![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| रत्नागिरी जिल्ह्यात अतीवृष्टीची शक्यता, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन |
| दिनांक: 29-07-2010 |
![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : काही दिवस कोकणात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कोकणातील जनजीवन ठप्प झाले होते. रत्नागिरी जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. आता येत्या 48 तासात हवामान खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्याप्रमाणे काही ठिकाणी 7 सें.मी. पेक्षा अधिक तर काही ठिकाणी 12 सें. मी. पर्यंत पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे समुद्रकिनारी व नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी तसेच अन्य भागातील नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असा इशारा रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. |