दिनांक:
> मुख्यपान
 
विनायकांची देवळेरावळे
स्मिता राजवाडे, रत्नागिरी,
फोन-(02352) 222070
> मुख्यपान
  पान 1 पान 2
दिनांक: 26-02-2010
स्वातंत्र्यवीर सावरकर स्थानबध्दतेत रत्नागिरीत होते. या महत्वपूर्ण घटनेचा रत्नागिरीकरांवर फार मोठा प्रभाव पडला होता. अर्थातच त्यांच्या अद्वितीय देशकार्याने, अमोघ वक्तृत्वाने, सामाजिक कार्यामुळे रत्नागिरीतले काही तरुण, प्रौढ अक्षरश: भारून गेले होते. स्वातंत्र्यवीरांचा प्रत्यक्ष सहवास ज्यांना लाभला त्या भाग्यवंत व्यक्ती म्हणजे डॉ. म. ग. शिंदे, कै. मो. वि. दामले, सुधाकरशेठ मलुष्टे, आबा परूळेकर, श्री. अच्युतराव जोशी, श्री. पाटकर, कै. मनोहर चव्हाण, फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक कै. मो. वि. दामले सर. आकाशवाणी रत्नागिरीच्या अधिकाऱ्यांनी श्री. रियाझ शेख यांनी मला स्वातंत्र्यवीरांचा सहवास लाभलेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेण्याची संधी दिली. मी आनंदाने होकार दिला. कारण माझे वडिल कै. विनायकराव भावे हे स्वातंत्र्यवीरांचे भक्तच होते. त्यांच्या तोडून स्वातंत्र्यवीरांच्या रोमांचकारी कथा ऐकतच मी मोठी झाले.
झरी विनायकाला पायी जाणं, तिथला रम्य परिसर सुरूबन पाहणं, समुद्रदर्शन मला खूप आवडतं पण तिथला समुद्र पाहून मला साहित्यातल्या विनायकांच्या काव्यपंक्ती आठवायच्या- ''ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला,'
मग बाबाचं सावरकराख्यान ऐकायचं 'वक्ता दशसहस्त्रेषु लांबूनही आवाजाच्या आरोह- अवरोहावरून भाषणाचा अंदाज यायचा. त्या काळात रत्नागिरीयांच्या बुध्दीला भरपूर पौष्टिक खुराक आणि श्रवणेंद्रीयांना मेजवानीच मिळायची. अनेक विद्यार्थी, तरूण स्वातंत्र्यवीरांची पुस्तकं चोरून वाचत. माझे बाबाही त्या 'सावरकर विचार तडिता-भारीत' विद्यार्थ्यांपैकी एक होते. 'सहभोजने' ही त्या काळात जातीयतेवरच्या महामंत्राची प्रत्यक्ष कृती होती.
पतितपावन मंदिर बांधण्याची प्रेरणा कै. भागोजीशेठ कीर यांना तात्यारावानीच दिली. मग ते मंदिर स्वातंत्र्यवीरांच्या विविध उपक्रमांचं केंद्रबिंदू ठरलं. तिथेच गणेशोत्सवासाठी शिवजयंती उत्सवासाठी 'मेळे' होत. नाटकं होत. तात्यारावांचा हा पोवाडा प्रेरक होता- 'धन्य शिवाजी तो रणगाजी
धन्यचि तानाजी,
प्रेमे आजि सिंहगडाचा
पोवाडा गाजी ऽऽ
योगायोगाने मला सावरकर भक्तांची मांदियाळी भेटत गेली. त्यांच्या आठवणी सांगणारी प्रत्येक व्यक्ती भरावून भूतकाळात शिरायची तेव्हा आठ-नऊ वर्षांचे असणारे कै. मनोहर चव्हाण भेटले. त्यांच्याकडून पतितपावन मंदिरातच तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू ध्वनीमुद्रण ऐकताना मन भरून आले. शेरे नाक्यावरील पटवर्धनांच्या घरात रहात असताना तात्याराव आणि सौ. माई स्वदेशी वस्तूंचा प्रचार करीत. शाळकरी मुलींना स्वदेशी बांगडया घालण्यासाठी (पालकांच्या परवानगीने) आग्रह करीत. परदेशी माल वापरला तर पैसा तिकडे जातो, आपल्या देशातला माल थोडा कमी आकर्षक असेल पण पैसा इथेच राहतो हे सोप्या भाषेत पटवून देत. जातीयतेची बेडी तोडण्यासाठी तात्यारावांनी स्पृश्य-अस्पृश्य महिलांसाठी हळदीकुंकू करवलं, (लूट-अख्खा ऊस) भंगीबुवाचं कीर्तन करवलं. सार्वजनिक सत्यनारायण पूजा केल्या. स्वतः नास्तिक असणारे तात्याराव 'देश' हाच 'देव' मानत. त्याकाळी सोवळं ओवळं मानणारा वर्ग त्यांना विरोध करत असे पण ब्रिटीशांशी लढा देणारे सावरकर लहानमोठया व्यत्ययांना थोडेच घाबरणार?
'जे जे उत्तम उदात्त उन्नत
महन्मधुर तेते,
स्वतंत्रते भगवती सर्व तव
सहकारी होते
  पान 1 पान 2
Go To Top Of Page