![]() |
![]() |
|||
| दिनांक: | ||||
![]() |
| मासिक राशीभविष्य | |
| मे 2010 | |
![]() |
|
| रमेश बा. मावळंकर (ज्योतिषाचार्य) रत्नागिरी मोबाईल-9860886993 |
|
| ग्रहस्थिती | |
| ग्रहस्थिती :- 2 मे गुरु मीनेत, 14 मे रवि वृषभेत, 15 मे शुक्र मिथुनेत, 26 मे मंगळ सिंहेत. राहुकेत धनु व मीथुनेत अनुक्रमे, शनि सीहेत. | |
![]() |
मेष : - किर्ती मिळेल. | |
| या महिन्यात आपण प्रगतीच्या लाटेवर आरुढ होणार आहात. यश, किर्ती व भरभराट होणार आहेच,तेव्हा मागे वळून पाहण्याची गरज पडणार नाही. आर्थिक समस्या सुटतील. नवीन व्यवसायात पदार्पण करण्यास उत्तम काळ आहे. केतु महाराजांची कृपा होऊन आपल्या अनेक समस्या दूर होणार आहेत. केतु आपणाला सौख्य व धनलाभ करुन देणार आहे. मंगळ मात्र उष्णतेच्या विकारांपासून सावधानता बाळगणेस सूचना देत आहे. समाजात मनमुराद, अपेक्षित पैसा व पुत्र सौख्य शनिमहाराज देणार आहे. गुरुमुळे अध्यात्मिक उन्नती होईल. व्यापारी कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होऊन व्यवसायात वाढ होईल. विवाह इच्छुंचे विवाह उत्तम प्रकारे जुळून येतील. कवी व कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. महिला वर्गात उत्साह वाढेल व शांती मिळेल. | ||
![]() |
वृषभ : - उत्साह वाढेल. | |
| या महिन्यात शुक्र महाराज आपल्या उत्साहाला व आनंदाला उधाण आणणार आहेत. मंगळ आपणाला धाडस निर्माण करुन देणारा आहे. धाडसाने अनेक अवघड कामात यश संपादन करता येईल. कोर्टकचेरीचे निकाल आपल्याच बाजूने लागतील. जमीन खरेदी योग आहे. मात्र शनि महाराज अचानक अनाठायी खर्च उभा करतील. पुत्राशी मिळतं जुळतं घेणेच उचित होईल. खर्चावर वेळीच नियंत्रण ठेवणे योग्य होईल. गुरु महाराज या सर्वांतून मार्ग काढून आपणाला यश व कीर्ती देणारे आहेत. शासकीय सेवेतील व्यक्तींना बदली बढतीचे योग आहेत. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना मानसन्मान व परदेशागमन संभवते. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणेच योग्य रवि महाराज मित्रांशी मिळते घ्यावे तर बुध पराभवाचे सावट निर्माण करणारे आहेत. व्यापारी उद्योगपती यांना अपेक्षित अर्थलाभ होईल. खेळाडूंना खेळात प्राधान्य मिळेल. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. हा महिना गुरु कृपेने उत्तम व सुख देणारा आहे. | ||
![]() |
मिथुन : - माघार घ्यावी. | |
| या महिन्यात आपल्या बुध्दी कौशल्याची, कर्तृत्वाची व धाडसाची परिक्षाच घेणारे ग्रहमान आहेत. राहू व केतु मानसिक ताणतणाव निर्माण करणारे असून शनि महाराज घरच्या कटकटी वाढविणारा आहे. थोरामोठयांच्या सल्ल्यानेच निर्णय घेणे उचित होईल. अनाठायी खर्च उभे राहतील. महिन्याचे पूर्वार्धात या सर्वांवर रवि महाराज उत्तम साथ देऊन आपला दर्जा उंचावतील. मात्र शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरा. असा सल्ला रवि उत्तरार्धात देईल. राजकीय, सामाजिक व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी सावधानता बाळगणे हिताचे होईल. कलागुणांचा विकास करणारा शुक्र आपणाला कला क्षेत्रात उत्तम दर्जा मिळवून देईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. कुलदेवतेच्या उपासनेवर भर द्यावा. नवस वेळीच फेडणे जरुरीचे आहे. लेखक कलाकारांना कीर्ती व प्रसिध्दी मिळेल. महिलांच्या कलांगुणांचा विकास होऊन मन प्रसन्न राहिल. | ||
