![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| रत्नागिरीतील काही भागात पाणी नाही |
| दिनांक: 25-07-2010 |
![]() |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे हरचेरी येथील जॅकवेलमध्ये पुराचे पाणी शिरल्याने या ठिकाणाहून पंपींगद्वारे उपसा होणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद झाला आहे. पुराच्या पाण्याची पातळी कमी झाल्याशिवाय पंपींग सुरू होणार नसल्यामुळे 25 ते 26 जुलैपर्यंत एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे कळविण्यात आले आहे. रत्नागिरी नगरपरिषद हद्दीमध्ये परटवणे, मुरूगवाडा, मिऱ्या भाग व मिरकरवाडा या ठिकाणी राहणाऱ्या नळधारकांना पाणीपुरवठा होणार नाही असे कळविण्यात आले आहे. |