![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| मुंबई-सावंतवाडी रेल्वे ऑगस्टमध्ये सुरू होणार |
| दिनांक: 29-07-2010 |
![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेविरोधात काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने मुंबई-सावंतवाडी ही रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. ही नवीन रेल्वे 27 किंवा 28 ऑगस्टला सुरू होईल असा विश्वास महसूलमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे. नुकताच त्यांनी रत्नागिरी दौरा केला त्यावेळी निवसर परिसराला त्यांनी भेट देवून तेथील भागाची पाहणी केली व स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. निवसर येथे पुल उभारण्याच्या दृष्टीनेही लवकरच विचार केला जाईल असेही त्यांनी सांगितले. |