![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
| वैशाली पाटील तडीपार नोटीस प्रकरणी 3 फेब्रुवारी रोजी सुनावणी |
|---|
| दिनांक: 31-01-2012 |
![]() ![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : जैतापूर अणुऊर्जा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक नेत्या वैशाली पाटील यांना डीवायएसपी तुषार पाटील यांनी जिल्हा बंदी नोटीस बजावली आहे. या संदर्भात 3 फेब्रुवारी रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी होणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार वैशाली पाटील यांनाही दोन वर्षांच्या तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसबद्दल यापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली आहे. आता पुढील सुनावणी प्रांतांसमोर होणार आहे. |
| Web Site Developed & Maintained by Softlogic, Ratnagiri |
| SoftLogic : 02352221314, +919422429631 |
![]() |