दिनांक:
 
कोकण रेल्वे मार्ग तीन दिवसात सुरू होणार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागदत्त
दिनांक: 28-07-2010
रत्नागिरी, (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी ते आडवली या भागात काही ठिकाणी मोठया प्रमाणावर दरडी कोसळल्या असून या ठिकाणी कोसळलेली माती बाजूला काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू असून तरी देखील हे काम पूर्ण होण्यास किमान दोन ते तीन दिवस लागतील. यानंतर विशेष चाचणी घेतल्यानंतर हा रेल्वेमार्ग पुर्ववत सुरू करण्यात येईल अशी माहिती कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक नागदत्त यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
निवसरचा प्रश्न दरवर्षी कोकण रेल्वेला अडचणीचा ठरत असल्याने त्या क्षेत्राकडे कोकण रेल्वेचे विशेष लक्ष आहे. याबाबत काही भूगर्भ शास्त्रज्ञांचाही सल्ला घेण्यात आला होता. यासाठी कोकण रेल्वेने एक खास समिती नेमली असून त्यांनीही काही उपाययोजना सुचविल्या असून त्यावर आणखी अभ्यास सुरू असून त्यामध्ये 38 कोटी रुपये खर्च करून पुल बांधण्याचा प्रस्ताव आहे. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. कोकण रेल्वेच्या मार्गापैकी मुंबई ते रत्नागिरी व आडवली ते मडगांव-बेंगलोर हा मार्ग व्यवस्थित असून केवळ रत्नागिरी ते आडवली मार्गावर ही रेल्वेसेवा बंद आहे. त्यामुळे काही गाडया रद्द करण्यात आलेल्या आहेत तर काही गाडया अन्य मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत.
दरम्याने कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल यांनी रविवारी निवसर, असोड आदी ठिकाणाची पाहणी केली. मात्र तायल यांच्या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.
 
 
 
