![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| अपंग व्यक्तींना सहकार्य म्हणजे ईश्वरी काम- अण्णा शिरगांवकर | |
| दिनांक: 28-07-2010 | |
| गुहागर, (प्रतिनिधी) : अपंग व्यक्तींना सहकार्य करणे म्हणजे ईश्वरी काम असून त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन दलितमित्र अण्णा शिरगांवकर यांनी केले आहे. गुहागर तालुका अपंग पुरर्वसन संस्था व लायन्स क्लब इंटरनॅशनल यांच्या मदतीमधून कै. शेठ छगनकृष्णादास सुरा अपंग पुरर्वसन संकुलाचे नामकरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना माजी आमदार व दै. सागरचे संपादक निशिकांत जोशी यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करून 1 कोटी रुपये खर्चाच्या या संकुलाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी लायन्स क्लबचे सदस्य व संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. |
![]() |