![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| ना. नारायण राणे नुकसानीच्या पाहणीसाठी रत्नागिरी | |
| दिनांक: 28-07-2010 | |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : गेले काही दिवस कोकणात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. याशिवाय अनेक ठिकाणी रस्ते व इमारतींचे नुकसान झाले होते. याशिवाय कोकण रेल्वेला या अतिवृष्टीचा फटका बसल्याने निवसरसह अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राणे यांनी आज रत्नागिरीत येवून जिल्हाधिकारी कार्यालयात अतिवृष्टी व महापूर यामुळे झालेल्या जीवित व वित्तहानीची आढावा घेणारी बैठक घेतली. त्यानंतर राणे यांनी निवसर येथे कोकण रेल्वेच्या मार्गाचे नुकसानीची पाहणी केली. |
![]() |