दिनांक:
 
 
मासिक राशीभविष्य
जानेवारी 2010
रमेश बा. मावळंकर
(ज्योतिषाचार्य)
रत्नागिरी
मोबाईल-9860886993
ग्रहस्थिती  
ग्रहस्थिती:- 13 जानेवारी 2010 शुक्र मकरेत, 14 जानेवारी 2010 रवि मकरेत, 27 जानेवारी 2010 हर्षल मीनेत, शनि-कन्येत, मंगळ - कर्केंत, राहू-धनुत, केतु-मिथुनेत, गुरू-कुभेंत
 
  मेष : कीर्ती मिळेल.
नविन वर्ष आपणासमोर सुख समृध्दी, यश व कीर्ति यांच सुवर्णतबक घेऊन उभे आहे. आपणावर कीर्तिदाता गुरू व अर्थदाता शनि यांची कृ पादृष्टी झाल्यामुळे आपल्या प्रगतीचा रथ आता कुणीही अडवू शकणार नाही. त्यात रवि व केतू आपणाला अवघड कार्यात यश संपादन करून देऊन आपली जनमानसातील पत वाढेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तिंना हा महिना म्हणजे भाग्योदयाची पर्वणीच आहे. मात्र आनंद संयमाने व्दिगुणीत करणे प्राप्त आहे असे मंगळ व राहू आपणास सूचित करत आहे. व्यापारी वर्गाला वृध्दी होऊन अपेक्षित धनलाभ होईल. जागरण व खाण्यापिण्यावर बंधन ठेवणे उचित होईल. विद्यार्थ्याची अभ्यासात प्रगती होईल. नवीन घर व वाहन खरेदीचा योग येईल म्हणून महिलावर्ग समाधानी राहील.
     
  वृषभ : विकास होईल.
आपल्या राशिचा राशिस्वामी उत्साही कलागुणांचा विकास करणारा व कीर्ति देणारा शुक्र आहे. या महिन्यात शुक्र आपणाला उत्तम साथ देऊन अवघड कार्यात यश संपादन करून देणारा आहे तसेच आपला उत्साह वाढेल. धाडसी पराक्रमी मंगळ शत्रूवर मात करून व्यक्तिमत्व उजळवणारा आहे. हिम्मतीने पुढे जावे व प्रगती वाढवावी असा सल्ला मंगळ देतोय. मात्र शनि, राहू केतू आपणाला नको त्या प्रकरणात गुंतविण्याची शक्यता आहे. तरी वेळीच वाद व भांडण आणि गुंतागुंतीच्या प्रकरणात पडून त्रासात जाऊ नये हेच योग्य. व्यापारी, कारखानदार यांना अपेक्षित अर्थ प्राप्ती होईल. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे. घरातील माणसांशी समजंसपणाने वागणेच योग्य होईल. गर्भवतींना पुत्रलाभ संभवतो. मंगल कार्यानिमित्त सुवर्णालंकार खरेदी होऊन महिला वर्ग आनंदात राहिल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी धाडसाने प्रगती करून घ्यावी.
     
  मिथुन : गुरूकृपा होईल
गेले वर्षभर गुरुमहाराजांनी आपली परिक्षाच घेतली होती. मानसिक ताणतणाव व खर्च खूप झाला. पैसा गुंतवून राहिल. हे जरी खरं असलं तरी या महिन्यात आपणावर गुरुमहाराज प्रसन्न आहेत. व कृपा करणार आहेत. हे ही खरच आहे. आपल भाग्य उजळून लोकमत व प्रतिष्ठा मिळवून देतील. भाग्य उजळेल. केवळ गुरुकृपेने शनि महाराज वडीलोपार्जित इस्टेटीचा व आर्थर्िक लाभ करून देतील. घरगुती वाद सामंजसपणेच सोडवावेत. मंगळ मात्र भाषा शैली उत्तम वापरण्यास सांगतोय. कारण गैरसमज होऊन त्रास होण्याची शक्तता आहे. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. विवाह इच्छूनी पत्रिका जुळली तरच विवाह करावा. महिलांना 13 जानेवारीला शुक्र उत्तम साथ देवून कलागुणांचा विकास करणारा आहे. सरकारी क्षेत्रातील व्यक्तिंनी वरिष्ठांच्या सल्ल्यानेच वागावे हेच योग्य होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल.
     
