![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| दै. रत्नभूमि संचलित पत्रकारीता पदविका परिक्षेत सौ. मंजिरी गोखले प्रथम,डॉ. कामशेट्टी द्वितीय तर नरेश पांचाळ तृतीय |
| दिनांक: 27-07-2010 |
![]() |
| रत्नागिरी दि. 26 :- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकतर्फे दैनिक रत्नभूमि रत्नागिरी अभ्यास केंद्राचा वृत्तपत्र पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम बॅच 2010 चा निकाल 98 टक्के लागला आहे. या परिक्षेत सौ. मंजिरी अनंत गोखले या 73 टक्के गुण मिळवून प्रथम आल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकाने डॉ. श्री शैलप्पा कामशेट्टी 72.5 टक्के तर तिसऱ्या क्रमांकाने श्री. नरेश पांचाळ 71.25 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. केंद्राचे हे प्रथम वर्ष आहे. त्यात एकूण 54 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. पैकी 39 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. 3 विद्यार्थी दुसऱ्या श्रेणीने उत्तीर्ण झाले असून उर्वरित 30 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये गौरी ठाकूर, संतोष पिलके, जावेद मुजावर, दिनेश भडाळे, शैलेंद्र केळकर,प्रसाद रानडे,जावेद शेख, अनिलकुमार वेतोस्कर, कमलेश कडू, राजेंद्र शिंदे,सागर पाटील, मिलींद माने, प्रसाद भिडे,प्रतिक्षा सावंत-देसाई,महेंद्र बांद्रे, प्रसाद मोदी, अमृता धुंदूर, योगेश मोडसिंग, अशोक जोशी, सिध्दार्थ कदम,प्रबोध चव्हाण, सौ.अंजली पाटणकर, विकास सलगर, सौ. दिपा सावंत, मिरा शेलार, सुशिल शिवलकर, अनघा सोहोनी, सौ. शिवानी वैष्णव, रंजिता वझे व प्रशांत सुर्वे यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे कोल्हापुर विभागीय संचालक प्राचार्य के. एस.मोहिते, गोवा विभागीय संचालक दादासाहेब मोरे, दैनिक सागरचे संपादक नानासाहेब जोशी, केंद्रप्रमुख धनंजय पालांडे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश शासनमान्य जिल्हा वृत्तपत्र संपादक संघाच्या कोकण विभाग प्रमुख सौ. धनश्री पालांडे यांनी अभिनंदन केले आहे. |