![]() |
![]() |
|||
| दिनांक: | ||||
![]() |
| मासिक राशीभविष्य | |
| एप्रिल 2010 | |
![]() |
|
| रमेश बा. मावळंकर (ज्योतिषाचार्य) रत्नागिरी मोबाईल-9860886993 |
|
| ग्रहस्थिती | |
| ग्रहस्थिती रविवार - 14 एप्रिल मेषेत, शुक्र-20 एप्रिल वृषभेत, बुध शुक्र-मेषेत, राहू-धनुत, केतु-मिथुनेत, मंगळ-कर्केत, शनि-कन्येत, गुरु-कुंभेत. |
|
![]() |
मेष : - भाग्योदय होईल. | |
| आपण या महिन्यापासून यश, कीर्ति, समृध्दी व मानसन्मान यांच्या लाटेवर उभे आहात. आपल्या प्रगतिला भरती आली आहे, तेव्हा आलेल्या संधीचा वेळीच लाभ घेणे उचित ठरेल आपली प्रगति कुणीही रोखू शकणार नाही. शनि, गुरु व केतु आपणाला यशाच्या उच्च शिखरावर नेऊन ठेवणारे आहेत. जुनी येणी वसूल होतील. शत्रू मित्र बनतील. सर्वांचं सहकार्य मिळेल. मात्र मंगळ आपणाला खाण्या-पिण्यावर बंधन ठेवणेस सांगतोय. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ति होईल. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद व अपेक्षित ठिकाणी बदली संभवते. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य. गर्भवतींना पुत्र योग संभवतो. महिलांना हा महिना सुखात वाढ करणारा आहे. | ||
![]() |
वृषभ : - धाडसी बना. | |
| राहू केतु सारखे बलाढय ग्रह आपल्या प्रगतीत अडथळे आणणारे असले तरी ग्रहराज रवि व धाडसी मंगळ आपले व्यक्तीमत्व उजळवल्याशिवाय राहणार नाही. शनि महाराज मुलाबाळांच्या तब्बेतीकडे लक्ष देणेस सांगत आहेत. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे उचित होईल. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना वरिष्ठांची मर्जी राखणे जरुरीचे आहे. मुलाबाळांशी वाद वाढवू नयेत. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. कलाकारांना उत्तम संधी मिळून प्रसिध्दी मिळेल. व्यापारी कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ति होईल. नवीन वास्तू खरेदी योग आहे. जुने आजार बरे होतील. उगाचच मनात भय निर्माण होणेची शक्यता आहे. तथापि धाडसी मंगळ उत्तम साथ देणारा आहे तेव्हा काळजीचे कारण नाही. नवीन खर्च उपस्थित होतील तेव्हा वेळीच काळजी घेणे जरुरीचे आहे. महिलांना आनंद देणारा हा महिना आहे. | ||
![]() |
मिथुन : - भरभराट होईल. | |
| या महिन्यात यश व कीर्तिदाता गुरु आपणाला उत्तम साथ देणार असून आपणाला अनेक प्रकारची सुख लाभणार आहेत. बुध्दीकारक बुध व कलागुणसंपन्न शुक्र आपणाला उत्तम वरचा दर्जा व वस्त्र लाभ करुन देणारे आहेत. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. उच्च पदावर गेल्यावर गर्व नको. शत्रू निर्माण होणेची शक्यता मंगळ महाराज करणारे आहेत तेव्हा कठोर भाषण करु नये हेच महत्वाचे. शनि महाराज बंधुशी वाद वाढवू नका असे सुचवत आहेत. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना उच्च पद संभवते. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना कीर्ती, यश व अधिकार पद लाभेल. व्यापारी कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तींना सिध्दी प्राप्त होणेचा योग आहे. गुरुमुळे भाग्यवृध्दी होईल. दूरचा प्रवास संभवतो. परदेशागमन होईल. राहू-केतु मानसिक ताण वाढविणेची शक्यता आहे तरी आपल्या कुशाग्र बुध्दीमत्तेच्या जोरावर यश संपादन कराल. गृहिणीना हा महिना आनंद व सुख देणारा जाईल. | ||
![]() |
कर्क : - भाग्य उजळेल. | |
| अनेक संकटांतून आपण धाडसाने व कर्तृत्वाने कार्यात यश मिळविले आहे, आता शनि महाराज आपणावर कृपा करणार असून सरकारी क्षेत्रातील व सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद व आर्थिक लाभ होणार आहे. वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ संभवतो. नवीन वास्तू लाभ होईल. ग्रहराज रवी या महिन्याच्या उत्तरार्धात अवघड कार्यात यश मिळवून देणार आहे. अनेक लाभ करुन देवून दर्जा प्राप्त होणार आहे. व्यापारी उद्योगपती व कारखानदार यांच्या व्यवसायात वाढ होवून अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुंनी नीट माहिती काढूनच विवाह जमवावा. महिलांच्या मनोकामना पूर्ण होतील. गुरुची मात्र अवकृपा असल्याने थोरामोठयांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावेत. तब्बेतीला उष्ण विकारांपासून सांभाळावे. जिद्दीने व कर्तृत्वाने यश प्राप्त होईल. | ||
