![]() |
![]() |
|||
| दिनांक: | ||||
![]() |
| मासिक राशीभविष्य | |
| मार्च 2010 | |
![]() |
|
| रमेश बा. मावळंकर (ज्योतिषाचार्य) रत्नागिरी मोबाईल-9860886993 |
|
| ग्रहस्थिती | |
| 2 मार्च-शुक्र मीनेत, 14 मार्च बुध रवि मीनेत, 26मार्च शुक्र मेषेत, 29मार्च बुध मेषेत, गुरु कुंभेत, शनि-कन्येत, मंगळ कर्केत, राहू-केतू- धनु व मिथुनेत. |
|
![]() |
मेष : उत्कर्ष होईल. | |
| या महिन्यापासून आपण यशाच्या उत्कर्षाच्या लाटेवर आरुढ झालेले आहात. पैसा, प्रसिध्दी, कीर्ती यश, उच्चपद इ. बाबतीत आपण यशस्वी वाटचाल करणार आहात. राजकीय, सामाजिक नोकरवर्ग यांना उच्च पद व अपेक्षित अर्थप्राप्ती होणार आहे. मात्र उच्चपदावर गेल्यावर संय्यमाने आनंद द्विगुणित करणे योग्य होईल.. योजनांचा लाभ प्रत्यक्ष सामान्य माणसांना मिळेल हेच पहावे. विवाह इच्छुंचे विवाह जूळून येतील.व्यापारी, उद्योगपती व कारखानदार यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल घरात मंगलक ार्य होऊन आनंदी आनंद होईल. जुन्या आजारांना डोक वर काढू देऊ नये याची वेळीच काळजी घ्यावी. गर्भवतींना पुत्र लाभ संभवतो एकदरीत हा महिना अपेक्षापूर्ति करणार आहे. | ||
![]() |
वृषभ : अपेक्षापूर्ती होईल. | |
| या महिन्यात ग्रहराज रवि व धाडसी पराक्रमी मंगळ आपणास अपेक्षित धन, मानमुराद देऊन आपली जनमानसात प्रतिमा उंचावणार आहेत. मंगळ आपणाला धाडस देऊन अवघड कामात यश निर्माण करुन देणारा आहे. जुने आजार बरे होतील. आर्थिक भरभराट होऊन मन : शांती मिळेल. शुक्र महाराजांच्या कृपेने वस्त्र लाभ व धनलाभ होईल. व्यापारी कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. राहू-केतु मात्र अनाठायी खर्च व प्रकृतिची काळजी घ्यावी अशा सूचना देत आहे. मुलाबाळांशी उत्तम संबंध प्रस्थापित करावेत. विद्यार्थी व खेळाडूंना जास्त मेहनत घ्यावी लागेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तिंना उच्चपद व मानसन्मान मिळेल. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. महिला वर्गाच्या मनोकामना पूर्ण होतील हा महिना आनंदात जाईल. | ||
![]() |
मिथून : गुरुकृपा होईल. | |
| या महिन्यात आपणावर गुरुकृपा होणार आहे, आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने पहाट होणार आहे गुरुमहाराज आपणाला यश, कीर्ति, सिध्दी व सौख्य मिळवून देतील. अध्यात्मिक उपासना करणाऱ्या व्यक्तिंना दृष्टांताने खरं समाधान लाभेल. बुध्दीकारक बुध आपल्या बुध्दीची चुणुक दाखविल्याशिवाय रहाणार नाही. शुक्र आपल्या कलागुणांचा विकास करुन प्रसिध्दीचे झोतात आणेल. या महिन्यात बहुधा परदेशागमन योग येईल. मात्र घरात कलह वाढवू नये. मुलाबाळांशी समजुतीने घ्यावे. शनि घरच्या कटकटी वाढविणेची शक्यता आहे तरी वेळीच सावधानता बाळगावी मंगळ अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणेस सांगत आहे. विरोधक शक्यतो निर्माण करु नयेत. कारखानदार व्यापारी यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुंचे विवाह जूळून येतील. एकंदरीत हा महिना आपल्या कर्तुत्व व बुध्दीमत्तेची परिक्षा घेणारा असेल. | ||
![]() |
कर्क : समस्या सुटतील. | |
| या महिन्यात आपणावर शनि, राहू यासारखे बलाढय ग्रहांची कृपा होणार असल्याने थोडयाश्या अपयशाने नाराज होऊ नये. आपल्या आर्थिक समस्या लवकरच सुटणार आहेत. मंगलकार्यासाठी झालेला खर्च भरुन निघेल. सरकारी कर्मचारी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आणि कामगार यांना धनलाभ व उच्चपद संभवते. इस्टेटीच्या समस्या दूर होतील. दूरचे प्रवास होतील. देवाप्रमाणे दैवसुध्दा अनुकूल असणे आवश्यक आहे. विवाह इच्छुंचे विवाह जूळून येतील. कलागुणांचा विकास होईल. विद्यार्थी व खेळाडू यांना प्राविण्य मिळेल. कारखानदार, उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. मंगळ महाराज उष्णतेच्या विकारापासून सावध रहाणेचा सल्ला देत आहे.धाडसाने व स्वकर्तुत्वाने पुढे जावे हेच लाभदायक होईल. महिला वर्गाला अपेक्षापूर्ति करणारा हा महिना जाईल. | ||