![]() |
कर्क : - प्रगती होईल. | |
| पहाट झाल्यावर सूर्याेदय होतोच हा निसर्ग नियम आहे. कष्ट, भोग सरले म्हणजे सुख प्राप्त होणारच याची प्रचिती आपणाला या महिन्यात येईल. बहुतांशी ग्रह आपल्या बाजूने आपणाला यश, कीर्ती व धन देणारे असून मागील घटनांची व दु:खांची बाब हृदय पटलावरुन कायमची काढून टाका. आपण उत्कर्षाच्या लाटेवर आरुढ झालेले आहात तेव्हा पुढे जाणारच. शनि महाराज आपणाला अपेक्षित धनप्राप्ती करुन देऊन आपल्या आर्थिक समस्या सुटणार आहेत. व्यापारी, उद्योगपती व कारखानदार यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. सरकारी व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना कीर्ती प्रसिध्दी, मानमुराद लाभून अपेक्षापूर्ती होईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. अचानक इस्टेट लाभ होण्याची शक्यता आहे. मंगळ महाराज मात्र उष्णतेचे विकार, मानसिक खच्चिकरण, विरह इ. पासून सावधानता बाळगणेची सूचना देत आहे. महिला वर्गाला हा महिना आनंद, सुख व धनप्राप्ती करुन देणारा जाईल. | ||
![]() |
सिंह : - सावधानता बाळगा. | |
| आपण शनिच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा गाठला आहात तेव्हा अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवूनच आपणाला ग्रहराज रवि व केतु उत्कर्षाच्या व सुखाच्या मार्गावर नेऊन ठेवणार आहेत. फक्त घाई न करता थोरामोठयांच्या सल्ल्यानेच निर्णय घेणे उचित ठरेल. प्रत्येक बाब स्वत: तपासून खात्री करणे आवश्यक आहे नाही तर ही बाब उत्तरार्धात अडचणीत टाकेल. मंगळ महाराज तब्बेतीची काळजी घेण्याची सूचना देत आहेत. वाहन हळू व काळजी पूर्वक चालवावे. पैशाचा व्यय होण्याची शक्यता आहे. राहू देखील आवक पेक्षा जावक वाढविणारा आहे तेव्हा आर्थिक व्यवहार जपून व खात्रीपूर्वक करावेत. सामाजिक, राजकीय व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना उच्च पद व मानसन्मान मिळेल. व्यापारी,कारखानदार व उद्योगपती यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित आर्थिक लाभ होतील. मात्र गुप्तता पाळणे आवश्यक आहे. विवाह इच्छुंनी विचारपूर्वक लग्नाचा निर्णय घेणे उचित ठरेल. विद्यार्थी व खेळाडूंना जास्त श्रम यशासाठी करणे आवश्यक आहे. भागिदारी व्यवसायातील व्यक्तींनी शत्रुपासून सावध रहावे. महिलांना हा महिना सुख समृध्दी देणारा आहे. | ||
![]() |
कन्या : - विकास होईल. | |
| लोकसेवा हे आपल्या राशीचे उद्दिष्ट आहे. परंतु सध्या अनेक बाबतीत सगळीकडून खीळ बसण्याची शक्यता आहे. आपले म्हणणे दुसऱ्यावर लादू नका. आपणावर शनि, मंगळ व राहू यांची अवकृपा होण्याची शक्यता आहे. तरी आपल्या प्रगतीच्या व उत्कर्षाच्या रथाची गती मंदावण्याची शक्यता आहे. शत्रु निर्माण होणार नाहीत याची काळजी घेणे जरुरीचे आहे. तसेच जुने आजार पुढे येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. शक्यतो खाण्यात उष्ण व तिखट पदार्थ घेऊ नयेत. वाहन जपून चालवावे. व्यापारी कारखानदार व उद्योगपती यांनी विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करणे गरजेचे आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी मिळेल. घरगुती वाद विवादापासून दूर रहावे. कोर्ट कचेरीची कामे लांबणीवर टाकावीत. या सर्वांवर मात करण्यासाठी साक्षात गुरु महाराज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. गर्भवतींना पुत्र प्राप्ती योग संभवतो. महिलांना हा महिना अपेक्षापूर्ती करणारा आहे. | ||