  कर्क : आर्थिक लाभ होईल.
ज्या शनिच्या अवकृपेने आपण कित्येक वर्षे त्रासात होतात तोच शनि आता आपणावर कृपा करणार असून आपणाला समस्या मुक्त करणार आहे. शनि हा अर्थदाता, कीर्तीदाता व दीर्घकाळ टिकणाऱ्या व्यवसायात यश देणारा आहे. धाडसी व पराक्रमी मंगळ शत्रुवर मात करून आपली प्रतिमा उजळवेल. मात्र तिखट पदार्थ खाऊ नये. अन्यथा उष्णतेचे विकार होण्याची शक्यता वाटते. बुध्दीकारक बुध आपल्या कर्तृत्वाला व बुध्दीमत्तेला वाव देणारा आहे. थोरामोठया वडीलधारांकडून धनलाभ संभवतो. धाडस, कर्तृत्व व बुध्दीमत्ता यांच्या जोरावर आपण यश संपादन करा. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना यश व किर्ती लाभेल. अध्यात्मिक उपासनेवर भर द्यावा. केतू खर्चावर नियत्रंण ठेवण्यास सांगत आहे. आर्थिक समस्या सुटल्याने महिलावर्ग समाधानी होईल.
     
  सिंह : कष्टाचं चिज होईल.
सध्या आपण जरी शनिच्या साडेसातीच्या फेऱ्यात अडकला असलात तरी या महिन्यात ग्रहराज रवी अवघड कार्यात यश देऊन आपली प्रतिष्ठा वाढवेल. उत्साहवर्धक व कलागुणांचा विकास करणारा शुक्र मात्र शत्रुपक्षाचा जोर वाढविणारा आहे. शत्रु निर्माण होणार नाहीत याची खबरदारी घेणे उचित ठरेल. स्पष्टवक्तेपण न करणे इष्ट. केतू महाराज आपणावर प्रसन्न असून अलभ्य धनलाभ व अनेक सुख देणारा आहे. शनि, मंगळ मात्र अवाढव्य खर्च वाढविणारे आहेत. पैसा आला तरी तो टिकेल अशी योजना करणे आवश्यक आहे. विवाह इच्छुंचे विवाह जुळतील. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक गुंतवणूक करणे आवश्यक आहे सुख व पैसा प्रसिध्दी देणारा महिना असल्याने महिलावर्ग खूष होईल.
     
  कन्या : सावधनता बाळगा !
आपण शनिमहाराजांच्या अवकृपेच्या छायेत आहात,तेव्हा कुशाग्रबुध्दी व समयसूचकता यांच्या जोरावर यश पदरी पाडून घेणेच इष्ट होईल. खंबीर शरीरात खंबीर मन हवं. धाडसी पराक्रमी मंगळ आपणाला अपेक्षित पैसा व आरोग्य देणारा आहे, परंतु मनावर ताबा ठेवणे उचित ठरेल. खर्चावर नियंत्रण व स्त्रियांनी संसारात सूक्ष्म लक्ष देणे गरजेचे होईल. शनि व राहू शत्रू निर्माण करणारे आहेत तेव्हा भांडणे व वाद यापासून अगदी दूर राहणे उचित होईल. गर्भवतींना पुत्र प्राप्ती योग संभावतो. गुरु महाराज तब्येतीची काळजी घेण्यास सांगत आहे. पैसा मिळेल. पण टिकवणे कठीण होईल. व्यापारी, कारखानदार व उद्योगपती यांनी विचारपूर्वक आर्थिक गुंतवणुक करण्याची जरुरीचे आहे. विवाह इच्छूंचे विवाह जूळून येतील. लेखक, कलाकार व विद्यार्थी यांना प्रसिध्दी मिळेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना माघार घेऊन पुढे जाणेच योग्य होईल.
     
