![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| कोकणात यापुढे रासायनिक प्रकल्प नाहीत, अर्थमंत्री तटकरे यांची विधानपरिषदेत घोषणा | |
| दिनांक: 28-07-2010 | |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कोकणात यापुढे रासायनिक प्रकल्प येवू दिला जाणार नाही तसेच कारखाने उभारणीसाठी शेतजमीन संपादित केली जाणार नाही. उद्योगांसाठी संपादित केलेल्या जागांसाठी बाजारभावाने भरपाई दिली जाईल असे आश्वासन ना. सुनिल तटकरे यांनी विधानपरिषदेत बोलताना केले. अलिबाग येथे प्रस्तावित असलेल्या टाटा कंपनीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पाला लागणाऱ्या जमिनीसाठी भूसंपादन करताना प्रत्येक एकराला 20 लाख रुपये दर दिला जाणार असून प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सामावून घेतले जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. | ![]() |