![]() |
तुळ : - तब्बेत सांभाळा. | |
| शनि, केतु, गुरु हे ग्रह जरी आपल्या विरोधात उभे असले तरी राहू, शुक्र व मंगळ आपणाला उत्तम साथ देणारे आहेत. शनि हा कठोर शिक्षक आहे. तेव्हा प्रत्येक महत्वाची बाब विचारपूर्वक व थोरामोठयांच्या सल्ल्याने करणे उचित होईल. तब्बेतीला जपावे, जुने आजार पुढे येणार नाहीत याची काळजी घ्यावी. 26 मे 2010 नंतर वाहनापासून सावध रहाणे योग्य ठरेल. व्यापारी कारखानदार व उद्योगपती यांनी भागीदारीत व्यवसाय न करणे इष्ट होईल. कुणावरही विरुंबून राहू नये. शासकीय सेवेतील व्यक्तींना प्रत्येक बाबतीत सावधानता व गुप्तता पाळावे वरिष्ठाधिकाऱ्यांची मर्जि संपादन करणे आवश्यक आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. नविन चैनिच्या वस्तू खरेदी होतील. व्यसनापासून दूर रहावे अन्यता उत्तरार्धात त्रास होणेची शक्यता आहे. महिलांनी नविन व्यवसाय सल्याने सुरु करावा, लाभ होईल. | ||
![]() |
वृश्चिक : - शनिकृपा होईल. | |
| आपणावर या महिन्यात अर्थदाता शनि, कीर्तीदाता गुरु व ग्रहराज रवि यांची कृपा होणार आहे, तेव्हा आपण यशाच्या उच्च शिखरावर बसणार आहात तसेच आपली जनमानसातील प्रतिमा उंचावणार आहे. सज्जनांचा सहवास लाभेल. मात्र राहू व केतु आपली प्रगती कमी करण्याची शक्यता आहे. कोणत्याही महत्वाच्या बाबतीत अति आत्मविश्वास दाखवू नये. रवि महाराज शासकीय कर्मचारी व राजकारणी व्यक्तींना बढती बदली व उच्चपद देईल. उत्तरार्धात रविमुळे घोटाळे होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारखानदार व स्वतंत्र व्यावसायिक यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होऊन व्यवसायात वाढ होईल. नविन योजना फलदायी होतील. उत्तरार्धात मंगळ उत्तम साथ देणारा आहे. कोर्ट कचेरीचे निकाल आपल्या बाजूने लागतील. विवाह इच्छूंचे विवाह उत्तम प्रकारे जुळून येतील. घरात चैनीच्या वस्तू खरेदी झाल्याने व शुभ घटना घडल्याने महिला वर्गात आनंद होईल. प्रवास मात्र जपून करणे योग्य होईल. | ||
![]() |
धनू : - प्रतिकुल काळ. | |
| देव आणि दैव यात एका मात्रेचा फरक, परंतु दोन्ही अनुकूल असतील तर राजयोग असतो. या महिन्यात आपली निर्मल व सद्सत्बुध्दी आणि कर्तृत्व यांची परिक्षाच आहे. बहुतांशी बलाढय ग्रह आपणाला श्रध्दा व सबुरी यांचा सल्ला देत आहेत. आपलं काय चुकतंय याचा शोध घेणे जरुरीचे आहे. घरात कलह व मानसिक शांतता दूर होईल. जुने आजार पुढे येणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. माघार घेवूनच पुढे जाता येते हे लक्षात असू द्या. राहू केतु आपल्या विरोधात उभे आहेत. मंगळ वाहपासून जपायला सांगतो. गुरु घरात कलह वाढविणारा आहे. शनि तब्बेतीची काळजी घ्यावी. अशी सूचना देते. शब्द शस्त्र आहे तेव्हा जपून वापरा. यश आपणाला नक्की मिळणार परंतु श्रध्दास्थान वाढविणे जरुरीचे आहे. व्यापारी व उद्योगपती यांनी शांतपणे गुंतवणूक करावी. विवाह इच्छुंनी थोडा धीर धरावा. आहे त्यात समाधान व नवीन जबाबदाऱ्या स्विकारु नयेत. हेच विरोधी ग्रह सांगताहेत. मात्र हे सर्व केल्यास यश नक्की मिळेल. | ||
