![]() |
![]() |
|||
| दिनांक: | ||||
| डॉ. वि. म. शिंदे यांचे 'स्वातंत्र्यवीर स्मरण पर्व' - स्मिता राजवाडे. | |||
|
|||
| > मुख्यपान | |||
|
|||
| दिनांक: 16-04-2010 | |||
| इ. सन 1922 दत्तजयंतीला जन्मलेले डॉ. विनायक म. शिंदे 88 वर्षातही नियमित आहार-विहार, शिस्तबध्द जीवनक्रम, सामाजिक सहभाग, प्रसन्न मन यामुळे समाजप्रिय म्हणून प्रतिष्ठाप्राप्त गृहस्थ ! त्यांच्या 'आठवणीतली रत्नागिरी म्हणजे 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ' यानुसार 'सावरकरमय बाल्यकाळ, सावरकर प्रभावित तारुण्य, सहभोजनात सहभाग, निष्ठावंत कार्यकर्ता' म्हणावं लागेल. कारण डॉ. वि. म. चे वडील कै. डॉ. म. ग. शिंदे हे स्वातंत्र्यवीरांचे निस्सीम चाहते, निष्ठावंत अनुयायी. साहजिकच डॉ. वि. म. ना लहानपणापासून तात्याराव सावरकरांना जवळून बघणं, ऐकणं, अंगणात चर्चा याचा भाग्ययोग आलेला होता. त्यांच्या आठवणीतली रत्नागिरी ही इमारती, रस्ते, म्युन्सिपालटीचा स्वच्छ कारभार, भजनीमंडळाची सुरेल भजनं, व्याख्यानं, कथा, कीर्तन, काकडारत्या अशा निर्मळ पवित्र वातावरणातली. सर्वांशी कौटुंबिक स्नेह जपता येण्याइतकी परस्पर आत्मीयता. त्यांच्या स्वातंत्र्यवीरांच्या आठवणी समुद्रात लाटांवर लाटा याव्यात, मोजता येऊ नयेत, पण मन सागरातही आनंदलाटा उसळाव्यात अशा अगणित. ! | |||
![]() |
'तात्याराव' हे रत्नागिरीतील सावरकर प्रेमींचे खाजगीतल संबोधन ! स्थानबध्दतेच्या काळात राजकीय सहभाग अशक्य ! पण सामाजिक सुधारणांचा सखोल विचार, कृतीची जोड, तळमळ यामुळे सावरकरांना सर्व स्वरातले, जातीतले अनुयायी मिळाले. वासुदेव हर्डीकर, कृष्णा शिंदे, पलूकाका जोशी, भागोजी शेठ कीर, अच्युत जोशी, अच्युत मलुष्टे, गजानन दामले, मो. वि. दामले, विष्णुपंत दामले, नानल वकील, अप्पासाहेब पटवर्धन, आयरे, कै. परुळेकर, डॉ. बा. ना. सावंत, मनोहर चव्हाण इत्यादी निष्ठावंत अनुयायी लाभले. डॉ. म. ग. शिंदे संपूर्ण कुटुंबच 'सावरकरमय' झालेलं. | ||
|
|||
|
|||
| Go To Top Of Page | |||