![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| जगबुडीवरील ब्रिटीश काळातील पुलाचा काही भाग वाहतुकीला धोकादायक |
| दिनांक: 27-07-2010 |
![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील खेडनजिक भरणे येथील जगबुडी नदीवर ब्रिटीश काळात बांधण्यात आलेल्या पुलाचे कठडे तुटल्याने या पुलावरून जाणाऱ्या वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. 1931 साली ब्रिटीश काळात भरणे नाका येथे जगबुडी नदीवरील 118.39 मी. लांबीचा हा पुल बांधण्यात आला आहे. 79 वर्षे होवूनही हा पुल अजूनही चांगला आहे. मात्र 2005 साली झालेल्या पुरामुळे अनेक ओंडके व गाळ पुलावर साठल्यामुळे पुल काही प्रमाणात कमकुवत झाला आहे. हा पुल मुंबई-गोवा महामार्गावरील असल्याने या पुलावरून दररोज हजारे मे.टनाची वाहतूक होत आहे. या पुलाचे कठडे तुटले असून त्याची दुरूस्तीही केली जात नसल्याने अनेक ठिकाणी कठडे तुटल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने लक्ष घालणे आवश्यक आहे. |