  तुळ : इच्छा पूर्ती होईल.
दिर्घकाळ टिकणारे व उत्पन्न देणारे व्यवसाय शनिमहाराज करतात. या महिन्यापासून खाण, जमिन, व्यवसाय व कारखानदार यांनी विचारपूर्वक गुंतवणूक करणे योग्य होईल. राहू, बुध आपणाला सौख्य, धनलाभ देऊन व्यक्तिमत्व उजळवणारा आहे. तथापी शनिमहाराजांची अवकृपा असल्याने सावधानता बाळगावी लागणार आहे. शत्रुपक्षाचा जोर वाढवू देऊ नये. अशा वेळी थोरामोठयांचा सल्ला उपयुक्त ठरेल. शुक्र आपणाला उत्साह व मान्यता देवून पत वाढविणारा आहे. विवाह इच्छूंचे विवाह जुळून येतील. खर्चात वाढ होईल. कलाकारांना उत्तम संधी प्राप्त होईल. गुरुमहाराजांची कृपा या महिन्यात होईल. तेव्हा काळजीच करण्याचे कारण नाही. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल. कार्यात दुरावा, खुप श्रम घेणे व जुने आजार पुढे येण्याची शक्यता मंगळ करत आहे. वेळीच बंधनात राहाणे योग्य होईल. महिला वर्गाला यश, किर्ती मिळवून उत्साह वाढेल.
     
  वृश्चिक : भरभराट होईल.
या महिन्यात आपल्या उत्कर्षाचा व प्रगतीचा रथ पुढे वेगाने जाणार आहे. आपला उत्कर्ष प्रगती व आपली किर्ती कोणीही अडवू शकणार नाही. आपणावर शनिमहाराजांची कृपा झाली असून शनि हा अर्थ व किर्तीदाता आहे. मंगळामुळे येणारे द्रौर्बल्य झटकून टाकणे योग्य. शासकीय क्षेत्रातील व्यक्तींना उच्च पद व योग्य ठिकाणी बदली ग्रहराज रवि करणारा आहे. उद्योगपती, व्यापारी व कारखानदार यांना अपेक्षित अर्थप्राप्ती होऊन व्यवसायात वाढ होणार आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना किर्ती, प्रसिध्दी व उच्च दर्जा प्राप्त होईल. चैनिच्या वस्तू खरेदी होतील. शुक्र आपणाला वैभव प्राप्त करून देणारा आहे. अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणे योग्य होईल. शत्रु मित्र बनतील. प्रतिष्ठा वाढेल. शेतकरी व मेंढपाळ यांना अपेक्षित अर्थ प्राप्ती होईल. मात्र जनावरांपासून सावध राहावे. घरातील वाद वाढविणे योग्य होणार नाही. महिलांना सुखाचे दिवस येतील.
     
  धनु : गुरुकृपा होईल.
आपला राशी स्वामी गुरु आहे. गुरुभक्ताचे हितच करतो. राहू केतू जरी आपल्या कार्यात अडथळे आणणारे व तब्येतीला त्रास देणारे असले तरी गुरु आपणाला उत्तम सहकार्य करणार आहे. तेव्हा आपल्याला काळीजीचे कारण नाही. शनि मात्र आपणाला अनाठायी खर्च करण्यास भाग पाडेल. तर शुक्र महाराज आपणाला धनलाभ करून देणारे आहेत. उष्णतेचे विकार मंगळ देण्याची शक्यता आहे. तरी वेळीच काळजी घ्यावी.बंधनात राहणे योग्य होईल. वाहन जपून चालवावे राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना अपेक्षा पूर्ण करणारा हा महिना आहे. कवी लेखक व कलाकार यांना उत्तम संधी प्राप्त होऊन प्रसिध्दी लाभेल. विवाह इच्छूंचे विवाह जुळून येतील. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. हा महिना मनोकामना पूर्ण करणारा आहे.
     
