![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| कोकण रेल्वे मार्गाची भूगर्भतज्ञांकडून पाहणी आवश्यक |
| दिनांक: 27-07-2010 |
![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : कोकणाच्या डोंगर कपारीतून सुरू झालेल्या कोकण रेल्वेमुळे कोकणवासिय व अन्य राज्यातील जनतेची मोठया प्रमाणावर सोय झाली असली तरी हा मार्ग बराचसा डोंगराळ भागात व दरीखोऱ्यातून जात असल्याने दरवर्षी कोकण रेल्वेला वेगवेगळया आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. त्यातील महत्वाची समस्या म्हणजे दरडी कोसळण्याची समस्या असून त्याची आता भूगर्भ शास्त्रज्ञांकडून पाहणी करून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. या मार्गावर 28 छोटेमोठे बोगदे व अनेक पुल असून आशियातील सर्वात मोठा 7 कि.मी. लांबीचा करबुडे बोगदा याच मार्गावर आहे. |