![]() |
सिंह : - सन्मानाचे योग. | |
| आपण शनिच्या साडेसातीच्या छायेत असलात तरी गुरु सारखा कीर्ति दाता व प्रसिध्द यश देणारा ग्रह आपणाला उत्तम साथ देणारा आहे. राजमान्यता, मानसन्मान व सुख गुरु आपणाला प्रदान करणार आहे तेव्हा काळजी करण्याचे कारण नाही. केतुसारखा बलाढय ग्रह आपणाला अनेक गोष्टीत यश व ऐश्वर्य प्राप्त करुन देणारा आहे. इस्टेट खरेदी योग संभवतो मात्र आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करणे योग्य होईल. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे जरुर आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. व्यापारी कारखानदार यांना अपेक्षित अर्थ प्राप्ती होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या महत्वाच्या योजना सफल होवून प्रसिध्दी मिळेल. बारावा मंगळ मात्र शत्रुपीडा, उष्णतेचे विकार व वाहनापासून सावध राहणेस सांगत आहेत. महिलांच्या अपेक्षापूर्ती होवून सुख लाभेल. | ||
![]() |
कन्या : - तब्बेत सांभाळा. | |
| या महिन्यात बुध्दीकारक बुध, कलागुणसंपन्न शुक्र व धाडसी मंगळ हे ग्रह आपणाला धनलाभ, संतत्ती लाभ करुन देणारे असून डोळयांचा त्रास मंगळ कमी करणारा आहे तेव्हा काळजीचे कारण नाही. गर्भवतींना पुत्रलाभ संभवतो. व्यापारी व उद्योगपती अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. आपणावर गुरु महाराज व शनिमहाराज नाराज असून शत्रुपीडा व जुने आजार पुढे येण्याची शक्यता आहे तेव्हा वेळीच काळजी घेणे जरुरीचे आहे. प्रवास रटाळ होतील. राहू-केतु वैरी निर्माण करणारे आहेत तेव्हा राजकीय व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी सावधानता बाळगणे उचित होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. आपण शनि महाराजांच्या अवकृपेच्या छायेत असल्याने मोठयांचा सल्ला अवघड कामात यश देईल. घरात आनंदी वातावरणाने महिला खुशीत राहतील. | ||
![]() |
तुळ : - जबाबदाऱ्या नको. | |
| आपण शनिमहाराजांच्या साडेसातीच्या फेऱ्यात आहात तेव्हा नवीन जबाबदाऱ्या न स्विकारणे योग्य होईल. धननाश, संकटे व पीडा या तीन गोष्टीत जराशी जरी चूक झाली तरी शनि क्षमा करणार नाही. घाईगडबडीत केलेली कामे त्रासदायक ठरतात. महत्वाचे निर्णय थोरामोठयांच्या सल्ल्याने घेणे उचित होईल. परंतु या सर्वांवर मात करुन आपणाला कीर्ति व सुखदाता गुरु आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. राजकीय क्षेत्रातील व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना उच्चपद संभवते. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. ग्रहराज रवी रोगनाश, शत्रुनाश करणारा आहे तेव्हा काळजीचे कारण नाही. हातून उत्तम कामगिरी होऊन नेत्रदीपक यश लाभेल. व्यापारी उद्योगपती व कारखानदार यांना राहू अनपेक्षित धनलाभ करुन देणारा आहे. मात्र बुध व शुक्र हे ग्रह पीडा देणार नाहीत याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. महिला वर्गाला उत्तम धनलाभ होऊन आनंदात हा महिना जाईल. | ||
![]() |
वृश्चिक: - कीर्ति लाभेल. | |
| या महिन्यात राहू व केतु आपणाला बेजार करणारे असले व बुध दौर्बल्य आणणारा असला तरी अर्थदाता शनि या सर्वातून मार्ग काढून आपणाला यश व कीर्ति देऊन आपल्या आर्थिक अडचणी दूर करणारा आहे. आपली कुशाग्र बुध्दीमता व समयसूचकता यांच्या जोरावर आपण यश संपादन करणार आहात. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. बंधनात राहिल्यास जुने आजार पुढे येणार नाहीत. गुरु महाराज उगाचच मनात भय निर्माण करणारे आहेत. कोणत्याही कटात सामील होणे टाळावे. विवाह जुळण्यास अडथळे निर्माण होणेची शक्यता आहे. व्यापारी कारखानदार यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. आर्थिक समस्या दूर होतील. बेकारांना नोकरीची संधी उपलब्ध होईल. भावंडाशी सलोख्याचे वातावरण ठेवणे उचित होईल. महिला वर्गाला हा महिना उत्तम जाईल. | ||
![]() |
धनु: - दक्षता घ्यावी. | |
