![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| मुंबईतून चोरून विकलेल्या 13 दुचाकी खेडमध्ये हस्तगत |
| दिनांक: 25-07-2010 |
![]() |
| खेड, (प्रतिनिधी) : मुंबईतील दहिसर, बोरीवली व विरार परिसरातून वर्षभरात चोरलेल्या दुचाकी गाडया उत्तर रत्नागिरीतील खेड तालुक्यात आणून विकल्याप्रकरणी दोघा आरोपींना बोरीवली येथे गजाआड करून येथे विकलेल्या सर्वच्या सर्व 13 गाडया बोरीवली पोलीस स्थानकाच्या 5 जणांच्या पथकाने हस्तगत केल्या. संदीप दत्ताराम चव्हाण (रा. दहिसर), अल्पेश बगीला (बोरीवली) अशी आरोपींची नावे आहेत. मुंबईतील दहिसर, बोरीवली, विरार आदी परिसरात अज्ञात टोळीकडून गेल्या वर्षभरात दुचाकी चोरीला जाण्याचे सत्र सुरू होते. या प्रकरणी संबंधितांनी बोरीवली पोलीस स्थानकात वारंवार दुचाकी चोरीला जात असल्याच्या तक्रारी नोंदविल्या होत्या. 18 जुलै रोजी संदीप व अल्पेश यांना संशयित म्हणून अटक करून खाकी हिसका दाखवताच आतापर्यंत चोरलेल्या 13 गाडया रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात अन्य एका मध्यस्तीकडून विकल्या असल्याची कबुली दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक तडाखे यांच्या नेतृत्वाखाली एच. सी. कणसे, पी. एन. मुल्ला, पी. एन. दळवी, पी. सी. राणे या पोलीस पथकाने आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार खेडमध्ये दाखल होवून येथील पोलीस कर्मचारी ताराकांत शिवगण यांच्या मदतीने विकलेल्या गाडयांचा शोध घेत आहेत. |