![]() |
सिंह : सुख प्राप्त होतील. | |
| या महिन्यात आपणावर गुरू व केतू यांची कृपादृष्टी होणार असून आपल्या अनेक समस्या दूर होतील व आपणाला सर्व तऱ्हेची सुख लाभणार आहेत. मात्र आपण शनिच्या साडेसातीत असल्याने आर्थिक व्यवहार जपून करावेत घरात अनेक व्यवहारातुन कलह होऊ देऊ नये. या सर्वावर गुरू मात करेल तेव्हा काळजीचे कारण नाही. आर्थिक खर्च खूप वाढेल. शत्रु डोक वर काढयाची शक्यता आहे तेव्हा प्रत्येक व्यवहारात गुप्तता राखावी. उष्णतेच्या व पित्ताच्या विकारापासून सावध रहावे. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींनी वरिष्ठांची मर्जी संपादन करणे जरूरीचे आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिंची अपेक्षापुर्ति होईल. कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित धनलाभ होउून यश लाभेल. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. महिलांना व विद्यार्थ्यांना हा महिना सुखाचा जाईल. | ||
![]() |
कन्या : धाडसी बनाल | |
| या महिन्यात मंगळासारखा धाडसी, पराक्रमी ग्रह आपणाला अनेक अवघड गोष्टीत जिद्दीने यश मिळवून देणारा आहे.बहुतांशी बलाढय ग्रह आपल्या विरोधात राहून अनेक समस्या निर्माण करणारे आहेत तेव्हा आतातायीपणाने महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. परक्या माणसांना साथ देऊन घरची माणस दूखवु नयेत हेच योग्य होईल. राहू-केतु घराच्या समस्या वाढविणारे आहेत. जूनी प्रकरण पुढे येतील.आपल्या बुध्दीचातुर्याचा चांगला उपयोग केल्यास अनेक अवघड कामात यश मिळू शकेल. पैसा अपेक्षित लाभले परंतू कर्ज काढु नये. व्यापारी उद्योगपति यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. गुरूमहाराजांची अवकृपा करून देऊ नये. बंधनात व थोरामोठयांचा सल्ला घेतल्यास या महिन्यात आपले व्यक्तिमत्व उजळाल. विवाह इच्छुंचे विवाह जूळून येतील. महिला वर्गाला शांत व समजुतीने रहाणेचा काळ आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. | ||
![]() |
तुळ : अपेक्षापूर्ती होईल. | |
| गुरुसारखा कीर्तीदाता, यशदाता व सिध्दीदाता ग्रह आपणाला उत्तमप्रकारे साथ देऊन आपले जनमानसात व्यक्तिमत्व उजळवणार आहे, त्यात राहू आपणाला सुख व धनलाभ करुन देणारा आहे. सरकारी क्षेत्रातील व्यक्तिंना यश व कीर्ती लाभून अनेक योजना जनकल्याणासाठी राबवल्या जातील. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. हे सर्व करताना कुणी दुखावणार नाही याची काळजी घेणे जरुरीचे आहे. विशेषत: केतु, रवि मंगळ आपल्या कार्यात अडथळे निर्माण करुन मोह व रोश उत्पन्न करणारे आहेत तेव्हा सावधानता बाळगणे योग्य होईल. कोर्टकचेरीची कामे लांबणीवर टाकावीत कारखानदार व उद्योगपती यांनी आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. आपण शनिच्या साडेसातीच्या फेऱ्यात आहात, शनि हा कठोर शिक्षक आहे याची जाणीव ठेवावी. तरीही गुरुकृपा झाल्याने या सर्वातून आपण सहज मोकळे व्हाल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. गर्भवतींना पुत्र योग संभवतो. | ||
![]() |
वृश्चिक : भाग्य उजळेल. | |
| शनिसारखा कीर्तीदाता, यशदाता व अर्थदाता ग्रह आपणाला या महिन्यात आपल्या अवघड कामात यश व अपेक्षित अर्थप्राप्ती करुन देणारा आहे. आपला उत्कर्षाचा रथ प्रगति पथावरुन मार्गक्रमण करुन आपले भाग्य उजळवणार आहे. आर्थिक समस्या दूर होतील. कुशाग्र बुध्दीकारक बुध आपल्या बुध्दीची व कर्तुत्वाची चुणुक दाखविणार असून व्यक्तिमत्व उजळवणारा आहे. मात्र राहू-केतु अनाठायी खर्च तब्बेतीला त्रास देणेची शक्यता आहे, मनोदौर्बल्य येईल. मंगल कार्यात अडथळे आणण्याची शक्यता आहे. रवि वीरोधकांना साथ देणारा आहे. तरी वेळीच सावधानता बाळगावी. व्यापारी व कारखानदार यांच्या उद्योगात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुंनी विवाह जुळला व नीट माहिती काढून विवाह करावा. आर्थिक समस्या सुटल्याने अनेक कामात यश संपादन कराल. महिलांनी तब्बेतीला जपावे. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. | ||
