![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| कोकण कृषी विद्यापीठाकडून सुपारी वाळवणी यंत्र विकसित | |
| दिनांक: 29-07-2010 | |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कोकणात निर्माण होणाऱ्या ओल्या सुपाऱ्या पारंपारिक पध्दतीने वाळवल्या जात असून त्या वाळवण्यासाठी अनेक दिवसांचा कालावधी लागतो. यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने सुपारी वाळवणी यंत्र विकसित केले आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या संशोधन विकास समितीच्या बैठकीत या यंत्राची शिफारस करण्यात आली आहे. या यंत्राची वाळवण क्षमता 15 ते 20 कि. मी. असून त्यामध्ये सुपारी वाळविण्यासाठी दिवसाला 6 तासाप्रमाणे 4 ते 5 दिवस लागतात. या यंत्रात ज्वलनासाठी भुसा वापरला जातो. त्यामुळे विजेची गरज भासत नाही. या यंत्राच्या निर्मितीचे संतोष दिवेकर हे प्रमुख संशोधक आहेत. त्यासाठी त्यांना विद्यापीठातील इतर संशोधकांचीही मदत झाली आहे. | ![]() |