![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| नुकसान भरपाईपासून कोणताही आपदग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी : ना. राणे | |
| दिनांक: 29-07-2010 | |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती व घरे यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांना योग्य ती भरपाई मिळावी यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. कोणीही आपदग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी सूचना राज्याचे महसूलमंत्री ना. नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राणे हे रत्नागिरीत आले होते त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांना सूचना दिल्या. अतिवृष्टीत या नागरिकांच्या घराचे नुकसान झाले आहे. त्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी. तसेच 50 टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही तात्काळ मदत करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. |
![]() |