![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| शाळांना घरगुतीच वीज मीटर असावेत, संगमेश्वर पं. स. सभेत ठराव |
| दिनांक: 25-07-2010 |
![]() |
| देवरूख, (प्रतिनिधी) : महावितरणने प्राथमिक शाळांसाठी व्यावसायिक वीज मीटर घेण्याची सक्ती सुरू केली असून संगमेश्वर तालुक्यातील 15 शाळांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. यामुळे पंचायत समितीच्या मासिक सभेत महावितरणच्या कारभारावर ताशेरे ओढून शाळांना घरगुती मीटरचाच दर्जा देण्यात आला पाहिजे, असा सर्वानुमते ठराव करण्यात आला आहे. शाळा या व्यावसायिक प्रकारात मोडत नसून या ठिकाणी केवळ ज्ञानदानाद्वारे भावी पिढी घडविण्याचे काम केले जाते. या शाळांमधून कोणताही व्यापार वा आर्थिक व्यवहार केले जात नाहीत. मग अशा शाळांना महावितरणने व्यापारी मीटर घेण्याची सक्ती का केली असा प्रश्न या सभेत उपस्थित करण्यात आला. |