![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी देण्यात आलेली 8 लाखाची बोट सडलेल्या अवस्थेत |
| दिनांक: 28-07-2010 |
| चिपळूण, (प्रतिनिधी) : चिपळूण परिसरात वारंवार येणाऱ्या पुरसदृश्य परिस्थितीमुळे आपत्कालीन काळात स्थानिक जनतेला मदत मिळावी या हेतूने शासनाकडून देण्यात आलेली 8 लाख रुपयांची बोट अक्षरशः सडलेल्या अवस्थेत पडली आहे. त्यामुळे आता पुर परिस्थितीत या बोटीचा काहीही उपयोग होणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. 2005 मध्ये झालेल्या महापुराच्या काळात लोकांना सुखरूप बाहेर काढता यावे यासाठी शासनाने 8 लाख रुपये किंमतीची बोट दिली होती. त्यानंतर ही बोट इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राबाहेर उभी करून ठेवण्यात आली होती. या बोटीवर पाच ते सहा लाख रुपये किंमतीचे इंजिनही बसविण्यात आले आहे. परंतु त्यानंतर या बोटीकडे कोणतेही लक्ष दिले नसल्याने ही बोट आता सडत चालली असून त्यावर असलेले लाखो रुपये किंमतीचे इंजिनही चोरीला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाची मदत मिळूनही सरकारी कारभारामुळे चांगल्या बोटीची अशी अवस्था झाल्याने नागरिकांच्यात संताप व्यक्त केला जात आहे. |