![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| वादात सापडलेली जिल्हा काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक रद्द, उद्या नवी निवडणूक | |
| दिनांक: 27-07-2010 | |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी विलासराव देशमुख गटाचे व म्हाडचे सभापती रमेश कीर यांची व अन्य पदाधिकाऱ्यांची झालेली निवड प्रक्रिया काँग्रेसच्या श्रेष्ठींनी रद्द केल्याचे वृत्त आहे. आता नवीन निवडणूक प्रक्रिया उद्या काँग्रेस भुवनमध्ये पार पडणार आहे. कीर यांची झालेली निवड ही कोकणचे नेते नारायण राणे यांच्या गटाला शह असल्याचे बोलले जात होते. या निवडणूक प्रक्रियेविरोधात काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुजित झिमण यांनी आक्षेप घेवून श्रेष्ठींकडे फेर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर दावे-प्रतिदावे करण्यात येत होते. मात्र आता काँग्रेसच्या श्रेष्ठींकडूनच ही निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली असून उद्या होणाऱ्या निवडणुकीच्यावेळी योगायोगाने पुरस्थितीची पाहणी करण्यासाठी ना. नारायण राणे हे रत्नागिरीत उपस्थित राहणार असल्याने उद्याची निवडणूक गाजणार असून त्यामध्ये कोणता गट कुरघोडी करतो याकडे आता लक्ष लागले आहे. |
![]() |