![]() |
![]() |
|||
| दिनांक: | ||||
| मानवी हक्कांची जाणीव ठेवून कार्यरत असलेली संस्था, स्वयंसेतू रत्नागिरी. | |||
|
|||
| > मुख्यपान | |||
|
|||
| दिनांक: 16-04-2010 | |||
| स्वयंसेतूचे 2009-2010 हे दशकपूर्ती वर्ष आहे. आपल्या समाजातील पिडीत, दुर्बल, घटकांचे शोषण आपल्याला पदोपदी जाणवत असते. त्यांच्या समस्यांचे निराकरण करून सर्वांगीण विकासाला एक डोळस दिशा देण्याच्या हेतूने रत्नागिरी जिल्हा स्तरावर काही समविचारी व्यक्ती 2000 सालापासून सामाजिक कार्य करीत आहेत. 'मानवी हक्क दिनाचे' औचित्य साधून 10 डिसेंबर 2003 रोजी या कार्याचे 'स्वयंसेतू' असे नामकरण करून संस्था स्थापन करण्यात आली. | |||
| पिडीत, दुर्बल लोकांचे ओढग्रास्त जीवन, कमालीच दारिद्रय, स्वच्छतेचा-आरोग्याचा अभाव, कुपोषण, अज्ञान, कमालीची अंधश्रध्दा, बेकारी, अपुरा व अनियमित रोजगार, कुटुंबनियोजनाचा अभाव, व्यसनाधीनता, बालमजुरांचे वाढते प्रमाण, अल्पवयीन मुलं व महिलांवर होणारे अत्याचार इत्यादी अनेक समस्या त्यांच्या समोर आ वासून उभ्या आहेत. या लोकांना वर्षानुवर्षे कोणत्याही प्रकारच्या न्यायासाठी झगडावं लागतंच. परंतु त्यांच्या हयातीत हा न्याय मिळणं मुश्कील बनलंय. शासनाच्या सर्वसामान्यांकरता असलेल्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. कित्येकांना तर त्यांच्या मूलभूत गरजाही मिळणं दुरापास्त होऊन जात. कालबाह्य रूढी-परंपरांऐवजी काळानुरूप नवीन विचारप्रवाह त्यांच्यापर्यंत पोहचवणं गरजेचं आहे. | ![]() |
||
|
|||
|
|||
| Go To Top Of Page | |||