![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| साफयीस्टविरोधातील उपोषण सुरूच, उपोषणकर्ते अत्यवस्थ |
| दिनांक: 28-07-2010 |
![]() |
| चिपळूण, (प्रतिनिधी) : गाणेखडपोली औद्योगिक वसाहतीतील साफयीस्ट कंपनीमधून सोडण्यात येणाऱ्या दुषित पाण्यामुळे गाणे गावच्या शेतजमिनीवर त्याचा विपरित परिणाम झाला असल्याने त्याविरोधात कंपनीवर कारवाई करावी या मागणीसाठी गाणे ग्रामस्थांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. कंपनीतून होणाऱ्या जल व वायु प्रदूषणामुळे गाणे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुषित पाण्यामुळे गावातील शेतीही नुकसानीत आली आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून लक्ष दिले जात नसल्याने त्याविरोधात गाणे ग्रामस्थांनी आता उपोषणाचा मार्ग स्विकारला आहे. जोपर्यंत प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी घेतला आहे. उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांपैकी पाजणांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यांच्यावर कामथे रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. |