![]() |
धनु : सल्ला घ्यावा. | |
| या महिन्यात राहू, केतु, शनि गुरु हे बलाढय ग्रह आपल्या विरोधात रहाणार आहेत, तरी महत्वाचे निर्णय थोरामोठयांच्या सल्ल्याने घेणे उचित ठरेल. आपल्या कार्यात अडथळे आणण्याचे काम गुरु मंगळ करणार आहेत. शक्यतो दूरचा प्रवास टाळावा. मंगळ वाहनापासून सावध रहाणेस सांगतोय. घरातील कलह वाढवू देऊ नये. गर्भवतींना पुत्र प्राप्ती योग संभवतो. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. गैर समज गैर असतात. याची जाणीव ठेवणे उचित होईल. व्यापारी, उद्योगपती यांनी व्यापारात विचारपूर्वक गुंतवणूक करणे इष्ट ठरेल. आपली अध्यात्मिक उपासना या महिन्यात उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लख केंद्रीत करावे. हा महिना महिलांना त्यांच्या बुध्दीमत्तेची व कर्तुत्वाची चुणुक दाखविणारा जाईल. | ||
![]() |
मकर : गुरुकृपा होईल. | |
| गुरुकृपा झाली की संकट व दु:ख यांचा नाश होतो, शत्रु मित्र बनतील. आर्थिक समस्या सुटतील व कीर्ती मिळून समाजात व्यक्तिमत्वाचा ठसा उमटेल, अशीच स्थिती आपली या महिन्यात होणार आहे. आपल्या कष्टाच व निरपेक्ष बुध्दीने केलेल्या कामाच चीज होऊन आपणाला स्वास्थ व खरं समाधान मिळणार आहे. अचानक धनलाभ संभवतो. इस्टेटीचे व्यवहार आपल्या मनासारखे होतील. व्यापारी, कारखानदार यांच्या व्यवसायात वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. बुध्दीकारक बुध व उत्साह देणारा शुक्र आपणाला धनलाभ व नविन मित्र मिळवून देणारे आहेत. मंगळ महाराज मात्र घरात कलह व अनाठायी खर्च करणेस लावेल. तब्बेतीची काळजी घ्यावी. शनि देखील खर्च वाढवेल. सरकारी व राजकीय क्षेत्रातील व्यक्तिंना उच्चपद लाभेल. गृहीणींना हा महिना खूप सुखात जाणार आहे. | ||
![]() |
कुंभ : यश लाभेल. | |
| या महिन्यात गुरु, राहू शुक्र व मंगळ हे बलाढय ग्रह आपल्या बाजुने आपणाला अवघड कार्यात यश व कीर्ती मिळवून देण्यासाठी उभे असल्याने चिंता करणेचे कारण नाही. परदेशागमन योग संभवतो. सौख्य व ऐश्वर्य राहूमुळे प्राप्त होणार आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. आपल्या निरपेक्ष बुध्दीने केलेल्या लोकसेवेच चीज होईल. प्रतिष्ठित व महान व्यक्तिंकडून आपला मानसन्मान होईल. शनि घरगुती समस्या वाढविणारा व अनाठाई खर्च करणेस लावणार आहे, तरी वेळीच बंधनात रहावे हे योग्य. शत्रु मित्र होतील आजार नाहीसे होतील, स्वास्थ लाभेल. अध्यात्मिक उपासनेचं फळं मिळेल. राजकीय व सामाजिक आणि सरकारी क्षेत्रातील व्यक्तिंना उच्चपद मिळणेची शक्यता आहे. व्यापारी कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रीत करावे. घरात मंगलकार्य होईल. महिलांना सुख व शांती देणारा हा महिना जाईल, चैनीच्या वस्तू खरेदी होतील. | ||
![]() |
मीन : विचारपूर्वक निर्णय घ्या. | |
| या महिन्यात संमिश्र स्वरुपाचे ग्रहमान आहे. बुध्दीकारक बुध व उत्साहवर्धक शुक्र आपणाला उत्तम प्रकारे साथ देऊन आपल वर्चस्व समाजात वाढविणारे आहेत. कलागुणांचा विकास होईल. शनि अपेक्षित अर्थप्राप्ती करुन देणारा आहे, तथापि घरातील कलह वाढविणे योग्य होणार नाही. मंगल कार्यात अडथळे आणेल व मन:शांती भंग होणेची शक्यता आहे. वैरी निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मानसिक तणाव वाढविणारे ग्रहमान आहे तेव्हा मनाने खंबीर असणे आवश्यक आहे. व्यापारी उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विवाह इच्छुंंचे विवाह जुळून येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रीत करणे जरुरीचे आहे अध्यात्मिक उपासनेवर भर देणेच उचित ठरेल. नविन जबाबदाऱ्या स्विकारु नयेत. | ||