![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| दापोलीत चोरटयांचा धुमाकूळ, दुकान व फ्लॅट फोडून सव्वालाखाची लूट | |
| दिनांक: 27-07-2010 | |
| दापोली, (प्रतिनिधी) : दापोली परिसरातील श्री सिध्दीविनायक ज्वेलर्स हे दुकान तसेच उदयनगर येथील एक फ्लॅट फोडून अज्ञात चोरटयांनी सुमारे सव्वा लाख रुपयांची लूट केली. या चोरटयांनी आणखीनही दुकाने व फ्लॅॅट फोडण्याचा प्रयत्न केला. अनेक दिवस बंद असलेले चोरीचे सत्र परत एकदा सुरू झाल्याने नागरिकांच्यात धास्ती निर्माण झाली आहे. दापोली शहरातील मच्छिमार्केटनजिक वायंगणकर यांचे श्री सिध्दीविनायक ज्वेलर्स हे दुकान चोरटयांनी फोडले. दुकानातील सुमारे 20 हजारांचा ऐवज व दागिने त्यांनी लांबविले. त्यानंतर चोरटयांनी उदयनगर येथील एक बंद फ्लॅट फोडून त्या फ्लॅटमधील अंदाजे एक लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. त्यामध्ये सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, पैंजण आदी दागिन्यांचा समावेश होता. चोरटयांनी जवळच असलेल्या काही भागातील दुकाने फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. दरम्याने सकाळी प्रकार उघड झाल्यावर रत्नागिरीहून श्वानपथक आणण्यात आले परंतु श्वानपथकाने बस स्थानकापर्यंत माग काढला. |
![]() |