![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| दापोली पाठोपाठ खेडमध्ये चोरटयांचा धुमाकूळ, लाखो रुपयांचा ऐवज लंपास | |
| दिनांक: 28-07-2010 | |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घालून दापोली येथे लाखो रुपयांचा ऐवज लांबवला असतानाच आता खेड परिसराकडे चोरटयांनी लक्ष वळविले आहे. खेड शहरातील महाडनाका येथील चार फ्लॅट फोडून रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज चोरटयांनी लांबविला आहे. महाडनाका येथील यास्मिन परकार यांचा बंद फ्लॅट फोडून त्यामधून सोन्याचे दागिने, घडयाळे तर शबाना दांडेकर यांचा फ्लॅट फोडून सोने, चांदी व रोख रक्कम व परदेशी बनावटीची घडयाळे तसेच दिलनवाझ काझी यांच्या घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला. फोडलेल्या फ्लॅटमधील कुटुंबिय काही कामानिमित्त बाहेर गेल्याने त्यांचे फ्लॅट बंद होते. त्याचा फायदा चोरटयांनी घेतला. |
![]() |