![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| कोयनेचे अवजल सिंचनासाठी वापरणार |
| दिनांक: 29-07-2010 |
![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असताना सिंचनाची टक्केवारी खूपच कमी आहे. कोकणातील सिंचन प्रकल्प निधीअभावी बंद पडू दिला जाणार नाही अशी घोषणा अर्थमंत्री सुनिल तटकरे यांनी नुकतीच विधानपरिषदेत केली. तिलारी प्रकल्पाचे काम 2012 पर्यंत पूर्ण केले जाईल. त्यासाठी आवश्यकता भासल्यास राज्यशासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. कोयना जल विद्युत प्रकल्पातून 37 टीएमसी पाणी समुद्राला मिळते ते पाणी अडवून कोकणातील सिंचनासाठी वापर करण्याची योजना आखण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. |