![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासाच्या घोषणा करणाऱ्या शासनाकडून रसाळगडासाठी रस्ताच नाही |
| दिनांक: 27-07-2010 |
![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटन विकासाबाबत राज्यकर्त्यांकडून अनेक घोषणा होत असल्या तरी खेडजवळील रसाळगड किल्ल्यावर जाण्यासाठी गेली अनेक वर्षे मागणी करूनही डांबरी रस्ताच नसल्याची खंत रसाळगड विकास समितीने व्यक्त केली आहे. शासनकर्ते एकीकडे कोकणातील पर्यटनासाठी पर्यटकांनी आकर्षित व्हावे यासाठी घोषणा करीत आहेत. खेड तालुक्यातील पर्यटक व गिर्यारोहकांना आकर्षित करणाऱ्या रसाळगडाच्या अनेक वाडया अजूनही विकासापासून वंचित आहेत. गडाकडे जाणारा एक कि. मी. रस्ता अजूनही डांबरीकरण झालेला नाही. याबाबत शासनाकडे व वनखात्याकडे वेळोवेळी निवेदन देवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे गेली 25 वर्षे हा डांबरीकरणाचा प्रश्न प्रतिक्षेतच राहिला आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्यात नाराजी व्यक्त होत आहे. |