 
दिनांक: 28-07-2010
> झिमण गटाचा बहिष्कार, जिल्हाध्यक्षपदी रमेश कीर यांची पुन्हा निवड, निर्णय पक्षश्रेष्ठी जाहीर करणार
> ना. नारायण राणे नुकसानीच्या पाहणीसाठी रत्नागिरी
> दरवर्षी भेडसावणाऱ्या निवसर प्रश्नात खा. डॉ. निलेश राणे यांनी लक्ष घातले
> कोकण रेल्वे मार्ग तीन दिवसात सुरू होणार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागदत्त
> दापोली पाठोपाठ खेडमध्ये चोरटयांचा धुमाकूळ, लाखो रुपयांचा ऐवज लंपास
> कोकणात यापुढे रासायनिक प्रकल्प नाहीत, अर्थमंत्री तटकरे यांची विधानपरिषदेत घोषणा
> बळीराजा बचत गट फेडरेशनची स्थापना
> आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी देण्यात आलेली 8 लाखाची बोट सडलेल्या अवस्थेत
> साफयीस्टविरोधातील उपोषण सुरूच, उपोषणकर्ते अत्यवस्थ
> अपंग व्यक्तींना सहकार्य म्हणजे ईश्वरी काम- अण्णा शिरगांवकर
> देवरूख ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी आघाडीला फटका, जनता दलाचे सार्दळ नवे सरपंच
दिनांक: 27-07-2010
> कोकण रेल्वेसमोर नवे संकट, चिंद्रवलीजवळील डोंगराला मोठया भेगा, बोगद्याला धोका
> वादात सापडलेली जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक रद्द, उद्या नवी निवडणूक
> गुहागरजवळील समुद्रकिनाऱ्यावर परदेशी जाणारे बार्ज भरकटले
> दापोलीत चोरटयांचा धुमाकूळ, दुकान व फ्लॅट फोडून सव्वालाखाची लूट
> जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासाच्या घोषणा करणाऱ्या शासनाकडून रसाळगडासाठी रस्ताच नाही
> पोस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य
> कुलगुरू डॉ. विजय मेहता यांच्याकडे राहुरी विद्यापीठाचेही कुलगुरूपद
> जगबुडीवरील ब्रिटीश काळातील पुलाचा काही भाग वाहतुकीला धोकादायक
> मालगुंडमधील खारभूमी बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
> आमदारांच्या गावांसह अन्य आठ गावात सुरू होणार घरपोच धान्यवाटप योजना
> कोकण रेल्वे मार्गाची भूगर्भतज्ञांकडून पाहणी आवश्यक
> दै. रत्नभूमि संचलित पत्रकारीता पदविका परिक्षेत सौ. मंजिरी गोखले प्रथम,डॉ. कामशेट्टी द्वितीय तर नरेश पांचाळ तृतीय
दिनांक: 26-07-2010
> नैसर्गिक आपत्तीमुळे कोकण रेल्वे थंडावली, रत्नागिरीच्या पुढे वाहतूक बंद
> जिल्हयातील पुर ओसरला, काही भागात पावसाची विश्रांती
> माजी आमदार विनय नातू यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश
> शासकीय पैशाची उधळपट्टी, काढलेला गाळ परत नदीपात्रात
> लाखो भक्तांच्या उपस्थितीत नाणीज क्षेत्री गुरूपौर्णिमेचा सोहळा
> लायन्स क्लबसारख्या संस्थांनी भ्रष्टाचार रोखण्याचे कार्य करावे : निशिकांत जोशी
> उलटलेल्या कंटेनरमुळे दरेवाडीनजिकच्या बारा घरांना धोका
> आरेवारेनजिक पिकनिक पॉईंटजवळची दरड कोसळली, काही काळ वाहतूक ठप्प
> महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य, वाहनचालकांत नाराजी
दिनांक: 25-07-2010
> रत्नागिरी जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती कायम, निवसरचा रेल्वे ट्रॅक पुन्हा खचला, केरळला जाणारी मधुसागर एक्स्प्रेस मध्येच अडकली
> कोयना धरणाची पातळी दहा फुटांनी वाढली
> रत्नागिरीतील काही भागात पाणी नाही
> किशोर देसाईना मातृशोक
> पुरामुळे 15 गावातील वीज पुरवठा खंडीत
> मुंबईतून चोरून विकलेल्या 13 दुचाकी खेडमध्ये हस्तगत
> प्रवाशांच्या मदतीला धावली एस.टी.
> शाळांना घरगुतीच वीज मीटर असावेत, संगमेश्वर पं. स. सभेत ठराव
> केंद्रीय स्वास्थ्य विमा योजनेचा जिल्ह्यात बोजवारा
दिनांक: 24-07-2010
> कोकण रेल्वे सेवा कोलमडली, निवसर स्थानकाचा प्लॅटफॉर्म व रेल्वे रूळ दहा फुटांनी खचले, युध्दपातळीवर दुरूस्तीचे काम सुरू, ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
> पावसाचा जोर कायम, रत्नागिरी तालुक्याला पावसाने झोडपले, अनेक कुटुंबांचे स्थलांतर
> बिबटयाचा महिलेवर हल्ला, महिला जखमी
> श्री क्षेत्र नाणीजला गुरूपौर्णिमा सोहळयाची जय्यत तयारी, रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा
> गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर विनय नातू स्वगृही परतणार?
> डॉ. माधव नगरकर यांचे नगरवाचनालय सभागृहात व्याख्यान
> जिल्हाध्यक्ष निवडीप्रकरणी कीर व झिमण गटाचे वेगवेगळे दावे
> जि. प. उपाध्यक्ष उदय बने यांचा वाढदिवस आगळया उपक्रमाने साजरा
> मिऱ्या बंधाराप्रकरणी ग्रामस्थ 15 ऑगस्ट उपोषणाला बसणार
> महावितरणची हेल्पलाईन
> गोगटे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी केले लोकमान्य टिळकांना अभिवादन
> विकासकामांसाठी आक्रमक रहावे, भाजपा प्रदेश चिटणीस बाळ माने