दिनांक:
 
 
मासिक राशीभविष्य
फेबु्रवारी 2010
रमेश बा. मावळंकर
(ज्योतिषाचार्य)
रत्नागिरी
मोबाईल-9860886993
ग्रहस्थिती  
5 फेबु्रवारी बुध मकरेत, 6 फेबु्रवारी शुक्र कुंभेत, 12 फेबु्रवारी रवि-कंभेत, 25 फेबु्रवारी बुध कुंभेत,राहू-धनुत, केतु-मिथुन, शनि-कन्येत, मंगळ-कर्केत.
 
  मेष : भरभराट होईल.
या महिन्यात बहुतांशी बलाढय ग्रह आपल्या बाजुने यश, कीर्ति, समृध्दि व मानमुराद देणेस उभे आहेत, तेव्हा आपण उत्कर्षाच्या लाटेवर आरुढ झालेले आहात. आता आपली प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. केतु महाराज अचानक धनलाभ करुन देणारा आहे. अनेक प्रकारची सुख प्राप्त होतील. आलेल्या सुवर्ण संधीचा लाभ वेळीच उठवा. आपणावर शनिमहाराजांचीही कृपादृष्टी होणार असून आपल्या आर्थिक समस्या सुटणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना उच्चपद व अपेक्षित जागी बदली संभवते. या महिन्यापासून गुरुकृपेने आपण सर्व सुख प्राप्त करणार आहात. कुशाग्र बुध्दीमत्तेने,र् कत्तुत्वाने व दातृत्वाने प्रसिध्दीचे झोतात याल ! गर्भवतींना पुत्र प्राप्ती योग संभवतो. व्यापारी वर्गाला अपेक्षित प्राप्ती होईल विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. हा महिना भरभराट व प्रगतीकारक आहे.
     
  वृषभ : यश संपादन कराल.
या महिन्यात ग्रहराज रवि व धाडसी पराक्रमी मंगळ, आपणाला अवघड कार्यात यश मिळवून देण्यासाठी आपल्या बाजुने उभे आहेत, कोर्टकचेरीचे निकाल आपल्या बाजुचे लागतील. समाज्यात प्रतिष्ठीत व्यक्तींकडून आपला गौरव होऊन प्रसिध्दी मिळणेची शक्यता आहे. मात्र राहू व केतु हे ग्रह आपल्या विरोधात उभे असून अनाठायी खर्चावर नियंत्रण व तब्बेतीची काळजी घेणेस सांगत आहेत. अध्यात्मीत उपासनेत खंड पडू देऊ नये. घरातील वादविवाद विकोपाला जाऊ देऊ नयेत. शनिमहाराजही जुने आजार पुढे आणणेची शक्यता आहे तेव्हा वेळीच बंधनात रहाणे योग्य होईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते मात्र भागिदारीत व्यवसाय सावधतेने करावा. कवि कलाकार यांना मेहनत खुप घ्यावी लागेल. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरावे असे बुध सांगतोय. सर्वांवर मात करुन यशस्वी व्हाल व प्रसिध्दी लाभेल.
     
  मिथून : गुरुकृपा होईल.
या महिन्यात ग्रहराज रवि व किर्तीदाता गुरु आपल्या पाठीशी खंबीरपणे यश व कीर्ती देणेस उभे असल्याने धाडसाने पुढे जाऊन प्रगती पथावर आपण रहाणार आहात. गेले वर्षभर आर्थिक दृष्टया सबळ परंतु मानसिकदृष्टया खच्चिकरण झाले होते ते आता दूर होईल. अवघड कार्यात यश संपादन कराल. समाजात मानाचे स्थान मिळेल. राजकीय क्षेत्रातील व शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना उच्चपद दर्शविते. मात्र मंगळ शत्रु निर्माण करणेची शक्यता असल्याने कठोरभाषा वापरु नये हेच उत्तम होईल. घरातील भाऊबंधक्या वाढणार नाहीत याची दक्षता घेणे जरूरीचे आहे. व्यापारी व कारखानदार यांनी विचारपुर्वक गुंतवणुक करावी. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. अनेक कार्यात यश लाभेल. खेळाडूंना प्राविण्य मिळेल. घरात आनंदी आनंद झाल्याने महिला वर्ग खुष राहील.
     
  कर्क : सुख लाभेल.
पैसा मिळाला तरी तो हातात टिकवणे कठीण याची प्रचिती आपणाला या महिन्यात येणार आहे. दैव अनुकूल असणे आवश्यक आहे. या महिन्यापासून आपणावर गुरूची वक्रदृष्टी रहाणार आहे तथापि, राहू व शुक्र हे बलाढय ग्रह आपणाला अर्थप्राप्ती व सर्वतऱ्हेची सुख प्राप्त करून देणार आहेत. शनिच्या साडेसातीतल्या गंभीर व चिंताजनक घटना आता हृदयपटलावरून काढून टाका व धाडसी मंगळाच्या सहाय्याने अवघड कार्यात यश मिळवून घ्यावे हेच योग्य शनिमहाराज राजकीय क्षेत्रातील व नोकरवर्गाला उच्चपद देणारे आहेत. अचानक नोकरीत अपेक्षित पैसा हाती येईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. गर्भवतींना पुत्रप्राप्ती संभवते. चैनिच्या वस्तु खरेदी होऊन महिला वर्गात आनंद होईल. कलाकरांना उत्तम संधी प्राप्त होईल.
     
