![]() |
|||
| दिनांक: | |||
![]() |
![]() |
| जिल्हाध्यक्ष निवडीप्रकरणी कीर व झिमण गटाचे वेगवेगळे दावे | |
| दिनांक: 24-07-2010 | |
| रत्नागिरी, (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी म्हाडाचे सभापती रमेश कीर यांची निवड झाल्याने निर्माण झालेल्या वादाबाबत आता कीर गट व झिमण गटाकडून वेगवेगळे दावे करण्यात येत असल्याने सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. कीर यांची झालेली निवड ही लोकशाही पध्दतीने झाली नसल्याचा आक्षेप माजी अध्यक्ष सुजित झिमण यांनी घेवून या निवडणुकीला पक्षश्रेष्ठींनी स्थगिती दिल्याचे झिमण गटातर्फे सांगण्यात येत आहे. मात्र कीर गटाकडून आपल्याला अशा प्रकारे लेखी स्वरूपात कोणतेही आदेश मिळालेले नसून झिमण गटाचा दावा चुकीचा असल्याचे कीर गटाकडून सांगण्यात येत आहे. जिल्हा अध्यक्षांची झालेली निवड ही लोकशाही पध्दतीनेच झाली असल्याचा दावा कीर गटाने केला आहे. |
![]() |