| या महिन्यात बहुतांशी ग्रह आपल्या विरोधात उभे आहेत तेव्हा महत्वपूर्ण निर्णय थोरामोठयांच्या सल्यानेच घेणे उचित ठरेल. राहू केतुमुळे मानसिक ताण व घरगुति समस्या उद्भवणेची शक्यता आहे गुरु विरह व वियोग आणेल कार्यात विघ्न व तब्बेतीला त्रास शनि देण्याची शक्यता आहे. तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. नविन जबाबदाऱ्या स्विकारु नयेत हेच योग्य होईल. मंगळ महाराज वाहनांपासून सावध रहाणेचा इशारा देत आहेत, जखमा होणेची शक्यता आहे. फक्त शुक्र हा ग्रह उत्साह व गर्भवतींना पुत्र प्राप्ती योग आणणारा आहे. व्यापारी कारखानदार यांना विचारपूर्वक गुंतवणूक करणे योग्य होईल विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. विद्यार्थ्यांना जिद्द व चिकाटी आवश्यक. महिनांना सावधतेनेच रहाणे योग्य होईल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जि सांभाळणे योग्य होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना सध्या नविन योजना विचारपूर्वक कराव्यात. | ||
![]() |
मकर: - गौरव होईल. | |
| गुरुकृपा ही सर्वात श्रेष्ठ व भाग्याची असते. या महिन्यात आपणाला गुरुकृपेने धनलाभ कौटुंबिक सौख्य लाभून समाजातील दर्जा उंचावेल. आपले प्रभावी नेतृत्व, कर्तृत्व व दातृत्व यामुळे आपला गौरव होऊन प्रसिध्दी व कीर्तिच्या झोतात याल. कलागुण संपन्न शुक्र धनलाभ व मित्र सहकार्य मिळवून देईल. केतु महाराज अचानक धनलाभ करुन आर्थिक समस्या दूर होतील. ग्रहराज रवि राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिंचा दर्जा वाढविणारा आहे. मात्र मंगळ व शनि सावधानता बाळगणेस व अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणेच्या सूचना देत आहेत. पितृसम व्यक्तिंच्या तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक. व्यापारी, उद्योगपती व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होऊन व्यवसायात वाढ होईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. मंगळ कलह करणेची शक्यता आहे तसेच नेत्र व उदर रोगापासून वेळीच सावधानता बाळगावी. वडिलोपार्जित इस्टेट लाभ संभवतो. हा महिना गृहिणींना आनंद व सुख देणारा आहे. | ||
![]() |
कुंभ: - कष्टाचे चीज होईल. | |
| आपण करीत असलेली निर्मळ व निरपेक्ष लोक सेवा व आर्थर्िक उदारता यामुळे या महिन्यात आपला भाग्याचा रथ प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. मानसिक इच्छा पूर्ण होतील. मित्र सहकार्य उत्तम मिळेल तब्बेत उत्तम राहील. राहू महाराज आपणाला सर्व तऱ्हेची सुख व ऐश्वर्य निर्माण करुन देणारे आहेत. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिंचा परदेशागमन योग येईल व त्यांना प्रसिध्दी पैसा मिळेल. बुध्दीकारक बुध, उत्साही शुक्र आपणाला आर्थिक लाभ करुन देणारे आहेत. उत्तरार्धात रवि उच्चपद देईल. स्वतंत्र व्यावसायिक यांना भागिदारी विचारपूर्वक करावी लागेल. विवाह इच्छूंचे विवाह जुळतील. सरकारी क्षेत्रांतील व्यक्तिंना बढती बदलीचे योग आहेत. कारखानदार, उद्योगपती व व्यापारी यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. शनि महाराज आपल्या बुध्दीचातुर्याची परिक्षाच घेणार आहेत. तेव्हा शब्द जपून वापरावेत. महिला वर्गाला हा महिना अपेक्षापूर्ति करणारा आहे. | ||
![]() |
मीन: - विकास होईल. | |
| या महिन्यात बुध्दीकारक बुध व हौशी विलासी शुक्र आपणाला आपल्या आर्थिक समस्या सोडविणारे आहेत. कलागुणांचा विकास होऊन प्रसिध्दी लाभेल. मात्र शनि महाराज घरगुती कटकटी वाढविणारा आहे. घरात कलह विकोपाला जाऊ देऊ नये. उगाचच मानसिक दौर्बल्य अथवा थकवा येईल. धाडस कर्तृत्व व जिद्दपणाला लावावी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंची दैवी उपासना वाढेल व सुख लाभेल. राहू केतु वैरी निर्माण करणेची शक्यता आहे तेव्हा भाषेत गोडवा असणे आवश्यक आहे सरकारी क्षेत्रातील व्यक्तिंनी महत्वाचे बाबतीत गुप्तता पाळावी. व्यापारी उद्योगपती यांनी विचारपूर्वक गुंतवणूक करावी. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तिंनी सावधानता बाळगणे आवश्वक आहे. मिश्र स्वरुपाचा हा महिना जाईल. | ||