  सिंह : कीर्ति लाभेल.
या महिन्यात आपली बुध्दीमत्ता कर्तुत्व व नेतृत्व आपणाला यश व कीर्ती बुध महाराज मिळवून देणारे आहेत. वडिलोपार्जित इस्टेटीचा लाभ होणेची शक्यता आहे.तसेच अचानक धनलाभ ही संभवतो. सध्या आपणावर गुरूमहाराज 19डिसेंबर 2009 नंतर कृपा करणारे असून भरभराट होईल मात्र राहू महाराज आपणाला अनाठायी खर्च करायला लावतील. मानासिक क्लेश देतील कर्जाच्या ओझ्याखाली तणावात रहाल. मंगळ उष्णतेचे विकार धननाश, वैरी वाढविणे ची शक्यता नाकारता येत नाही तरी वेळीच सावध रहावे. आपला परका याची जाणीव नंतर होते.मंगळ कार्यासाठी प्रवास होतील. व्यापारी उद्योगपति व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. पत्नीच्या तब्बेतीला जपावे. केतु महाराज मात्र या सर्वावर मात करून आपले व्यक्तिमत्व उजळवणारे आहेत. विवाह इच्छुकांचे विवाह जुळून येतील. लेखक कलाकर व खेळाडू यांना प्रसिध्दी मिळेल. महिला वर्गाला सुखकारक हा महिना जाईल. डिसेंबर नतर उत्तम काळ आहे.
     
  कन्या : विचारपूर्वक निर्णय घ्यावेत
आपण शनि महाराजांच्या अवकृपेच्या छायेत वावरत आहात तेव्हा आर्थिक व्यवहार व अवघड कामे थोरामोठयांच्या सल्ल्याने करणे योग्य होईल. जुने आजार डोंक वर काढणार नाहीत याची दक्षता घ्यावी राहू महाराज घरगुती वाद वाढवू नयेत अशी सूचना देत आहेत. बुध घरात कलह वाढविणारा आहे. या सर्वापासून वेळीच सावधानता बाळगा. या सर्वांवर मात करणे साठी धाडसी व पराक्रमी मंगळ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तेव्हा काळजी करण्याचे कारण नाही. गुरुकृपा असणे अत्यंत आवश्यक आहे पण गुरु नाराज होतील असं काहीही करु नये. बुध्दीमत्तेचा सदुपयोग करणेच इष्ट होईल. व्यापारी व कारखानदार यांनी गुंतवणुकीपूर्वी खात्री करुन घ्यावी. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. महिलांनी या महिन्यात कर्तव्यतत्पर असणे योग्य . शनिची उपासना हा त्यावर दैवी इलाज आहे.
     
  तुळ : अपेक्षापूर्ती होईल.
काळोखातून जाताना माणसाने धावू नये हेच योग्य. आपण शनिच्या साडेसातीत आहात, तरी प्रत्येक गोष्ट थोरामोठयांच्या सल्यानेच करणे योग्य होईल. आपणावर गुरुकृपा आहे तेव्हा काळजीचे कारण नाही. गुरुमहाराज आपल्या कष्टाच, कर्तृत्वाच चीज थोरामोठयाकडून करणार आहेत. विवाह इच्छूंचे विवाह जुळुन येतील. गर्भवतींना पुत्रप्राप्ती योग संभवतो. गुरुमुळे राजकीय व सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना उच्च पद व मानसन्मान लाभेल. अनाठार्य खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. शनि ,मंगळ आपले जुने आजार पुढे आणणेची शक्यता नाकारता येत नाही, तरी वेळीच दक्षता घ्यावी. नविन जबाबदाऱ्या स्विकारु नयेत. मंगळ महाराज उगाचच भय निर्माण करणेची शक्यता आहे. पण राहू महाराज आपणाला आर्थिक व सामाजिक उत्तमप्रकारे मदत करणारे आहेत. व्यापारी व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते. कलाकार व खेळाडुंना यश प्राप्त होईल. महिलांना हा महिना सुख प्राप्त करुन देणारा आहे.
     
  वृश्चिक : भरभराट होईल
या महिन्यात शनिमहाराजाची कृपा आपणावर होणार आहे. कीर्ती, यश, संपत्ती, मानमुराद इत्यादी प्राप्त होतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तीेंना उच्चपद लाभेल. सरकारी क्षेत्रातील व खाजगी कारखान्यातील व्यक्तींना अपेक्षित धनलाभ संभवतो. अउलेली कामे मार्गी लागतील. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. घरात मंगलकार्य झाल्याने गृहीणी खुष होतील. घरात चैनिच्या वस्तू व पाहुण्यांची रेलचेल असेल. मात्र राहू अनाठाई खर्चावर नियंत्रण ठेवणेस सांगत आहे तर केतु जुने आजार पुढे येण्याची शक्यता दर्शवत आहे तरी वेळीच बंधनात राहून दक्षता घ्यावी. गुरुमहाराज जनावरांपासून सावध रहाणेस सांगत आहे. दौर्बल्य येऊन देऊ नका, धाडसाने पुढे जावे. ज्यांच्यात हिम्मत त्यालाच किंमत/कारखानदार व व्यापारी यांना अपेक्षित अर्थप्राप्ती संभवते. खेळाडुंना व विद्यार्थ्यांना यश मिळेल. या महिन्यात आर्थिक समस्या सुटतील व प्रगतिचा मार्ग मोकळा होईल.
     
