![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| कुलगुरू डॉ. विजय मेहता यांच्याकडे राहुरी विद्यापीठाचेही कुलगुरूपद |
| दिनांक: 27-07-2010 |
| दापोली, (प्रतिनिधी) : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय मेहता यांच्याकडे राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. डॉ. विजय मेहता गेली चार वर्षे कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी असून त्या काळात त्यांनी सर्वच क्षेत्रात नवे संशोधन व उपक्रम यशस्वी करून विद्यापीठाचे प्रगती केली आहे. आता राहुरी कुलगुरूपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे आल्याने त्यांच्या अनुभवाचा व नेतृत्वाचा फायदा या विद्यापीठाला होणार आहे. |