  मकर : यश लाभेल.
गुरुसारखा किर्तीदाता व अर्थदाता ग्रह आपणावर कृपा करणार असून या महिन्यात आपणाला अनेक कामात यश व किर्ती मिळवून आपले व्यक्तिमत्व उजळणार आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा महिना म्हणजे भाग्योदयाची पर्वनीच आहे. आपले वक्तृत्व, दातृत्व, नेतृत्व प्रभावी होईल अनेक तऱ्हेची सुख पदरी पडतील. मात्र मंगळ महाराज घरात कलह करण्याची शक्यता आहे. तसेच तब्येतीची काळजी घ्यावी. शनिमहाराज अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवणेस सांगत आहे. भागीदारीत पैसे गुंतविणे योग्य होणार नाही. आपणाला अचानक धनलाभ केतू करून देणार आहे. व्यापारी उद्योगपती यांच्या व्यवसायात वृध्दी येऊन अपेक्षित अर्थ प्राप्ती होईल. सरकारी क्षेत्रातील व्यक्तिंना वरिष्ठ अधिकारी खुष होऊन अपेक्षित ठिकाणी बदली संभवते. कवी लेखक व कलाकार यांना प्रसिध्दी व पैसे मिळतील. विद्यार्थी व खेळाडू यांना यश लाभेल. विवाह इच्छूंचे विवाह जुळून येतील.
     
  कुंभ : धनलाभ होईल.
या महिन्यात राहू महाराजांची आपणावर कृपा होणार असून यश कीर्ती व अचानक धनलाभ आपणाला होणार आहे. घरात उत्तम व सुखकारक घटना घडतील. मंगळ आपणाला विजय प्राप्त करून देणारा आहे. जुनाट आजार बरे होतील. शत्रु मित्र बनतील अनेक प्रकारचे लाभ होऊन आपल्या तीव्र बुध्दीमत्तेची चुणुक समाजातील प्रतिष्ठीत व वयस्कर व्यक्तींनकडून त्याची प्रशंसा केली जाईल. व्यापारी वर्गाला अपेक्षित अर्थप्राप्ती होईल. गर्भवतींना पुत्र प्राप्ती होईल. घरात आनंदी व प्रसंगावधान राहून वैर स्विकारु नये हेच योग्य. जमिन जुमला व कोर्टकचेरीचे निकाल आपल्या बाजूनेच लागतील.कवि, लेखक कलाकार यांना प्रसिध्दी कीर्ती पैसा मिळेल. खेळाडू व विद्यार्थि यांना मेहनत करणे योग्य होईल . हा महिना सुख, कीर्ती व समृध्दी देणारा जाईल.
     
  मीन : अभय लाभेल.
या महिन्यात ग्रहराज रवि व कलागुणांचा विकास करणारा शुक्र आपणाला अपेक्षित अर्थप्राप्ती व अनेक बाबतीत अभय देणारे आहेत. बुध्दीकारक बुध कर्तुत्व व बुध्दीमत्ता यांची चुणुक दाखविणारे आहेत. समाजातील प्रतिष्ठीत व बुध्दीवंताकडून आपला गौरव होईल मात्र राहू, केतू व मंगळ मानसिक दुर्बलता व अनाठाई खर्चावर नियंत्रण ठेवणेस सांगत आहेत. अशावेळी थोरामोठयांचा सल्ला उपयुक्त ठरेल. अचानक प्रवास योग संभवतो. व्यापारी वर्गाने विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करणे योग्य होईल. घरातील वादविवाद डोकं वर काढणेची शक्यता आहे तरी परखड मत मांडणे टाळावे. महिलांनी तब्बेतीची काळजी घ्यावी, त्यांना आर्थिक लाभ अपेक्षित होतील. विवाह इच्छुंचे विवाह जुळून येतील.