![]() |
मकर : - खर्चावर नियंत्रण हवे. | |
| या महिन्यात केतु, शुक्र व ग्रहराज रवि आपणाला आर्थिक लाभ करुन देणारे असले तरी राहू, शनि आपणाला अचानक खर्च निर्माण करणारे आहेत, तेव्हा अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे जरुरीचे आहे. विवाह इच्छुंचे विवाह अपेक्षेप्रमाणे जुळून येतील. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या तब्बेतीची काळजी घेण्याची सूचना शनि महाराज करत आहेत. मंगळ महाराज घरातील कलह वाढविणारे आहेत. पोटाच्या विकारापासून सावध रहावे, खाण्यावर बंधन ठेवणे जरुरीचे आहे. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित धनलाभ होईल व त्यांच्या व्यवसायात वाढ होईल. शासकीय कर्मचारी यांना अपेक्षित ठिकाणी बदली योग संभवतो. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. चैनीच्या वस्तू खरेदी होऊन महिलांना सुख व आनंद मिळेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या योजना फलद्रुप होऊन लोकसेवा होईल. | ||
![]() |
कुंभ : - यश संपादन कराल. | |
| या महिन्यात आपणावर गुरुकृपा होणार असून आपणाला कठीण कामात यश मिळणार आहे. यश व कीर्तीदाता गुरु आपली इच्छापूर्ती करणारा आहे. परदेशागमन योग संभवतो. राजकीय क्षेत्रातील व्यक्तीचे व्यक्तीमत्व व प्रभावी नेतृत्व त्यांना यशाच्या उच्च शिखरावर बसवेल. मात्र ध्येय व धोरण याकडेच फक्त लक्ष देणे उचित ठरेल अन्यत: रवि महाराज कार्यात विघ्न आणणेची शक्यता आहे. राहू आपणाला सर्व तऱ्हेची सौख्य व वडिलोपार्जित इस्टेट लाभ करुन देणारा गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित धनलाभ होईल. कलाकारांना उत्तम संधी मिळेल. मात्र मंगळ व शनि आपणाला आर्थिक, शारिरीक व सामाजिक त्रास देण्याची शक्यता आहे. तरी बंधनात रहाणे, घरगुती वाद न वाढविणे योग्य होईल. महिलांनी तब्बेतीची काळजी घ्यावी व संसारात शांतता नांदेल इकडे लक्ष द्यावे. हा महिना उत्तम लाभाचा जाईल. | ||
![]() |
मीन : - दर्जा उंचावेल. | |
| या महिन्यात राहू व केतु हे ग्रह घरगुती समस्या, शारिरीक त्रास व घरात कलह करणारे असले तरी ग्रहराज रवि, व कलागुणसंपन्न शुक्र आपणाला या सर्वांतून मार्ग काढून आपला दर्जा उंचावणार आहेत, तेव्हा काळजीचे कारण नाही, आपले आजार नष्ट होऊन बुध आपणाला अपेक्षित धनलाभ देणार आहे सरकारी क्षेत्रांतील व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना उच्च दर्जा प्राप्तिचा योग संभवतो. विवाह इच्छुंचे विवाह उत्तम प्रकारे जुळून येतील. व्यापारी व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कवी, लेखक व कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी लाभेल. तसेच तांत्रिक व कलाक्षेत्रातील व्यक्तींना परदेशागमन योग संभवतो. शत्रु मित्र बनतील. आपली बुध्दीमत्ता, कर्तृत्व व सामाजिक सेवा यांना वाव मिळून प्रसिध्दी लाभेल. घरात मंगलकार्य झाल्याने महिना वर्गात आनंद होईल. | ||