळवणारे आहेत. महिलांना हा महिना सुख, शांती देणारा आहे. | ||
![]() |
धनु : - विकास होईल. | |
| या महिन्यात बुध्दीकारक बुध आपणाला उत्तम साथ देऊन आपल्या बुध्दीची चुणूक दाखविणारा आहे. आर्थिक लाभ आणि विजय संपादन करु शकाल. तसेच शुक्र हा आपल्या कलागुणांचा विकास करुन नवीन संधी उपलब्ध करुन देणारा आहे, मात्र संय्यम महत्वाचा आहे. थोडयाशा यशाने हुरळून जााउु नये, यश चिरकाल टिकणारे हवे अन्यत: राहू, केतु, शनि व मंगळ आपणाला अडचणीत टाकणारे आहेत. शेतकरी वर्गाने जनावरापासून सावधानता बाळगावी. जुने आजार पुढे येणयाची शक्यता असल्याने बंधनात रहाणे व मनावर ताबा ठेवणे उचित ठरेल. व्यापारी, कारखानदार यांनी व्यवसायात व व्यवहारात दक्षता घ्यावी.गर्भवतींना पुत्र प्राप्ती योग संभवतो. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. शासकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिंना अपेक्षा पुर्ण करणारे ग्रह आहेत. | ||
![]() |
मकर : - संय्यम राखा. | |
| या महिन्यात आपण श्रध्दा व सबूरी राखणे आवश्यक आहे. बहुतांशी बलाढय ग्रह आपली परिक्षा घेणारे आहेत. पत्नी, मुलबाळ यांच्याशी वाद टाळावेत हेच योग्य होईल. डोळयांची विशेष काळजी घ्यावी. जुने आजार पुढे येण्याची शक्यता आहे तरी वेळीच बंधन पाळणे उचित होईल. या सर्वांवर मात करणेस केतु आपणास उत्तम सहाय्य करणारा आहे, तेव्हा काळजीचे कारण नाही. धार्मिक कृत्यांवर लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. मनाची घालमेल न करणे इष्ट होईल. व्यापारी कारखानदार व उद्योगपतींना गुंतवणूक करताना विशेष खबरदारी घेणे योग्य होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य. माघार घेऊन पुढे जाणे योग्य होईल. महिलांनी वाद टाळावेत व तब्बेतीची काळजी घ्यावी. | ||
![]() |
कुंभ : - सर्व ठीक होईल. | |
| आपण दयाळू बुध्दीचे, लोकसेवा करणारे व अध्यात्मिक विचारसरणीचे आहात. आपला राशिस्वामी शनि हा बलाढय ग्रह आहे. या महात आपणावर गुरुकृपा झाल्याने आपलेर् कृत्तृत्व, वक्तृत्व व दातृत्व उजळून निघणार आहे. आपली खरी किंमत संबंधितांना कळेल. श्रध्दा व सबूरीचा लाभ मिळेल. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तिंकडून आपल्या कार्याचा गौरव होऊन यश व प्रसिध्दी लाभेल. केतु महाराज नविन वास्तू खरेदीचा योग आणतील. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. शनिची आपणावर अवकृपा आहे व मंगळ कलह निर्माण करणारा आहे तेव्हा वेळीच सावधानता बाळगावी. अध्यात्मिक उपासनेच फळ मिळेल. बुध महाराज अचानक धनलाभ करुन देतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. महिला वर्गाला हा महिना सुख, शांती व समृध्दी देणारा आहे. |
||
![]() |
मीन : - परदेशागमन योग- | |
| गुरुकृपा झाली की, दु:ख नष्ट होऊन सुख प्राप्त होतात. दु:ख, मोह, शत्रु व रोग यांच्यावर कुरघोडी करणारा धाडसी मंगळ आपल्या पाठीशी उभा आहे तेव्हा धाडसाने पुढे जावे. ग्रहराज रवि आपला दर्जा उंचावणार आहे शासकीय सेवेतील व राजकीय क्षेत्रातील व्यक्तिंना उच्च पद लाभेल. शनिमुळे मानसिक दुर्बलता बाळगू नये. गर्भवतींना पुत्र प्राप्ती योग संभवतो. विवाह इच्छूंचे विवाह जुळून येतील. राहू केतु शत्रुंना साथ देणारे आहेत. तरी वेळीच सावध व्हावे हे योग्य. व्यापारी कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. शब्द संयमाने वापरणे योग्य अन्यथा शत्रु निर्माण होतील. अचानक धनलाभाचे योग आहेत. जुनी येणी वसूल होतील. एकंदरीत हा महिना परदेशागमन योगामुळे दर्जा उंचावणारा आहे. महिलांना आनंददायी हा महिना जाईल. | ||