![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| केंद्रीय स्वास्थ्य विमा योजनेचा जिल्ह्यात बोजवारा |
| दिनांक: 25-07-2010 |
![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या केंद्रीय स्वास्थ्य विमा योजनेचा रत्नागिरी जिल्ज्यात पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. केंद्रीय स्वास्थ योजनेची अंमलबजावणी गतवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात झाली. दारिद्रयरेषेखालील लाभार्थीना या योजनेचा फायदा देण्यात येत असतो. पण गेल्या वर्षभरातील या योजनेची गती पाहता शासनाने मंजूर केलेल्या कोटयावधींचा निधी अद्यापही तसाच पडून आहे. त्यामुळे रूग्णांना या योजनेचा फायदा नसल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यामध्ये 1 लाख 21 हजार दारिद्रयरेषेखालील कुटुंबांची नोंद आहे. मात्र त्यापैकी जेमतेम 71 हजार व्यक्तींनाच स्मार्टकार्ड देण्याबाबत कार्यवाही केली आहे. त्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे या महत्वाकांक्षी योजनेच्या निधीचा योग्य विनियोग झाला नाही. |