![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| मालगुंडमधील खारभूमी बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान |
| दिनांक: 27-07-2010 |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील खारभूमी बंधारा फुटल्यामुळे आजुबाजूच्या सुमारे 50 ते 60 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मालगुंड येथील असणारा हा खार बंधारा तुटला असून त्याचे पाणी जवळच्या शेतात शिरले आहे. त्यामुळे शेताचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. पावसाळयाच्या पाण्याबरोबरच समुद्राचे भरतीचे पाणी या बंधाऱ्यात येत असल्याने पाण्याची पातळी सतत वाढत असते. गेल्या दोन तीन वर्षापासून हा बंधारा फुटण्याचे प्रकार वाढले होते. मात्र त्याकडे वेळीच लक्ष दिले गेले नसल्याने यावेळी बंधारा फुटण्याचा प्रकार घडला आहे. मालगुंडचे सरपंच प्रकाश जाधव यांनी आता आपल्या सहकाऱ्यांसह या भागाची पाहणी केली. |