![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| बळीराजा बचत गट फेडरेशनची स्थापना | |
| दिनांक: 28-07-2010 | |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कुटुंब सक्षम होण्यासाठी महिलांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन जि.प. सदस्य व बळीराजा उद्योग समुहाचे प्रमुख शरदशेठ बोरकर यांनी केले. खंडाळा वरवडे पंचक्रोशीतील सुमारे 100 गटांचे फेडरेशन करण्यात आले असून जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयत्न आहे. उद्योगपती सुनिल राणे यांच्या सहकार्यातून 100 बचत गटांना प्रत्येकी 5 हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. महिला आर्थिकदृष्टया सक्षम व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे बोरकर यांनी सांगितले. पंचक्रोशीतील तयार केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी खंडाळा येथे इमारत उभी करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी या पंचक्रोशीतील बचत गटाच्या 2 हजार महिला उपस्थित होत्या. | ![]() |