![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| लायन्स क्लबसारख्या संस्थांनी भ्रष्टाचार रोखण्याचे कार्य करावे : निशिकांत जोशी |
| दिनांक: 26-07-2010 |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या लायन्स क्लबसारखी संस्था सामाजिक कार्यात आघाडीवर असून यासारख्या संस्थांनी आता समाजातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी व जातीधर्माच्या कचाटयात अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन दै. सागरचे संपादक व माजी आ. निशिकांत जोशी यांनी लायन्स क्लबच्या प्रांतीय मंडळाच्या शपथग्र्रहण सोहळयात बोलताना केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र, बारामती व कोकणातून मोठया प्रमाणावर लायन्सचे सभासद उपस्थित होते. नवनिर्वाचित प्रांतपाल लायन अनिल देसाई यांनी आगामी काळात आपण चांगले कार्य करू असे आश्वासन दिले. |