  धनु : यश लाभेल.
या महिन्यात कलागुणांचा विकास करणारा शुक्र व बुध्दीकारक बुध आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. तेव्हा यशोदेवता आपणालाच माळ घालणार हे निश्चित. ग्रहराज रवि आपणाला उच्चदर्जा प्राप्त करुन देणारा आहे, अचानक धनलाभ होईल. शत्रु मित्र बनतील. मात्र राहू केतु हे ग्रह आपणावर नाराज असून तब्बेतीची काळजी घेणेस सांगत आहेत. मंगळ महाराज वाहनांपासून सावध रहाणेचा इशारा देत आहेत, उषणतेचे विकार व पीडा मंगळ देणेची शक्यता आहे तरी वेळीच सावधानता बाळगावी शनि महाराज अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवण्यास सांगत आहेत. बुध्दीमत्तेचा वर् कत्तुत्वाचा विचार करून यश पदरी पाडून घ्यावे. कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित धनलाभ संभवतो. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील.
     
  मकर :व्यक्तिमत्व उजळेल.
कित्येक दिवस आपण ताणतणावाखाली होतात, परंतु आता गुरूकृपेने सर्व संकटांवर मात करून आपण व्यक्तिमत्व उजळवणार आहात. राजकिय क्षेत्रातील व्यक्तिंना प्रभावी नेतृत्व लाभेल जनमानसात प्रतिमा उंचावेल. शुक्र महाराज अचानक धनलाभ करुन देणारे आहेत. केतुसारखा बलाढ्य ग्रह वडिलोपार्जित इस्टेट लाभ व जुनि येणी वसुल करुन देणारा आहे आपलेच म्हणणे दुसऱ्यावर लादु नका असे रवि बुध सुचवित आहेत. आपले कार्यक्षेत्रातून कुणी दुखवणार नाही. याची काळजी घेणे जरुरीचे आहे. सरकारी व कारखान्यातील व्यक्तिंना उच्चपद लाभणेची शक्यता आहे.उद्योगपती कारखानदार यांच्या व्यवसायांत वाढ होऊन अपेक्षित अर्थप्राप्ती होईल.विवाह इच्छुंचे विवाह जुळुन येतील . कलाकारांना व खेळाडुंना उत्तम संधी मिळेल. घरात मंगलकार्य व चैनीच्या वस्तु आल्याने गृहीणी आनंदात रहातील. पोस्टाचे विकारापासून सावध रहावे. एकंदरीत हा महिना सुखावह ठरेल.
     
  कुंभ :दूरचे प्रवास होतील.
या महिन्यात राहू महाराज आपणाला सौख्य, ऐश्वर्य , यश प्राप्त करुन देणारा आहे. ग्रहराज रवि व्यक्तिमत्व उजळवेल. अनेकांना परदेशागम योग येणार आहे. कलाकार शुक्र कलागुणांचा विकास करेल. विवाह इच्छुंचे विवाह जुळुन येतील. धाडसी मंगळ आपले जुने आजार नष्ट करेल. तब्बेतीत सुधारणा होईल. अनेक बाबतीत आपण आघाडीवर रहाणार आहात. मात्र शनि महाराजंाची अवकृपा असल्याने प्रत्येक बाब मोठयांच्या व अनुभवी व्यक्तिेंच्या सल्याने करणे इष्ट ठरेल. घरातील व्यक्तिंशी कलह वाढवू नये हेच योग्य. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. विद्यार्थी व खेळाडू यांना खूप मेहनत घ्यावी लागेल. हा महिना सुखाचा जाऊन आपले व्यक्तिमत्व उजळवणार आहे.
     
  मीन :सावधानता बाळगावी
हा महिना आपलेर् कत्तुत्व दातृत्व व नेतृत्व यावर आपली भरभराट करणारा आहे. बहुतांशी बलाढय ग्रह आपल्या विरोधात उभे आहेत. तेव्हा नविन जबाबदाऱ्या न स्विकारणेच योग्य होईल. घरच्या वादाला वाढवू देऊ नये कारण त्रासदायक होईल. फक्त राहू महाराज आपणाला सुखकारक अशा गोष्टी घडवून आणतील. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणेस मंगळ सांगत आहे. या महिन्यात थोडी माघार घेऊनच पुढे जाणे योग्य होईल. शुक्र मात्र आर्थिक चणचण भासू देणार नाही. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील. व्यापारी कारखानदार व उद्योगपती यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. कवि कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होईल. मन खंबीर ठेवून यश प्राप्ती करुन घेणे उचित होईल.